Current Affairs of 6 July 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (6 जुलै 2016)
बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नावात बदल होणार :
- डाळटंचाईवर मात करण्यासाठी मोझांबिक या आफ्रिकेतील देशाशी सामंजस्य कराराला आणि बॉम्बे व मद्रास उच्च न्यायालयांचे अनुक्रमे मुंबई आणि चेन्नई असे नामांतर करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने (दि.5) मंजुरी दिली.
- तसेच या निर्णयानुसार आता नामांतरासाठी एक विधेयक आणले जाणार आहे.
- या विधेयकाच्या मंजुरीनंतर बॉम्बे उच्च न्यायालयाचे नाव औपचारिकरीत्या मुंबई उच्च न्यायालय होईल.
- केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक होऊन त्यात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
- केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती दिली.
- बॉम्बे, मद्रास आणि कलकत्ता उच्च न्यायालयांची नावे बदलण्याच्या वाढत्या मागणीच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने उच्च न्यायालय (नाव बदल) विधेयक, 2016 या विधेयकाच्या मसुद्याला हिरवा कंदील मिळाले.
- संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मंजुरीसाठी आणले जाईल.
Must Read (नक्की वाचा):
महामार्गासाठी आता “लॅंड पुलिंग” योजना :
- राज्याच्या परिवहनात क्रांती घडविणारा नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती मार्ग, त्याचे जोडरस्ते व त्यावरील प्रस्तावित नवनगरांच्या उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या जमिनी शेतकऱ्यांकडून लॅंड पुलिंग योजनेद्वारे पूर्वसंमती घेऊन भागीदारी पद्धतीने प्राप्त करून घेण्याच्या निर्णयास (दि.5) मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात तत्त्वत: मान्यता देण्यात आली.
- तसेच या मार्गाचे नामकरण महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे करण्यासह या मार्गावर उभारण्यात येणारी 24 प्रस्तावित नवनगरे ही कृषी समृद्धी केंद्रे म्हणून ओळखली जाणार आहेत.
- हा महामार्ग दहा जिल्ह्यांतील 27 तालुक्यांच्या 350 गावांमधून जाणार आहे.
- नियोजित द्रुतगती मार्ग, त्याचे जोडरस्ते आणि नवनगरे यांच्या आखणीमध्ये समाविष्ट शासकीय व सार्वजनिक उपक्रमांकडील जमिनी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 च्या कलम 40 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून विनामोबदला स्वरूपात कोणत्याही भोगवटा मूल्यांशिवाय व अनर्जित उत्पन्नाचा हिस्सा शासनास अदा करावयाच्या अटीशिवाय निर्बांध्यरीत्या हस्तांतरित करणे व या जमिनींचा आगाऊ ताबा महामंडळास देण्यास मंजुरी देण्यात आली.
नासाचे ज्युनो यान पोहोचले गुरूच्या कक्षेत :
- अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने सोडलेल्या ज्युनो या अंतराळयानाने गेल्या पाच वर्षांत 2.7 अब्ज किमीचा खडतर प्रवास करून आपल्या सूर्यमालेतील पाचव्या आणि सर्वात मोठ्या गुरु ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला.
- ज्युनो पुढील 20 महिने गुरुभोवती प्रदक्षिणा करत असताना त्यातील वैज्ञानिक उपकरणे जी बहुमोल माहिती गोळा करतील त्यातून वायूरूप गोळा असलेल्या या ग्रहाची आणि पर्यायाने सूर्यमालेच्या निर्मितीची गुपिते उलगडणे सोपे जाईल.
- अमेरिकेच्या पूर्व किनारी प्रमाणवेळेनुसार (दि. 4) मध्यरात्री 11.53 वाजता ज्युनोने गुरु ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केल्याचा रेडिओ संदेश आला तेव्हा कॅलिफोर्नियातील पसाडेना येथील जे प्रॉपेल्शन लॅबोरेटरीमधील नियंत्रण कक्षात सचिंत मनाने श्वास रोखून बसलेल्या ‘नासा’च्या वैज्ञानिकांनी आनंदाचे चित्कार करून व टाळ्या वाजवून जल्लोश केला.
- आकाराने पृथ्वीहून 1300 पट मोठ्या असलेल्या गुरुची प्रचंड शक्तिशाली गुरुत्वाकर्षण कक्षा भेदून आत प्रवेश करण्यासाठी ज्युनो यानाने ताशी 1.30 लाख मैल एवढा वेग गाठणे गरजेचे होते.
- 35 मिनिटे इंजिन चालविल्यावर एवढा वेग गाठला गेला व काम फत्ते झाले. दुसरे महत्त्वाचे काम होते ते प्रवेशासाठी अचूक जागा निवडण्याचे.
- 65 चंद्रांवरून असंख्य खगोलिय कणांचा गुरुवर सतत वर्षाव सुरु असतो.
भारतात नोकरीसाठी ‘गुगल इंडिया’ सर्वोत्तम :
- भारतात नोकरीसाठी सर्वोत्कृष्ट असलेल्या कंपन्यांच्या यादीत गुगल इंडियाला पहिला मान मिळाला आहे.
- कर्मचाऱ्यांना आरामशीर वातावरण आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध करुन देण्यासाठी प्रसिद्ध असलेली गुगल इंडिया कंपनी गेल्यावर्षी दुसऱ्या क्रमांकावर होती.
- तसेच त्यापाठोपाठ आर्थिक सेवा क्षेत्रातील अमेरिकन एक्सप्रेस इंडिया आणि उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेस अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
- गेल्यावर्षीच्या सर्वेक्षणात अमेरिकन एक्सप्रेस इंडिया चौथ्या तर उज्जीवन फायनान्स तब्बल चोवीसाव्या क्रमांकावर होती.
- एका इंग्रजी वृत्तपत्राने ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ संस्थेकडून देशातील कॉर्पोरेट कार्यालयाविषयी केल्या जाणाऱ्या वार्षिक सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.
- तसेच यंदा सुमारे 800 कंपन्या व 1.55 लाख कर्मचाऱ्यांना सहभागी करुन घेण्यात आले.
- मॅरियट हॉटेल्स, ओबेरॉय समुह व लेमन ट्रीसारख्या प्रमुख आदरातिथ्य क्षेत्रातील कंपन्यांना पहिल्या 10 कंपन्यांच्या यादीत स्थान मिळाले आहे.
- त्याशिवाय, टेलिपरफॉर्मन्स इंडिया, गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स, सॅप लॅब्स इंडिया आणि इनट्युट प्रोडक्ट डेव्हलपमेंट सेंटरसारख्या भिन्न क्षेत्रातील कंपन्या नोकरीसाठी सर्वोत्तम ठरल्या आहेत.
दिनविशेष :
- 1573 : कोर्दोबा, आर्जेन्टीना शहराची स्थापना.
- 1837 : डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, थोर प्राच्यविद्या संशोधक, इतिहास संशोधक यांचा जन्म.
- 1892 : दादाभाई नौरोजींची ब्रिटीश संसदेचे सर्वप्रथम भारतीय सभासद म्हणून निवड.
- 1901 : हिंद महासभेचे नेते व जैन संघाचे पहिले अध्यक्ष डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा