Current Affairs of 3 June 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (3 जून 2016)

चालू घडामोडी (3 जून 2016)

भारत अमेरिकेत ऊर्जा सहकार्य करार :

 • स्वच्छ ऊर्जा आणि वैश्‍विक तापमानवाढीच्या समस्येचा सामना करण्यासाठी भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी कंबर कसली असून, यासाठी उभय देशांनी सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
 • ऊर्जा मंत्रालयाचे सचिव पी. के. पुजारी आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा या दोघांमध्ये या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाल्याचे अधिकृत निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.
 • दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारांमुळे संशोधन आणि विकासाला चालना मिळणार असून, परस्पर सामंजस्याने तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करणेही शक्‍य होईल.
 • तसेच यामुळे हरितगृहवायू उत्सर्जनाला आपोआप चाप बसेल.
 • मागील अनेक दिवसांपासून भारत आणि अमेरिकेमध्ये या अनुषंगाने चर्चा सुरू होती.
 • तसेच या करारांमुळे दोन्ही देशांमधील कंपन्यांना संयुक्तपणे काम करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार असून, पर्यावरणविषयक जागृतीलाही हातभार लागेल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 जून 2016)

15 वर्षांनंतर परदेशी भूमीवर भारताचा विजय :

 • भारताने लाओसला 56 व्या मिनिटात एकमेव गोल करत पराभूत केले.
 • 2019 च्या एएफसी आशियाकप फुटबॉल पात्रता फेरीत 15 वर्षांनंतर भारताने विजय मिळवला आहे.
 • 2001 नंतर परदेशी भूमीवर या स्पर्धेत भारताचा हा पहिला विजय आहे.
 • भारतीय संघाने परिस्थिती विरोधात असतानाही शानदार प्रदर्शन केले.
 • सहा प्रमुख खेळाडू जखमी असल्याने संघासोबत नव्हते. त्यामुळे भारतीय संघाकडून फारशी आशा नव्हती.
 • मात्र, जे. जे. लालपेखलुआने 56 व्या मिनिटाला केलेल्या गोलने भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

निर्वासित हिंदूंना मिळणार भारतीय नागरिकत्व :

 • धर्माच्या आधारावर होणा-या हिंसाचाराच्या भितीने आश्रयासाठी भारतात आलेल्या पाकिस्तान, बांगलादेशातील अल्पसंख्यांकांना लवकरच भारतीय नागरीकत्व मिळू शकते.
 • केंद्रीय गृहमंत्रालय त्यासाठी भारतीय नागरीकत्व कायद्यामध्ये सुधारणा करण्यास तयार आहे.
 • नागरीकत्व कायदा 1955 मधील प्रस्तावित बदलांमुळे शरणार्थींना भारतात रहाण्याचा कायदेशीर अधिकार मिळणार असून, त्यांना नागरीकत्वासाठी दावा करता येईल.
 • कायद्यातील प्रस्तावित बदल प्रत्यक्षात आल्यानंतर आपले सरकार हिंदूचे संरक्षणकर्ते असल्याचा संदेश जाणार असून, त्यातून राजकीय उद्देशही साध्य होणार आहे.
 • पाकिस्तान, बांगलादेशात हिंदू अल्पसंख्यांक असून तेथे धर्माच्या आधारावर होणा-या हिंसाचारामुळे अनेक हिंदूंनी भारतात आश्रय घेतला आहे.
 • तसेच या निर्णयाचा पाकिस्तान-बांगलादेशातून आलेल्या दोन लाख हिंदूंना फायदा होणार आहे.

टीम इंडियाचा जुलैमध्ये विंडीज दौरा :

 • टीम इंडिया वेस्ट इंडीजविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आगामी 6 जुलै रोजी रवाना होणार आहे.
 • बीसीसीआयने (दि.2) दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले.
 • जुलै-ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या 49 दिवसांच्या या दौऱ्यात चार कसोटी सामन्यांआधी दोन सराव सामनेदेखील खेळवले जातील.
 • भारताचा दोन दिवसांचा पहिला सराव सामना वॉर्नर पार्क येथे 10 जुलै रोजी होईल.  
 • पहिली कसोटी 21 ते 25 जुलै या कालावधीत अँटिग्वा येथील सर विव्हियन रिचर्ड्स स्टेडियममध्ये, दुसरी कसोटी 30 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत सबिना पार्क येथे, तिसरी कसोटी 9 ते 13 ऑगस्ट या कालावधीत सेंट लुसिया येथे आणि चौथी कसोटी 18 ते 22 ऑगस्ट या कालावधीत त्रिनिदादच्या क्वीन्स पार्कमध्ये खेळली जाईल.

आइनस्टाइन कडय़ांचा शोध :

 • साधारण 1 हजार कोटी प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका दीíघकेत वैज्ञानिकांना अगदी सममिताकार आइनस्टाइन रिंग्ज (कडी) सापडली आहेत.
 • जास्त वस्तुमानाच्या दीर्घिकेमागे लपलेल्या दीर्घिकेमुळे हा परिणाम दिसतो.
 • आइनस्टाइनच्या कडय़ांचे भाकीत हे साधारण सापेक्षतावादाच्या सिद्धान्ताआधारे करण्यात आले होते.
 • कॅनरी बेटांवरील युनिव्हर्सिटी ऑफ ला लागुनाइन्स्टिटय़ूट दा अ‍ॅस्ट्रोफिजिका दा कॅनरीज या संस्थांच्या वैज्ञानिकांनी शोधलेल्या या कडय़ांना कॅनरीयन आइनस्टाइन कडी असे नाव देण्यात आले आहे.
 • आइनस्टाइन कडी हा दूरस्थ दीर्घिकेचा दृश्यविभ्रम असतो, ती दीर्घिका हा त्याचा स्रोत असतो.
 • प्रकाशाचे विवर्तन झाल्याने म्हणजे तो वाकल्याने स्रोतापासूनचे प्रकाशकिरण कडय़ासारखे दिसतात.
 • कॅनॅरियाज आइनस्टाइन कडी ही आजपर्यंत शोधली गेलेली सममिताकार कडी आहेत.  
 • मंथली नोटिसेस ऑफ रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

दिनविशेष :

 • 1831 : ‘भारतीय महिला विद्यापीठ’ या संस्थेची स्थापना.
 • 1890 : बाबुराव पेंटर, महान चित्रकार व शिल्पकार यांचा जन्म.
 • 1890 : खान अब्दुल गफारखान, सरहद्ध गांधी याचा जन्म.
 • 1920 : भारतीय महिला विद्यापीठाचे ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ’ (एस.एन.डी.टी.) असे नामांतर झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 जून 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.