Current Affairs of 7 July 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (7 जुलै 2016)

चालू घडामोडी (7 जुलै 2016)

राज्यात पंतप्रधान पीक विमा योजना लागू :

  • राज्यात खरीप हंगाम-2016 पासून राष्ट्रीय कृषी विमा योजना रद्द करून त्या जागी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात येणार आहे.
  • तसेच यामध्ये पंधरा पिकांचा समावेश असून, यात पाच फळांचाही समावेश आहे.
  • राष्ट्रीय कृषी विमा योजना 1999 पासून सुरू होती, आता सरकारने ती बंद करून पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली आहे.
  • 10 विमा कंपन्यांचा यात सहभाग असलेल्या या योजनेमध्ये तृणधान्ये व कडधान्ये याचा समावेश असून भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद यांचा समावेश आहे.
  • पिकांच्या कापणीनंतर 14 दिवसांपर्यंत संरक्षण या विम्याने मिळू शकते, तसेच खराब हवामानामुळे सरासरीच्या 50 टक्‍के पेक्षा कमी उत्पन्न येण्याचा प्राथमिक अंदाज असल्यास 25 टक्‍के नुकसानभरपाई आगाऊ मिळणार आहे.
  • आग, वीज पडणे, वादळ, गारपीठ, चक्रीवादळ, तापमानात वाढ, पूर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, रोग व किडीचा प्रादुर्भाव यासाठीही हा विमा मिळणार आहे.
  • तसेच यामध्ये खरिपासाठी 2 टक्‍के रब्बीसाठी दीड टक्‍का व व्यापारी पिकांसाठी 5 टक्‍के अशा प्रकारे उर्वरित रक्‍कम राज्य व केंद्र शासन समप्रमाणात देणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 जुलै 2016)

वाळूचे रथ बनवून नवा जागतिक विक्रम :

  • वाळूपासून कलाकृती करणारे प्रसिद्ध कलाकार सुदर्शन पटनायक यांनी नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
  • ओडिशात पुरी येथे वाळूचे शंभर रथ बनवून त्यांनी केलेल्या विक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने दखल घेतली आहे.
  • पद्मश्रीने सन्मानित केलेल्या पटनायक यांनी यापूर्वी 20 रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदविलेले आहेत.

आता शाळांना मिळणार ग्रीन विद्यालयाचा दर्जा :

  • केंद्र शासनाने स्वच्छ भारत मोहिमेबरोबरच आता ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ ही मोहीम हाती घेतली आहे.
  • ज्या शाळांमध्ये स्वच्छतेबाबत सुविधा आहेत, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटले आहे.
  • अशा शंभर शाळांची राष्ट्रपातळीवर निवड करून त्यांना ग्रीन विद्यालयाचा दर्जा देऊन सन्मानित केले जाणार आहे. 
  • शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी यात पुढाकार घेतला आहे.
  • तसेच ते ‘व्हीसी’द्वारे प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत.
  • महात्मा गांधीजींनी पाहिलेले स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत घडविण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे.
  • वर्षभर ही मोहीम राबविली जात असली, तरी ती आता केवळ रस्ते, परिसर, प्रांगण स्वच्छतेपुरतेच मर्यादित ठेवलेले नाही.
  • स्वच्छता म्हणजे संपूर्ण स्वच्छता. मग ती परिसराची, घराची असो की शारीरिक, पाणी, शौचालय याबाबत विशेष दक्षता घेण्यात येत आहे.

देशातील पहिल्या बॅंडला ग्लास ग्रॅंड प्रिक्‍स पुरस्कार :

  • 63 व्या कान्स फेस्टिव्हल ऑफ क्रिएटिव्हिटी स्पर्धेत भारतातील पहिल्या तृतीयपंथी बॅंड सिक्‍स पॅकने ग्लास ग्रॅंड प्रिक्‍स पुरस्कारावर आपले नाव कोरले.
  • जगभरातील हजारांहून अधिक बॅंड (संघ) या स्पर्धेत सहभागी झाले होते त्यापैकी सिक्‍स पॅकने बाजी मारली.
  • तसेच हा पुरस्कार जिंकण्याची भारताची पहिलीच वेळ आहे. या स्पर्धेत भारतातील आणखी चार बॅंडही सहभागी झाले होते.
  • हम है हॅप्पी या सिक्‍स पॅकच्या व्हिडिओ आठवडाभरात 1.6 दशलक्ष लोकांनी पाहिला.

रेल्वेच्या आरक्षित तिकिटांसाठी आता आधारकार्डची सक्ती :

  • रेल्वे प्रवासाच्या तिकिटांचे आरक्षण करण्यासाठी आता लवकरच आधार क्रमांक अनिवार्य होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आधार क्रमांकाचा वापर विविध सरकारी योजनांसह इतरत्रही करणे आवश्‍यक आहे.
  • तसेच त्यामुळे रेल्वे तिकिटांचा काळा बाजार रोखण्यासाठी आधार क्रमांक रेल्वे तिकिटांशी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
  • आधार क्रमांक सुरवातीला केवळ आरक्षित तिकिटांसाठीच अनिवार्य करण्यात येणार आहे.
  • विविध सवलतींद्वारे रेल्वे प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक आदींच्या तिकीट आरक्षणासाठी पहिल्या टप्प्यात आधार क्रमांक अनिवार्य करण्यात येणार आहे.
  • तसेच त्यानंतर सर्व आरक्षित तिकिटांसाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यात येईल.
  • आधार क्रमांक देऊन रेल्वे तिकीट काढल्यानंतर प्रवासादरम्यान रेल्वेचा तिकीट तपासनीस त्याच्याकडील उपकरणात आधार क्रमांक देऊन प्रवाशाची माहिती, छायाचित्र पाहू शकेल.

दिनविशेष :

  • 1974 : महेश भूपती, भारतीय टेनिसपटू याचा जन्म.
  • 1978 : सोलोमन आयलँड्सला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • 1981 : महेंद्रसिंग धोनी, भारतीय क्रिकेट खेळाडू याचा जन्म.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 जुलै 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.