Current Affairs of 3 December 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (3 डिसेंबर 2017)

चालू घडामोडी (3 डिसेंबर 2017)

देशातील हवा प्रदूषणाला अमेरिका जबाबदार :

 • भारतामध्ये दिल्लीसारख्या शहरांनी प्रदूषणाची धोक्याची पातळी गाठलेली असताना अमेरिकेसारखा मित्रदेशच भारताला अस्वच्छ इंधनाचा पुरवठा करत आहे.
 • तेल शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये कच्च्या तेलावर प्रक्रिया केल्यानंतर बॅरलच्या तळाशी उरणाऱ्या डांबरासारख्या पदार्थाचा भारताला पुरवठा केला जात आहे.
 • हा पदार्थ स्वस्त आणि जाळल्यानंतर कोळशापेक्षा उष्णता निर्माण करत असला तरीही हृदयाला धोकादायक असा अतिप्रमाणात कार्बन आणि फुप्फुसांना हानिकारक अशा सल्फरचे उत्सर्जन करत असल्याने प्रदूषण
 • पातळीत वाढच होत आहे.
 • भारत हा नेहमीच इंधनाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे.
 • अमेरिकेने काही वर्षांपूर्वीच स्वत:चे तेल उत्पादन सुरू केले आहे, परंतु देशभरात ‘पेटकोक’ प्रकारातील हा पेट्रोलियम पदार्थ पाठविण्याचे सोडून केवळ भारतालाच हे इंधन पाठविले जाते.
 • 2016 मध्ये अमेरिकेने तब्बल आठ दशलक्ष मेट्रिक टन पेटकोकचा भारताला पुरवठा केला आहे. हा पुरवठा 2010 पेक्षा 20 पटींनी जास्त आहे.
 • या इंधनाचा वापर भारतातील लाखोंनी असलेल्या कंपन्या आणि प्रकल्पांमध्ये करण्यात येतो. आणि याच कंपन्यांमधून घातक अशी प्रदूषित हवा वातावरणात सोडण्यात येत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
 • गेल्या दशकभरापासून पेटकोक हे इंधन भारतामधील कंपन्यांमध्ये ज्वलनासाठी वापरण्यात येणारे सर्वात महत्त्वाचे इंधन बनले असल्याचे उद्योगांतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
 • हे इंधन टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापर प्रक्रियेसाठी वापरण्यात येते. तर, आरोग्य आणि पर्यावरणाशी संबंधित वकिलांनी सांगितले की, अमेरिका पर्यावरणाच्या समस्यांना निर्यात करण्याचे काम करत आहे.
 • पेटकोक या अशुद्ध इंधनाचे जगभरात सर्वाधिक उत्पादन घेणारा देशही अमेरिकाच असल्याचे फेडरल अँड इंटरनॅशनलच्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.

सलील पारेख यांची इन्फोसेसच्या CEO पदी नियुक्ती :

 • भारतातील अग्रगण्य आयटी कंपन्यांपैकी एक असणाऱ्या इन्फोसेसने आज सलील एस. पारेख यांची कंपनीच्या मुख्याधिकारी (सीईओ) आणि मॅनेजिंग डायरेक्टर (व्यवस्थापन संचालक) पदी नियुक्ती केली.
 • पुढील महिन्याच्या दोन तारखेपासून म्हणजेच दोन जानेवारीपासून ते पदभार स्वीकारतील.
 • या नियुक्तीमुळे दोन महिन्यांपासून मुख्याधिकारी पदासाठी सुरु असलेला शोध संपला आहे.
 • सध्या पारेख हे मुळची फ्रान्सची असणारी आयटी कंपनी ‘कॅपजेमीनी’चे ग्रुपच्या कार्यकारी बोर्डाचे सदस्य आहेत.
 • त्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापिठातून कंप्युटर सायन्स आणि मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये मास्टर्सची पदवी घेतली आहे.
 • त्यांनी मुंबई आयआयटीमधून अॅरोनॉटिकल इंजिनियरींमध्ये बॅचरल ऑफ टेक्नॉलॉजी (बी. टेक.)चे शिक्षण घेतले आहे.
 • कंपनीचे सहसंस्थापक असलेले नंदन निलकेणी हेच इन्फोसेसचे अ-कार्यकारी अध्यक्ष रहातील. कंपनीचे हंगामी मुख्याधिकारी यू. बी. प्रवीण राव यांना मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बढती मिळाली आहे.

