Current Affairs of 8 July 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (8 जुलै 2016)
फ्रान्स युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत :
- विश्वविजेत्या जर्मनीचा 2-0 ने पराभव करत फ्रान्सने यंदाच्या युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
- सन 2000 नंतर प्रथम फ्रान्सने युरो करंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
- सुरूवातीला सामन्यावर जर्मनीने फ्रान्सवर वर्चस्व गाजविले, चेंडूवर सर्वाधिक नियंत्रणही जर्मनीच्या खेळाडूंचेच होते.
- मात्र सामन्याचा पूर्वार्थ संपण्यापूर्वी फ्रान्सला पेनल्टी मिळाली आणि फ्रान्सने त्याचे सोने केले.
- दरम्यान उत्तरार्धात ग्रीजमनने फ्रान्सनने 72 व्या मिनिटाला पुन्हा एक गोल केला.
Must Read (नक्की वाचा):
भारताच्या निर्मला शेओरन रिओसाठी पात्र :
- भारताच्या निर्मला शेओरनने हैदराबाद मध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 400 मीटर प्रकारात 51.48 सेकंदांची वेळ नोंदवून रिओ ऑलिम्पिकची पात्रता मिळवली.
- रिओचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या निर्मलाने कामगिरीत सुधारणा करताना हिटमध्ये नोंदवलेल्या 52.32 सेकंदांच्या वेळेहून चांगली कामगिरी केली.
- तसेच तिने 2014 साली एम. आर. पुवम्मा यांनी नोंदवलेल्या 51.73 सेकंदांचा विक्रमही मोडला.
- रिओ ऑलिम्पिकची पात्रता मिळवणारी निर्मला 24 वी अॅथलिट आहे.
- रिओत जागा निश्चित करण्यासाठी 52.20 सेकंदांची पात्रता वेळ ठरवण्यात आली होती.
चीनच्या लष्करात सर्वात मोठे सैनिकी, वाहतूक विमान दाखल :
- चीनने (दि. 6) देशांतर्गत निर्मिती केलेले सर्वात मोठे ‘वाय-20’ हे सैन्याची आणि मालाची दीर्घ पल्ल्यापर्यंत कोणत्याही मोसमात वाहतूक करणारे विमान लष्कराच्या ताफ्यात दाखल केले.
- लष्करी हवाई तंत्रज्ञानातील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
- वाय-20 ला सेवेमध्ये दाखल करणे हे हवाई दलासाठी अंत्यत महत्त्वपूर्ण आहे.
- जवळपास 200 टन वजनाचे साहित्य नेण्याची या विमानाची क्षमता आहे.
- तसेच हे विमान कोणत्याही हंगामामध्ये सामान आणि सैनिकांना अतिशय दूर अंतरावर नेऊ शकते. सध्या हे विमान चेंगडू येथील पीएलए हवाई दलात दाखल करण्यात आले आहे.
- राष्ट्रीय सुरक्षेसह देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मदतकार्य करण्यासाठी तसेच सैनिकांच्या गरजा योग्य पद्धतीने पूर्ण करण्यासाठी या विमानाची चीनला मोठी मदत होणार आहे.
स्वदेशी निर्मितीचा ‘तेजस’ हवाई दलात दाखल :
- स्वदेशी बनावटीच्या हलक्या ‘तेजस’ या लढाऊ विमानाची पहिली तुकडी 1 जुलै रोजी हवाई दलात दाखल करण्यात आली.
- तसेच या दोन विमानांच्या या तुकडीला ‘फ्लाइंग डॅगर्स’ (45 स्क्वाड्रन्स) असे नाव देण्यात आले आहे.
- केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) ही विमाने तयार केली आहेत.
- ‘तेजस’च्या या तुकडीचा पहिला तळ बंगळूरमध्येच असणार असून, दोन वर्षांनंतर तो तमिळनाडूतील सुलूर येथे हलविण्यात येणार आहे.
- ‘तेजस’ हे विमान ‘मिग’ विमानांची जागा घेणार आहे.
- आणखी सहा ‘तेजस’ विमानं 2017 च्या अखेरपर्यंत हवाई दलात दाखल होणार आहेत.
- ‘मिग’ ही मूळची रशियन विमाने आहेत. मात्र सोवियत रशियाच्या विघटनानंतर ‘मिग’ विमानांचे दर्जेदार सुटे भाग आणि तांत्रिक सहकार्य मिळवणे भारतासाठी कठीण झाले.
- अखेर सरकारने ‘मिग’ विमानांचा ताफा टप्प्याटप्प्याने हवाई दलातून निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
- तसेच पाकिस्तानच्या जे एफ 17 या मूळच्या चिनी बनावटीच्या विमानाला जोरदार टक्कर देण्याची क्षमता ‘तेजस’मध्ये आहे.
अधिवेशनाच्या पूर्वार्धात ‘जीएसटी’ विधेयक येणार :
- बहुचर्चित वस्तू आणि सेवाकर विधेयक (जीएसटी) संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वार्धात, शक्यतो पहिल्याच आठवड्यात राज्यसभेत आणण्याचे सरकारने ठरविले आहे.
- राज्यसभेत कॉंग्रेसचे घटलेले बळ व वाढलेले भाजप खासदार यामुळे हे ऐतिहासिक विधेयक याच अधिवेशनात मंजूर होईल, असा विश्वास संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केला आहे.
- तसेच येत्या 18 जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी 15 ते 17 जुलैदरम्यान लोकसभा व राज्यसभाध्यक्ष सर्वपक्षीय बैठक बोलावणार आहेत.
- ‘जीएसटी’च्या निमित्ताने राज्यघटनेत 122 वी दुरुस्ती केली जाईल.
- राज्यसभेत समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, बीजू जनता दल, तृणमूल कॉंग्रेस, संयुक्त जनता दल (जेडीयू) या मोठ्या पक्षांनी याआधीच ‘जीएसटी’ला पाठिंबा दिला आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा