Current Affairs of 3 May 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (3 मे 2018)

चालू घडामोडी (3 मे 2018)

सरकारकडून विमानतळाचे विस्तारीकरण नियोजन :

 • चेन्नई, लखनौ, गुवाहाटी या विमानतळांच्या विस्तारीकरण व आधुनिकीकरणाच्या निर्णयावर केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. येत्या पाच वर्षांत पुणे, कोल्हापूरसह वीस विमानतळांच्या विस्ताराचे सरकारचे नियोजन आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विमानतळ आधुनिकीकरणासोबतच, भारतीय खाण प्राधिकरणाची (ब्यूरो ऑफ इंडियन माईन्स) पुनर्रचना, उद्योगानुकूलता वाढविण्यासाठी जिल्हा पातळीवर व्यावसायिक न्यायालये सुरू करण्याची तरतूद असलेल्या अध्यादेशाला मान्यता; तसेच प्रधानमंत्री व्यय वंदन योजना, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेला मुदतवाढ आदी निर्णयही झाले.
 • चार-पाच वर्षांत आगरताळा, पाटणा, श्रीनगर, पुणे, त्रिची, विजयवाडा, पोर्टब्लेअर, जयपूर, मंगळूर, डेहराडून, जबलपूर, कोल्हापूर, गोवा, रुप्सी, लेह, कोझिकोड, इम्फाळ, वाराणसी, भुवनेश्‍वर या विमानतळांचाही विस्तार होणार आहे. यासाठी 20178 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 मे 2018)

सुनीता लाक्राकडे महिला हॉकी संघाचे नेतृत्व :

 • भारतीय महिला हॉकी संघाची अनुभवी बचावपटू सुनीता लाक्राकडे आगामी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघाचे नेतृत्व करणार आहे.
 • 13 मे पासून कोरियात या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची अनुभवी कर्णधार राणी रामपाल हिला विश्रांती देण्यात आली असून, गोलकिपर सविता संघाची उप-कर्णधार असणार आहे.
 • नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे आपले जुने प्रशिक्षक जोर्द मरीन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ पुन्हा एकदा उठावदाक कामगिरी करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 • 2016 साली झालेल्या स्पर्धेत भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत चीनवर मात करुन स्पर्धेचं विजेतेपद पटकावले होते. यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना जपानविरुद्ध होणार आहे.

जगातील टॉप प्रदुषित शहरात भारतातील शहरांचा समावेश :

 • विश्व आरोग्य संघटना (WHO) ने जगातील 15 सगळ्यात जास्त प्रदुषित शहरांची यादी जाहीर केली आहे. भारतासाठी खेदाची बाब ही की या यादीतील 14 शहरे ही भारतातील आहे. ज्यात कानपुर टॉपवर, वाराणसी तिसऱ्या स्थानावर आणि पटना पाचव्या स्थानावर आहे.
 • देशाची राजधानी दिल्ली येथील प्रदुषणाचे तर भरपुर चर्चे असतात. या यादीत दिल्ली सहाव्या क्रमांकावर आहे. प्रदुषित शहरांची ही यादी 2016 ची आहे.
 • WHO च्या माहितीसंग्रहानुसार, 2010 ते 2014 या दरम्यान दिल्लीतील प्रदुषाची स्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली होती. पण 2015 मध्ये दिल्लीतील प्रदुषण पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर गेले.
 • 2.5 पीएम (फाइन पर्टिकु्लर मीटर) लक्षात घेता 100 देशातील 4000 शहरांच्या संशोधनानंतर हे आकडे समोर आले आहेत. 2010 मध्ये WHO ने प्रदुषित शहरांची यादी जाहीर केली तेव्हा दिल्ली अग्रस्थानी होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानातील पेशावर व रावळपिंडी ही शहरे होती. यावेळी अग्रस्थानी पाकिस्तान आणि चीनच्या कोणत्याच शहरांचा समावेश नाही.

राज्याचे नवे उद्योग धोरण सप्टेंबरमध्ये :

 • महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी-प्रगतीसाठी राज्य सरकार उद्योग धोरण तयार करत असून सप्टेंबर 2018 मध्ये नवीन उद्योग धोरण जाहीर करण्यात येईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर केले आहे.
 • सूक्ष्म व लघु उद्योगांच्या (एसएमई) संघटनेतर्फे आयोजित आर्थिक परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना देसाई यांनी ही घोषणा केली. नीती आयोगाचे प्रमुख डॉ. राजीव कुमार तसेच ‘एसएमई’चे प्रमुख चंद्रकांत साळुंखे उपस्थित होते.
 • गेल्या तीन वर्षांत राज्य सरकारने उद्योगवाढीला चालना देण्यासाठी अनेक धोरणे राबवली. परिणामी मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्रद्वारे देश तसेच जगातील गुंतवणूकदारांनी महाराष्ट्राला पहिली पसंती दिली आहे. राज्य सरकारने उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी अनेक नियम, अटी शिथील केल्या आहेत. यामुळे मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत तीन हजारांहून अधिक उद्योजकांनी गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे.
 • न्यू इंडिया-2020 ही संकल्पना राबविण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. भविष्यात रोजगार व निर्यात वाढविण्यावर केंद्राचा भर राहणार आहे. मुद्रा योजना कार्यान्वित झाली आहे.
 • त्याद्वारे उद्योग वाढीसाठी आर्थिक साहाय्य मिळणार आहे. नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यास सरकार बांधील आहे, असे नीती आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी सांगितले.

हरेंद्र सिंह भारतीय हॉकी संघाचे नवीन प्रशिक्षक :

 • हॉकी इंडियाने गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेली प्रशिक्षक बदलाची परंपरा कायम राखत, पुन्हा एकदा नवीन प्रशिक्षकांच्या खांद्यावर भारतीय हॉकी संघाची जबाबदारी टाकली आहे.
 • राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय हॉकी संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर, झालेल्या आढावा बैठकीत जोर्द मरीन यांना पुन्हा एकदा महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर महिला संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंह यापुढे भारतीय पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदाची भूमिका पार पाडणार आहेत.
 • रोलंट ओल्टमन्स यांची प्रशिक्षकपदावरुन उचलबांगडी करण्यात आल्यानंतर हरेंद्र सिंह भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र हॉकी इंडियाने जोर्द मरीन यांना प्रशिक्षकपदी नेमून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
 • मात्र आशिया चषकाचा अपवाद वगळता जोर्द मरीन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. सुलतान अझलन शहा चषक आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय संघाला पदक मिळवण्यात अयशस्वी ठरला. यानंतर हॉकी इंडिया मरीन यांच्या कारभारावर खुश नसल्याचे समोर आले होते.

दिनविशेष :

 • 3 मे 1912 हा दिवस उर्दू कादंबरीचे जनक मानले जाणारे उर्दू लेखक, समाजसुधारक नझीर अहमद देहलवी ऊर्फ डिप्टी यांचा स्मृतीदिन आहे.
 • दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट 3 मे 1913 रोजी प्रदर्शित झाला.
 • नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 3 मे 1939 रोजी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
 • 3 मे 1947 रोजी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची स्थापना झाली.
 • भाजपाच्या जेष्ठ नेत्या उमा भारती यांचा जन्म 3 मे 1959 मध्ये झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 मे 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.