Current Affairs of 6 July 2015 For MPSC Exams
रूपयाच्या किमतीत 18 पैशांची घसरण
- आज रूपयाची 18 पैशांनी घसरून होऊन रू. 63.62 प्रति डॉलरवर झाली आहे.
- गेल्या सत्रात (शुक्रवार) रूपया रू.63.44 प्रति डॉलरवर व्यवहार करत बंद झाला होता.
पंतप्रधान सहा देशांच्या दौऱ्यावर रवाना
- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. सर्वप्रथम ते उझबेगिस्तानला भेट देणार आहेत.
- ते मध्य आशियातील उझबेगिस्तान, तुर्कमेनिस्तान, किर्गीस्तान, ताजिकीस्तान या देशांना भेटी देणार आहेत. मध्य आशियातील हे सर्व देश नैसर्गिक वायूंनी समृद्ध आहेत.
- त्यानंतर ते रशियाला रवाना होतील. रशियातील उफा शहरात होणार्या ब्रिक्स देशांच्या परिषदेत पंतप्रधान सहभागी होणार आहेत.
- ब्रिक्स देशांची परिषद 8 ते 9 जुलै दरम्यान होणार आहे.
फर्ग्युसन, सेंट झेवियर्स ‘हेरिटेज कॉलेज’ म्हणून निवड
- शंभर वर्षांहून अधिक जुने असलेल्या महाविद्यालयांचा वारसा जपण्यासाठी आणि संवर्धनासाठी देशातील 19 शैक्षणिक संस्थांना वारसा महाविद्यालय म्हणून मंजुरी देण्यात आली आहे.
- त्यातील महाराष्ट्रातील तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. मुंबईचे सेंट झेवियर्स, पुण्याचे फर्ग्युसन आणि नागपूरचे हिस्लॉप महाविद्यालयाचा समावेश झाला आहे.
- निवड करण्यात आलेले महाविद्यालय : सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई, सीएमएस कॉलेज कोट्टायम, सेंट जोसेफ कॉलेज त्रिची, खालसा कॉलेज अमृतसर, सेंट बेडेज कॉलेज सिमला, ख्रिस्त चर्च कॉलेज कानपूर, ओल्ड आग्रा कॉलेज आग्रा, मेरठ कॉलेज मेरठ आणि लंगतसिंग कॉलेज मुझफ्फरनगर, शासकीय ब्रेमेन कॉलेज केरळ, युनिर्व्हसिटी कॉलेज मंगळूर, कॉटन कॉलेज गुवाहाटी, मिदनापूर कॉलेज पश्चिम बंगाल, शासकीय मेडिकल कॉलेज जबलपूर, फर्ग्युसन कॉलेज पुणे, हिस्लॉप कॉलेज नागपूर, गांधी मेमोरिअल सायन्स कॉलेज जम्मू, कन्या महाविद्यालय जालंधर आणि सेंट झेवियर्स कोलकता.
प्रवेश शुल्काची माहिती संकेतस्थळावर द्यावी – युजीसी
- विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आकारण्यात येणारे प्रवेश शुल्क आणि इतर खर्चाची सविस्तर माहिती संकेतस्थळावर देण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) कुलगुरुंना दिले आहेत.
- मागील आठवड्यात मानव संसाधन मंत्रालयाने आपले महाविद्यालयाबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी “नो युवर कॉलेज” नावाची मोहिम राबविली होती.
- त्याद्वारे एकाच ठिकाणी 10,500 महाविद्यालयांची माहिती देण्यात आली होती.