Current Affairs of 24 June 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (24 जून 2015) :

आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्ता 100 आणि 10 रुपयांच्या नाण्याचे उद्घाटन :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 10 आणि 100 रुपयांचे नाणे आणि स्मरणिका मुद्रांक तिकीट प्रसिद्ध केले आहे.
  • यांनी समग्र आरोग्यासाठी योगनिमित्ताने दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय सम्मेलनाच्या उद्घाटनानंतर वित्त मंत्रालयाव्दारे तयार नाण्याचे उद्घाटन केले.
  • तसेच यानंतर त्यांनी संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअतर्गत कार्यरत टपाल विभागाद्वारे 5 रुपये मूल्याचे स्मारक मुद्रांक प्रसिद्ध केले.
  • नाण्यांवर आणखी एका आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे प्रतीक चिन्ह आणि दुसरीकडे त्याचे मूल्य दर्शविले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी 23 जून 2014

61 मिनिटे शीर्षासन करून केला विश्वविक्रम :

  • दुबइतील 40 वर्षीय जाहिरात तज्ञ इवान स्टेंडले यांनी आंतरराष्ट्रीय योग दिंनानिमित्त 61 मिनिट शीर्षासन करून विश्वविक्रम केला आहे.
  • याआधी त्यांनी 34 मिंनिटांपर्यंत शीर्षासन केले होते.

मॉरमॉन ह्या फुलपांखराला राज्य फुलपांखरू म्हणून घोषित करण्याचा निर्णय :

  • ब्लू मॉरमॉन ह्या फुलपांखराला राज्य फुलपांखरू म्हणून घोषित करण्याचा निर्णय सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने घेण्यात आला आहे.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 22 जून रोजी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
  • महाराष्ट्र शासनातर्फे राज्याचे मानचिन्ह म्हणून राज्य प्राणी शेंगरू, राज्य पक्षी हरियल, राज्य वृक्ष आंबा व राज्य फुले जारूल घोषित केलेले आहे.
  • महाराष्ट्र हे राज्य फुलपांखरू घोषित करणारे पहिले राज्य आहे.

एंडी मरे ने चौथ्यादा क्वींस क्लबचा खिताब जिंकला :

  • अव्वल नामांकित एंडी मारे ने दक्षिण आफ्रिकेच्या केविन एंडरसनला सरल सेटमध्ये मत देत चौथा क्वींस क्लब खिताब जिंकला आहे.
  • जगातील तिसर्‍या नामांकित 28 वर्षीय मरेने केवल 74 मिनिटात 17 व्या मानांकीत एंडरसनला 6-3, 6-4 ने हरविले
  • जॉनमॅक्र्रो, बोरिस बेकर, लिटन हेविटआणि एंड्रिक नंतर क्वींस क्लब खिताब जिंकणारा एंडी मरे हा पाचवा खेळाडू आहे.   

जपानचा प्रतिष्ठित ‘फुकुओका’ पुरस्कार रामचंद्र गुहा यांना जाहीर :

  • प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांना जपानचा प्रतिष्ठित ‘फुकुओका’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • तसेच थांट मिंट यू आणि मिन्ह हान्ह यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
  • मिन्ह हान्ह यांना कला आणि संस्कृत तर थांट मिंट यू यांना शैक्षणिक क्षेत्रात महत्वाची कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार जाहीर झाले आहेत.
  • आशियामध्ये कला, शिक्षण आणि संस्कृती या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांना ‘फुकुओका’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
  • या पुरस्काराचा वितरण सोहळा 17 सप्टेंबर रोजी फुकुओका आंतरराष्ट्रीय कॉग्रेस सेंटरमध्ये पार पडणार आहे.
  • यापूर्वी रवी शंकर, पद्य सुब्रह्मज्ञम, रोमिळा थापर, आमजली अमीर खान, आशिष नंदी, पार्थ चाटर्जी, वंदना शिवा, नलिनी मलणी या भारतीयांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

आकाशगंगेला ख्रिस्तीयानो रोंनाल्डोचे नाव :

  • शास्त्रज्ञांनी अलीकडेच शोधलेल्या एका नवीन आकाशगंगेला पोर्तुगालचा फूटबॉलपट्टू ख्रिस्तीयानो रोंनाल्डोच्या सन्मानार्थ सीआर-7 (कॉसमॉस रेडशिफ्ट-7) असे नाव देण्यात आले आहे.
  • ख्रिस्तीयानो रोंनाल्डोला सीआर-7 या नावानेही ओळखले जाते.
  • आतापर्यंत ज्ञात असलेल्या हिमको या सर्वात दूरच्या आकाशगंगेपेक्षा सीआर-7 तीन पट तेजस्वी आहे.
  • कॉसमॉस रेडशिफ्ट-7 किंवा सीआर-7 विश्वातील सर्वात जुनी आकाशगंगा मानली जाते.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.