निस्सानने भारताविरोधात दाखल केला 5 हजार कोटींचा दावा :

 • निस्सान मोटर्सने ही कार निर्मिती करणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे. नुकताच या जपानी कंपनीशी निगडीत एक वाद समोर आला आहे.
 • भारताविरोधात असलेल्या या वादामध्ये आंतरराष्ट्रीय लवादामध्ये कंपनीने चक्क पाच हजार कोटींचा दावा केला आहे.
 • भारताबरोबर कंपनीच्या झालेल्या करारानुसार स्टेट इन्सेन्टीव्ह म्हणून भारताने कंपनीला पाच हजार कोटी देणे अपेक्षित होते. मात्र ते न दिल्याने कंपनीने हा खटला दाखल केला आहे.
 • कंपनीने 2008 मध्ये तामिळनाडू सरकारबरोबर केलेल्या एका करारानुसार, तामिळनाडूमध्ये कंपनी स्वत:चा गाड्य़ा निर्मितीचा कारखाना उभारणार होती.
 • यासाठी कंपनीला 5 हजार कोटी रुपयांचे स्टेट इन्सेन्टीव्ह दिले जाणार होते.
 • मात्र या करारानुसार ठरल्याप्रमाणे मागील अनेक वर्षांपासून कंपनीला एकही रुपया देण्यात आला नाही. निस्सानने पाठवलेल्या नोटीसमध्ये 2 हजार 900 कोटी अनपेड इन्सेन्टीव्ह आणि 2 हजार 100कोटींचे नुकसान आणि व्याज अशी एकूण पाच हजार कोटींची मागणी केली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या ग्रंथालयात पहिल्यांदाच लागणार ‘या’ महिला वकिलाची प्रतिमा :

 • देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील ग्रंथालयात पहिल्यांदाच एका महिला वकिलाची प्रतिमा लावण्यात येणार आहे.
 • तुरुंगांमध्ये शिक्षा भोगत असणाऱ्या निरपराध कैद्यांसाठी त्या कैवारी ठरल्या होत्या.
 • पुष्पा कपिला हिंगोरानी असे या वकील महिलेचे नाव असून त्यांनी न्यायालयात पहिल्यांदा जनहित याचिका दाखल केली होती. या घटनेमुळे आज अनेकांसाठी जलद न्यायाचे दरवाजे खुले झाले आहेत.
 • नव्या नोटा हाताळण्यात अंधांना अडचणी :
 • अंध व्यक्तींना सरकारने नव्याने चलनात आणलेल्या नोटा व नाणी वापरण्यात अडचणी येत असून, त्या बाबत दिल्ली उच्च न्यायालयाने सरकार व रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया यांना नोटीस जारी केली आहे.
 • न्यायालयाने सांगितले, की ही अतिशय गंभीर अशी लोकहिताची बाब असून, नोटांचा आकार बदलल्याने अंधांना त्या हाताळण्यात अडचणी येत आहेत.
 • हंगामी मुख्य न्यायाधीश गीता मित्तल व न्या. सी. हरी शंकर यांनी सांगितले, की आम्ही या नोटांबाबतची समस्या विचारात घेतली असून नवीन नोटा बदलून अंधांना दोन नोटांमधील फरक कळेल अशा पद्धतीने
 • कराव्यात, त्याबाबत सरकार व रिझव्‍‌र्ह बँकेला नोटीस जारी करण्यात येत आहे.
 • आता या प्रकरणाची सुनावणी 6 डिसेंबरला होणार आहे. आताच्या सुनावणीत रिझव्‍‌र्ह बँकेचे वकील संजीव नरुला यांनी सांगितले, की ही तसेच 10 रुपये, 5 रुपये, 2 रुपये व 1 रुपया यांची रचना सारखीच असल्याने त्यांच्यातील फरक ओळखता येत नाही, त्यामुळे त्यातही बदल करण्यात यावा.

रशियाकडून भारतासाठी चार टप्प्यांत हलक्या हेलिकॉप्टरची निर्मिती :

