Current Affairs of 30 April 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (30 एप्रिल 2016)

चालू घडामोडी (30 एप्रिल 2016)

भारतीय महिला संघ अंतिम फेरीत :

  • भारतीय महिला रिकर्व्ह संघाने (दि.29) तिरंदाजी विश्वकप स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अव्वल मानांकित जर्मनीचा 5-3 ने पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
  • भारताला सुवर्णपदकासाठी अंतिम फेरीत चिनी ताइपेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
  • भारत रिकर्व्ह इव्हेंटमध्ये पुरुष गटात आणि मिश्र गटात पदकाच्या शर्यतीत कायम आहे, पण कम्पाऊंडमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी निराशाजनक ठरली.
  • दीपिका कुमारी, लैशराम बोम्बाल्या देवी आणि लक्ष्मीराणी माझी यांनी वैयक्तिक गटातील निराशाजनक कामगिरीतून सावरताना जर्मनीच्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले.
  • उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत सातव्या मानांकित चिनी ताइपेने त्यांच्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या रशियन संघाचा 6-0 ने पराभव केला.
  • रिकर्व्ह गटातील सर्व अंतिम लढत (दि.1 मे) होणार आहे तर (दि.30) कम्पाऊंड इव्हेंटची अंतिम फेरी होईल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 एप्रिल 2016)

गुजरातमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास लोकांसाठी 10 टक्के आरक्षण जाहीर :

  • पटेल आरक्षण आंदोलनाच्या दबावाखाली गुजरातमधील भाजप सरकारने पाटीदारांसह सवर्ण वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास लोकांसाठी 10 टक्के आरक्षणाची घोषणा केली.
  • वार्षिक 6 लाखांपेक्षा कमी आर्थिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबालाच हे आरक्षण लागू असणार आहे.
  • आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला आरक्षण देणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
  • सवर्णांना आरक्षण देण्याच्या निर्णयाबरोबरच सरकारने याबाबत आपली पुढील भूमिकाही स्पष्ट केली आहे.
  • तसेच या निर्णायाने सर्वोच्च न्यायालयाने निश्‍चित केलेल्या 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेचे उल्लंघन होणार आहे.
  • मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कॅबिनेट मंत्री विजय रूपाणी यांनी याची अधिकृत घोषणा केली.
  • 1 मे रोजी आरक्षणासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात येणार असून, या आरक्षणाचा फायदा पटेल समाजाबरोबरच सर्व सवर्णांना मिळणार आहे.
  • सरकारी नोकऱ्या आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

आता दूरदर्शनही होणार आधुनिक :

  • दूरदर्शनच्या वृत्त व मनोरंजनाच्या वाहिन्या अत्याधुनिक करण्यासाठी सरकार विविध उपाय करीत आहे.
  • आधुनिक तंत्रज्ञान, प्रादेशिक कार्यालयाची सेवा अधिक बळकट करणे व नव्या दम्याच्या प्रतिभेला वाव देण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री राजवर्धनसिंह राठोड यांनी (दि.29) लोकसभेत दिली.
  • ‘डीडी न्यूज’वर फक्त बातम्या व संपूर्ण बातम्याच दाखविल्या जातात आणि देशातील सर्वाधिक लोक या बातम्या पाहत असतात.  
  • दूरदर्शनच्या अत्याधुनिकीकरणाचे काम सुरू आहे. नवीन तंत्रज्ञान आले आहे.
  • नवीन लोकांना कामाची संधी देण्यात येणार असून, वेतनातही वाढ करण्यात येणार आहे.
  • सरकार लवकरच मनोरंजनासंदर्भात नवीन धोरण आणणार आहे.
  • तसेच त्यानुसार वेळेनुसार पैसे आकारण्यात येणार असून, त्यामुळे अधिकाधिक कार्यक्रम दाखविणे शक्‍य होईल.

चीनला रशियाचा पाठिंबा :

  • दक्षिण चीन समुद्रातील स्वामित्वाबाबतचे वाद संबंधित देशांनी परस्पर चर्चेद्वारे सोडवावेत आणि या प्रकरणी बाहेरील देशांनी ढवळाढवळ करू नये, असे म्हणत रशियाने चीनच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे.
  • रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आगामी भेटीची पूर्वतयारी म्हणून तसेच आशियातील देशांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार करण्याच्या उद्देशाने होणाऱ्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेसाठी रशियाचे सर्गेई लावरोव्ह चीन दौऱ्यावर गेले आहेत.
  • तसेच त्यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांची भेट घेऊन दक्षिण चीन समुद्रातील वादाबाबत चर्चा केली.
  • तसेच या वेळी हा वाद संबंधित देशांनी परस्पर चर्चेने आधारावर सोडवावा अशी भूमिका रशियाने घेतली.

