Current Affairs of 31 January 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (31 जानेवारी 2018)

चालू घडामोडी (31 जानेवारी 2018)

नारिंगी पारपत्राचा निर्णय रद्द :

 • ‘इमिग्रेशन चेक रिक्वायर्ड’ (ईसीआर) या वर्गवारीकरिता नारिंगी रंगाचे पारपत्र (पासपोर्ट) जारी करण्याच्या निर्णयाला झालेला विरोध लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय रद्द केल्याचे जाहीर केले.
 • तसेच पारपत्राच्या अखेरीस असणारे धारकाचा पत्ता लिहिलेले पानही पूर्ववत छापण्यात येणार असल्याचे सांगितले.
 • तसेच ईसीआर वर्गवारीतील पारपत्र धारकांना नारिंगी रंगाचे पारपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
 • ईसीआर वर्गवारी म्हणजे भारतातील 1983 च्या इमिग्रेशन कायद्यानुसार ईसीआर वर्गवारीतील पारपत्र धारकांना ठरावीक 18 देशांत प्रवास करायचा असल्यास परदेशस्थ भारतीय व्यवहार मंत्रालयाच्या (मिनिस्ट्री ऑफ ओव्हरसीज इंडियन अफेअर्स) प्रोटेक्टर ऑफ इमिग्रंट्स कार्यालयाकडून परदेश प्रवासासाठी खास परवानगी घ्यावी लागते.
 • या यादीत संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार, ओमान , कुवेत, बहरीन, मलेशिया, लिबिया, जॉर्डन, येमेन, सुदान, अफगाणिस्तान, इंडोनेशिया, सीरिया, लेबनॉन, थायलंड आणि इराक या 18 देशांचा समावेश आहे.

श्रीमंत देशांमध्ये भारत सहाव्या स्थानावर :

 • जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या क्रमवारीत भारताने सहावा क्रमांक पटकावला आहे. भारतातील एकूण संपत्तीचे मूल्य 8,230 अब्ज डॉलर इतके आहे.
 • न्यू वर्ल्ड वेल्थ या संस्थेने तयार केलेल्या अहवालानूसार अमेरिका हा जगातील सर्वात श्रीमंत देश आहे.
 • 2017 साली अमेरिकेची एकूणसंपत्ती 64,584 अब्ज डॉलर इतकी होती.
 • दुसरा क्रमांकावर असलेल्या चीनची एकूण संपत्ती 24,803 अब्ज डॉलर, तिसरा क्रमांक पटकाविलेल्या जपानची एकूण संपत्ती 19,522 अब्ज डॉलर, चौथ्या क्रमांकावरील ब्रिटनची संपत्ती 9,919 अब्ज डॉलर, पाचव्या क्रमांकावरील जर्मनीची संपत्ती 9,660 अब्ज डॉलर आहे.
 • भारत सहाव्या क्रमांकावर असून, त्यांनंतर फ्रान्स (7) , कॅनडा (8), ऑस्ट्रेलिया (9) व इटली (10) क्रमांक आहे.

जेएनयूमध्ये 46 वर्षांनंतर होणार दुसरा दीक्षांत समारंभ :

 • सर्व विद्यापीठांमध्ये साधारणपणे दरवर्षी दीक्षांत समारंभाचे आयोजन केले जाते. पण भारतातील प्रतिष्ठित दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) मागील 46 वर्षांत असे झालेले नाही. पण यंदापासून ही प्रथा पुन्हा सुरू केली जाणार आहे.
 • जेएनयूमध्ये 46 वर्षांनंतर दुसऱ्या दीक्षांत समारंभाचे आयोजन केले जात आहे.
 • यापूर्वी विद्यापीठात पहिला आणि शेवटचा दीक्षांत समारंभ हा वर्ष 1972 मध्ये झाला होता.

आज आकाशात निळा नजराणा :

 • आज खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून असा खास नजराणा आकाशात पाहायला मिळणार आहे.  
 • रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात या तिहेरी योगाचे दर्शन होणार असल्याची माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
 • या आधी 152 वर्षांपूर्वी म्हणजेच 31 मार्च 1866 रोजी असा तिहेरी योग जुळून आला असल्याचेही ते म्हणाले.
 • ज्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो त्यावेळी त्याला ‘सुपरमून’ असे म्हणतात.
 • त्या दिवशी चंद्रबिंब 14 टक्के मोठे आणि 30 टक्के जास्त प्रकाशित दिसते.
 • चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतरावर आहे. आज रोजी चंद्र पृथ्वीपासून 3 लाख 59 हजार किलोमीटर अंतरावर येणार आहे.
 • चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने त्या दिवशी पौर्णिमेचे चंद्रबिंब आकाराने मोठे दिसणार आहे.
 • एका इंग्रजी महिन्यात जेव्हा दोन पौर्णिमा येतात तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्रास ‘ब्ल्यूमून’ असे म्हटले जाते.

   

‘नकुशीं’ची संख्या दोन कोटींवर :

 • एक तरी मुलगा असावा या मानसिकतेमुळे गेल्या 12-15 वर्षांत भारतात किमान दोन कोटी ‘नकुशा’ मुली जन्माला आल्या असाव्यात, असा अंदाज सरकारच्या अधिकृत आकडेवारीत व्यक्त झाला आहे.
 • 1970 पासून भारताने लोकसंख्येतील लैंगिक गुणोत्तराचे संतुलन राखण्यात 17 पैकी 10 निकषांवर समाधानकारक प्रगती केली असली तरी मुलींपेक्षा मुलांचा अजूनही काहीसा जास्त असलेला जन्मदर ही चिंतेची बाब आहे.

न्यायाधीशांच्या वेतनात 200 टक्क्यांची वाढ :

 • सर्वोच्च न्यायालय आणि 24 उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या वेतनात 200 टक्के वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं न्यायाधीशांच्या वेतनात वाढ केल्याची अधिसूचना जारी केली आहे.
 • 27 जानेवारीच्या अधिसूचनेनुसार, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींचं प्रतिमहिना वेतन आता 1 लाख रुपयांवरून थेट 2.80 लाख रुपये होणार आहे.
 • या वेतनाव्यतिरिक्त त्यांना सरकारी निवासस्थान, गाडी आणि कर्मचा-यांसह इतरही भत्ते मिळणार आहेत.
 • तर नव्या अधिसूचनेनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांचं प्रतिमहिना वेतन 90 हजार रुपयांनी वाढून 2.50 लाख रुपयांपर्यंत जाणार आहे.
 • तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं वेतन 80 हजारांवरून 2.25 लाख रुपये प्रति महिना एवढं होणार आहे. न्यायाधीशांचं वेतन सातव्या वेतन आयोगानुसार वाढवण्यासंदर्भातही अनेक शिफारशी करण्यात आल्या होत्या.

दिनविशेष :

 • 1911 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.
 • 1920 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात.
 • 1929 : सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.