 • भारतासाठी कमी वजनाच्या 200 कामोव हेलिकॉप्टर्सची निर्मिती चार टप्प्यांत करण्यात येणार असल्याचे एका रशियन अधिकाऱ्याने सांगितले.
 • भारत-रशिया यांच्या संयुक्त प्रकल्पात हे उत्पादन केले जाणार असून त्यात कामोव 226 टी प्रकारची 60 हेलिकॉप्टर्स भारताला तयार स्वरूपात दिली जातील, याशिवाय दीडशे हेलिकॉप्टर्स भारतात तयार केली जाणार असून त्यासाठी 1 अब्ज डॉलर्सचा करार 2015 मध्ये करण्यात आला होता. आंतर सरकारी कराराच्या अनुसार या हेलिकॉप्टर्सचे उत्पादन होणार आहे.
 • एकूण चार टप्प्यांत हेलिकॉप्टर्सचे उत्पादन केले जाणार असून त्यांचे भाग व तंत्रज्ञान यांच्या हस्तांतराचा एक टप्पा यात आहे. पहिल्या टप्प्यात जुळणी केलेली हेलिकॉप्टर्स रशिया देणार आहे.
 • नंतर तंत्रज्ञान हस्तांतर व तांत्रिक मदत या टप्प्यांचा समावेश आहे. यात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, पायाभूत सुविधा व दुरुस्ती केंद्र यांचीही पूर्तता केली जाईल.
 • रशियन व भारतीय सुटय़ा भागांचे प्रमाण किती राहील असे विचारले असता त्यांनी सांगितले की, रशियाने तंत्रज्ञान हस्तांतराचे आश्वासन दिले आहे त्याचे पालन केले जाईल. यात देशातील कायद्यानुसार काही अटींचे पालन करावे लागेल.

‘बेटी बचाओ, बहू लाओ’ने प्रत्युत्तर; हिंदू जागरण मंचाचे अभियान :

 • केरळमधील ‘लव्ह जिहाद’चा तथाकथित वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला असताना, आता ‘लव्ह जिहाद’ला उत्तर देण्याची तयारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संघटनेकडून केली जाते आहे. हिंदू जागरण मंचाकडून ‘बेटी बचाओ, बहू लाओ’, अभियानाची सुरुवात केली जाणार आहे.
 • या अंतर्गत हिंदू तरुणांशी लग्न करु इच्छिणाऱ्या मुस्लिम तरुणींचे विवाह करुन दिले जातील. याशिवाय अशा जोडप्यांना आर्थिक आणि सामाजिक सहकार्यदेखील दिले जाणार आहे.
 • हिंदू जागरण मंचाकडून पुढील आठवड्यापासून ‘बेटी बचाओ, बहू लाओ’ या अभियानाची सुरुवात करण्यात येईल.
 • या अभियानांतर्गत पुढील 6 महिन्यांमध्ये 2100 मुस्लिम तरुणींचे हिंदू तरुणांशी विवाह करुन दिले जातील.
 • हिंदू प्रथा परंपरेनुसार हे विवाह केले जाणार आहेत. यासाठी मुस्लिम मुलींचे धर्मांतर केले जाणार नाही.

पदक विजेत्या खेळाडूंना सरकारकडून गाय बक्षीस :

 • आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा सरकारकडून रोख रक्कम, सरकारी नोकरी, जमीन अशी बक्षीसे दिली जातात. आता या यादीत गायीचे नावदेखील जोडावे लागणार आहे.
 • हरयाणाचे पशुसंवर्धन मंत्री ओम प्रकाश धनकर यांनी युवा महिला चॅम्पियनशीप स्पर्धेत पदक विजेती कामगिरी करणाऱ्या राज्याच्या खेळाडूंना गाय बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे.

अमिताभ, सुभाषचंद्र बोस, लालबहादूर शास्त्री एकाच कुटुंबातील सदस्य :

 • अमिताभ बच्चन, सुभाषचंद्र बोस आणि लाल बहादूर शास्त्री एकाच कुटुंबातील असल्याचा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे.
 • अभिनेते अमिताभ बच्चन यांनी जया भादुरी यांच्याशी विवाह केला. त्या बंगालच्या असल्याने अमिताभ बंगालचे जावई आहेत.
 • तर 1939 मध्ये मूळच्या बंगालच्या असणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदावर फेरनिवड होण्यात उत्तर प्रदेशने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे अमिताभ बच्चन, सुभाषचंद्र बोस यांचा संबंध असू शकतो, असा दावा जागतिक संधोधकांच्या एका टीमने केला आहे.
 • अमिताभ बच्चन, सुभाषचंद्र बोस आणि लाल बहादूर शास्त्री एकाच कुटुंबातील असू शकतात. या दिग्गजांचे मूळ एकच असू शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे.

दिनविशेष :

 • 1971 : पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
 • 1979 : आयातुल्लाह खोमेनी ईराणचे सर्वेसर्वा बनले.
 • 1984 : भोपाळ वायू दुर्घटना
 • 1994 : जपानमध्ये प्लेस्टेशन रिलीझ करण्यात आले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.