किंगफिशर एअरलाइन्सच्या ट्रेड मार्क्‍सचा लिलाव होणार :

  • उद्योजक विजय मल्ल्यांना दिलेल्या कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी बॅंकांकडून (दि. 30) किंगफिशर एअरलाइन्सच्या ट्रेड मार्क्‍सचा लिलाव करण्यात येणार आहे.
  • तसेच त्यासाठी 366 कोटी रुपयांची राखीव किंमत निश्‍चित करण्यात आली आहे.
  • कंपनीच्या ट्रेड मार्क्‍समध्ये किंगफिशर एअरलाइन्सचे वेगळेपण दर्शवणारा किंगफिशर पक्ष्याचा लोगो, टॅगलाइन्सब्रॅंड नेमचा समावेश आहे.
  • बॅंकांकडून कर्ज घेताना कंपनीने बॅंकांकडे आपले ट्रेड मार्क्‍स तारण ठेवले होते.
  • बॅंकांच्या वतीने एसबीआय-कॅप ट्रस्टीतर्फे ट्रेड मार्क्‍सचा ऑनलाइन लिलाव करण्यात येणार आहे.
  • एसबीआय कॅप ट्रस्टी ही एसबीआय कॅपिटलची उपकंपनी आहे.
  • ब्रॅंडचे ऍम्बेसिडर विजय मल्ल्यांच्या वागणुकीमुळे ब्रॅंडला आणखी नकारात्मक वलय आले आहे.

नासाला मेकमेक बटू ग्रहाचा चंद्र शोधण्यात यश :

  • नासाच्या हबल अवकाश दुर्बिणीने शोधलेल्या मेकमेक या बटू ग्रहाला एक चंद्रही आहे, हा चंद्र छोटा असून चमकदार नाही तर काळा आहे. तो मेकमेक या बटूग्रहाभोवती फिरत आहे.
  • सौरमालेतील कुईपर पट्टय़ात मेकमेक हा चमकदार बर्फाळ ग्रह असून असा आणखी एक ग्रहही आहे.
  • तसेच या ग्रहाच्या चंद्राचे नाव तूर्त एस/2015 (136472) ठेवले असले तरी एमके 2 असे त्याचे टोपण नाव आहे.
  • तसेच तो मेकमेक या ग्रहापेक्षा 1300 पट कमी प्रकाशमान आहे, त्यामुळे तो काळाच दिसतो.
  • एमके 2 हा बटू ग्रहापासून 20921 कि.मी. अंतरावर असून त्याचा व्यास 160 कि.मी. आहे.
  • मेकमेकचा व्यास 1400 कि.मी. आहे. मेकमेक ग्रहाचा शोध 2005 मध्ये लागला असून त्याला इस्टर आयलंडवरील रापा नुई देवतेची निर्मिती म्हणून मेकमेक असे नाव दिले आहे.
  • कुईपर पट्टा हा सौरमालेतील एक मोठा भाग असून तो 4.5 अब्ज वर्षांपूर्वी सौरमालेची निर्मिती झाल्यानंतर उरलेल्या अवशेषांचा बनलेला आहे.  
  • इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियनने यातील पाच बटू ग्रहांना मान्यता दिली आहे. या ग्रहात प्रथमच चंद्र सापडण्याची घटना घडली आहे.
  • हबल दुर्बिणीने वाइड फील्ड कॅमेरा तीनच्या मदतीने एप्रिल 2015 मध्ये हा चंद्र शोधला असून निरीक्षण पथकाने हबल दुर्बिणीच्या मदतीने 2005, 2011, 2012 मध्ये लहान उपग्रह शोधले होते.

दिनविशेष :

  • 1870 : दादासाहेब फाळके यांचा जन्म दिन.
  • 1926 : श्रीनिवास खळे, मराठी संगीतकार यांचा जन्म.
  • 1936 : वर्ध्याजवळ महात्मा गांधीजींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 मे 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.