Current Affairs of 4 July 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (4 जुलै 2018)
मुलांच्या पालनपोषणासाठी महिलांना विशेष रजा :
- मुलांच्या पालनपोषणासाठी सरकारी सेवेतील महिला कर्मचाऱयांना सहा महिन्यांची विशेष रजा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. मुले अठरा वर्षांची होईपर्यंत ही रजा टप्प्याटप्प्याने घेता येईल. या बाबतचा शासकीय आदेश येत्या दहा दिवसांत निघणार आहे.
- राज्याचे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन यंदा प्रथमच नागपूरला 4 जुलैपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी होणाऱया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. त्यानंतर सत्तारूढ पक्षाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रामगिरी बंगल्यावर झाली. या बैठकीनंतर मंत्रिमंडळाची बैठक तेथेच झाली. या बैठकीत विशेष रजा देण्याबाबतचा निर्णय झाला.
- तसेच, पुढे होणार्या अधिवेशनातील विरोधी पक्षाच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देण्याची रणनितीही भाजपच्या प्रमुख मंत्र्यांच्या बैठकीत ठरविण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.
Must Read (नक्की वाचा):
कुटुंब नियोजन करणाऱ्या कर्मचाऱ्यास पालिकेकडून बक्षीस :
- एका अपत्यानंतर कुटुंब नियोजन करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आता पन्नास हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना दोन जादा वेतनवाढ मिळणार नाही.
- राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना डिसेंबर 1998 नंतर एका अपत्यावर कुटुंब नियोजन केल्यास त्यांना दोन जादा वेतनवाढ देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. याबाबतच्या प्रस्तावाला 2011 साली सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली होती.
- तसेच या वेतनवाढीबाबत राज्य सरकारने कोणतेही आदेश दिले नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करण्यात आला. दोन जादा वेतनवाढ देण्याऐवजी एकदाच संबंधित कर्मचाऱ्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. त्यास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी दिली गेली.
- महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत ‘लेक दत्तक योजना’ राबविली जाते. एका मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास पन्नास हजार रुपयांपर्यंतची रक्कम राष्ट्रीयीकृत बॅंकेत मुलीच्या नावाने ठेवली जाते.
अॅरॉन फिंचचा ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावांचा विक्रम :
- ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि सलामीवीर अॅरॉन फिंचने येथे सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत झिम्बाब्वेविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यात 172 धावा करत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रम केला.
- 2013 साली फिंचनेच इंग्लंडविरुद्ध 63 चेंडूंमध्ये 156 धावा करत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारली होती. फिंचने केलेल्या 172 धावांमुळे स्वतःचाच विक्रम त्याने मोडला आहे. फिंचच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने झिम्बाब्वेपुढे 230 धावांचे आव्हान ठेवले आहे.
- ऑस्ट्रेलिया-झिम्बाब्वे-पाकिस्तान या संघांमध्ये सध्या झिम्बाब्वेमध्ये तिरंगी मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफिक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली आणि सलामीला आलेल्या फिंचने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. फिंचने केवळ 76 चेंडूत 172 धावा केल्या. यात त्याने 10 षटकार आणि 16 चौकार लगावले.
शिष्यवृत्तीत महाराष्ट्रातील दलित विद्यार्थी देशात अव्वल :
- केंद्र सरकारतर्फे दलित विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती मिळवणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील दलित विद्यार्थी आघाडीवर आहेत. केंद्र सरकारतर्फे दलित विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीवर महाराष्ट्राचेच वर्चस्व आहे. अलीकडच्या काहीवर्षातील आकडेवारीवरुन ही बाब समोर आली आहे.
- फेब्रुवारी 2018 पर्यंत अनुसूचित जातीसाठीच्या राष्ट्रीय परदेश शिष्यवृत्ती योजनेतंर्गत एकूण 72 शिष्यवृत्ती जाहीर झाल्या आहेत. त्यातील 40 शिष्यवृत्ती या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळाल्या. या यादीत कर्नाटक आणि उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानावर असून दोन्ही राज्यातील विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा शिष्यवृत्त्या मिळाल्या.
- 2016-17 मध्ये एकूण 108 शिष्यवृत्ती जाहीर झाल्या. त्यातील 53 शिष्यवृत्ती महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळाल्या. उत्तर प्रदेशात आठ तर मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी पाच जणांना शिष्यवृत्ती मिळाली. अन्य राज्यांमधील विद्यार्थ्यांना एक ते चार या प्रमाणात शिष्यवृत्ती मिळाली. त्याआधीची तीन वर्ष सुद्धा महाराष्ट्र ही शिष्यवृत्ती मिळवण्यामध्ये आघाडीवर होता.
यूपीमध्ये मदरसांनाही लागू होणार ड्रेस कोड :
- उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकार मदरसामधील शिक्षणाला नवे रूप देण्याची तयारी करत आहे. अल्पसंख्याक प्रकरणाचे राज्यमंत्री मोहसिन रझा यांनी लवकरच सरकार मदरसांसाठी ड्रेस कोड लागू करणार असल्याची माहिती दिली. आतापर्यंत मदरसामध्ये कुर्ता आणि पायजमामध्ये दिसतात. यापूर्वी योगी सरकारने मदरसांमध्ये एनसीईआरटी अभ्यासक्रम लागू केला आहे.
- रजा म्हणाले की, या प्रकरणी प्रस्ताव तयार केला जात आहे. मदरसा शिक्षण व्यवस्थेला नवीन ओळख देण्याचा यामागचा मुख्य उद्देश आहे. पण अजून या मुलांना कोणता पोशाख असावा हे निश्चित झालेले नाही.
- इतर शैक्षणिक संस्थांप्रमाणे मदरसांमध्ये आम्हाला बदल करायचे आहेत. मदरसाही इतर शैक्षणिक संस्थांप्रमाणे काम करावेत असे आम्हाला वाटते. आतापर्यंत मदरसामध्ये शिकणारे मुले कुर्ता-पायजमा घालत. आता आम्ही लवकरच त्यांच्यासाठी ड्रेस कोड आणण्याची तयारी करत आहोत. आम्ही त्यांना युनिफॉर्म पुरवू, असे रझा म्हणाले.
दिनविशेष :
- भारताचे दुसरे पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांचा जन्म 4 जुलै 1898 मध्ये झाला होता.
- सन 1903 मध्ये मोटर रेस स्पर्धे मध्ये भाग घेणारी डॉरोथी लेव्हिट ही पहिली इंग्लिश महिला ठरली.
- सन 1947 मध्ये भारत पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.
- नासाचे पाथफाइंडर हे मानवविरहित यान सन 1997 मध्ये मंगळावर उतरले.
- सन 1999 मध्ये लष्कराच्या 18व्या बटालियनने कारगिलमधील द्रासमधील टायगर हिल्स हा महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा