Current Affairs of 29 January 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (29 जानेवारी 2018)

चालू घडामोडी (29 जानेवारी 2018)

अॅसिड हल्ला पीडितांसाठी केंद्र सरकार नोकरीत आरक्षण :

 • मानसिक आजार, बौद्धिक अक्षमता आणि अॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांचा केंद्र सरकारने विशेष प्रवर्गात समावेश केला आहे.
 • यामुळे अॅसिड हल्ला पीडितांना आता सरकारी नोकरीत आरक्षण मिळाले आहे.
 • अ‍ॅसिड हल्ल्यातील जखमी मुलींसंदर्भात ‘लक्ष्मी’ या पीडितेने सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती.
 • डिसेंबर 2015 मध्ये सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर निर्णय दिला होता.
 • अॅसिड हल्ल्यातील पीडितांचा समावेश अपंग प्रवर्गात करुन त्यांच्या रोजगाराची व्यवस्था करावी, असे आदेश कोर्टाने दिले होते.
 • तसेच थेट भरतीद्वारे भरावयाच्या पदांमध्ये चार टक्के आरक्षण दिले जाणार आहे.
 • 40 टक्के पेक्षा अधिक अपंगत्व असणाऱ्यांसाठी हा नवा नियम लागू असेल.
 • तसेच यातील एक टक्के जागा अंध व्यक्ती, मुकबधीर,सेरेब्रल पाल्सी, कुष्ठरोग, अॅसिड हल्ला पीडितांसाठी राखीव असेल. तर बौद्धिक अक्षमता, ऑटिझम (स्वमग्नता), अध्ययन अक्षमता आणि मानसिक आजार असलेल्यांसाठी एक टक्के जागा आरक्षित असेल.

अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून :

 • बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, या अधिवेशनात तिहेरी तलाकबंदीविधेयक संमत करण्याचे आवाहन सर्व पक्षांना केले. हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले असले, तरी राज्यसभेत विरोधकांनी त्यात सुधारणा सुचवल्या आहेत.
 • वस्तू व सेवा कराचे विधेयकही सर्व पक्षांचे एकमत झाल्यावरच संमत करण्यात आले. त्याचप्रमाणे तिहेरी तलाकबंदी विधेयकही संसदेत संमत केले जाईल.

शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक :

 • प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत आयोजित संचलनात महाराष्ट्राने सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला.
 • प्रा. नरेंद्र विचारे यांची संकल्पना व कलादिग्दर्शक नितीन सरदेसाई यांनी साकारलेल्या या चित्ररथाने संचलनावेळी सर्वांची मने जिंकली होती.
 • वर्ष 2015 मध्ये महाराष्ट्राने सादर केलेल्या पंढरीची वारी या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला होता. आता दोन वर्षांनंतर महाराष्ट्राला पुन्हा एकदा हा सन्मान मिळाला.
 • प्रजासत्ताक दिनी एकूण 23 चित्ररथ सादर करण्यात आले होते.
 • चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती होती त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आली होत. तर मध्यभागी रायगडाची प्रतिकृती व त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झालेले दाखवले होते. या ठिकाणी आभूषण देणारा दरबारी, त्याच्या शेजारी गागाभट्ट, तर या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री ऑक्सिजन दाखवण्यात आले होते. दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे दाखवण्यात आले आहेत. चित्ररथाच्या मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दर्शवण्यात आल्या होत्या.
 • प्रथम क्रमांक पटकावण्याची हॅटट्रिक करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.
 • यापूर्वी 1992 ते 1995 अशी सलग तीन वर्षे महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला होता.
 • तो चित्ररथ पाहून त्यावेळी तिथे उपस्थित असलेले राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजी राजांनी शिवाजी महाराज की जय.. शिवाजी महाराज की जय.. हा जयजयकार केला होता. राजपथावर 14 राज्यांसह केंद्र सरकारच्या 7 खात्यांचे आणि भारत-आशियान राष्ट्रांचे संबंध दाखवणारे 2 चित्ररथ असे एकूण 23 चित्ररथ सादर करण्यात आले होते.

आध्यात्मिक गुरु सिद्धेश्वर स्वामींनी नाकारला ‘पद्मश्री’ :

 • कर्नाटकातील विजयपूर येथील ‘ज्ञान योगाश्रम’चे आध्यात्मिक गुरु सिद्धेश्वर स्वामी यांना जाहीर झालेला यंदाचा ‘पद्मश्री’ किताब त्यांनी नाकारला आहे.
 • यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले असून आपण सन्यासी असल्याने हा प्रतिष्ठित पुरस्कार स्विकारता येणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
 • दरम्यान, 2015 मध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक सलीम खान यांनी पद्मश्री पुरस्कार नाकारला होता.

उनाडकट ठरला सर्वात महागडा भारतीय क्रिकेटपटू :

 • इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पध्रेच्या 11व्या हंगामासाठी बेंगळूरुत झालेल्या लिलावाच्या दुसऱ्या दिवशी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट हा सर्वात महागडा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
 • राजस्थान रॉयल्सने 11 कोटी 50 लाखांची सर्वाधिक बोली लावत त्याला संघात स्थान दिले आहे.
 • याचप्रमाणे किंग्ज इलेव्हन पंजाबने 7 कोटी 20लाख रुपये किंमत मोजून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज अ‍ॅन्ड्रय़ू टायला संघात स्थान दिले आहे.

दिनविशेष :

 • 1861 : कॅन्सास हे अमेरिकेचे 34 वे राज्य बनले.
 • 1886 : कार्ल बेंझ यांना जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्‍या मोटरगाडीचे पेटंट मिळाले.
 • 1989 : हंगेरीने दक्षिण कोरियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.
 • 1274 : संत निवृत्तीनाथ यांचा जन्म.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.