Current Affairs of 24 January 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (24 जानेवारी 2017)
प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी :
- प्रजासत्ताकदिनी प्लास्टिक राष्ट्रध्वजाच्या वापरावर शासनाने बंदी घातली आहे.
- राष्ट्रध्वजाचा मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
- प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे.
- तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971 नुसार कारवाई होते.
Must Read (नक्की वाचा):
प्रणाली राऊत यांना ‘सखी सम्राज्ञी’चा किताब :
- लोकमत सखी मंच व पीपीआरएल ‘मेरा घर’ प्रस्तुत पॉवर्ड बाय दि जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेतर्फे आयोजित राज्यस्तरीय सखी सम्राज्ञी महाअंतिम सोहळ्यात नागपूरच्या प्रणाली राऊत यांनी बाजी मारत यंदाच्या ‘सखी सम्राज्ञी‘चा किताब पटकविला.
- जळगावच्या डॉ. करिष्मा सांखला या व्दितीय तर अहमदनगरच्या शोभा ढेरे या तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.
- अकोला येथील डिंपल वानखेडे या उत्कृष्ट कलाविष्कार तर माधवी धसे सर्वोत्कृष्ट वेशभूषा स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या.
- महाराष्ट्रातील 12 विजेत्या स्पर्धकांची सखी सम्राज्ञी ही राज्यस्तरीय महाअंतिम फेरी 21 जानेवारी रोजी येथील बालगंधर्व खुल्या नाट्यगृहात बहारदार सोहळ्याने रंगली होती.
- कर्करोगाशी झुंजणाऱ्या मिसेस वर्ल्ड नमिता कोहोक यांनी सखींशी संवाद साधताना जीवनातील चढ-उतारांविषयी गप्पा मारल्या.
- प्रणाली राऊत (नागपूर) यांचा सखी सम्राज्ञीचा मुकुट घालून 11 हजार रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व गळ्यात सॅश घालून गौरव करण्यात आला.
रिना मित्रा अंतर्गत सुरक्षा विभागाच्या नव्या सचिव :
- वरिष्ठ आयपीएस अधिकारी रिना मित्रा यांची गृहमंत्रालयाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सध्या सीमा सुरक्षा दलाच्या विशेष महासंचालक आहेत. त्या मध्यप्रदेशच्या 1983 च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत.
- एम.के. सिंगला हे या महिनाअखेर निवृत्त होत असून त्यांच्या जागी मित्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- दरम्यान, विदेश सचिव एस. जयशंकर यांना 28 जानेवारी 2018 पर्यंत एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ 28 जानेवारी रोजी संपणार होता.
- तसेच आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव शक्तिकांत दास यांनाही 31 मे 2017 पर्यंत तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
तामिळनाडूत जलिकट्टू विधेयकाला मंजुरी :
- तामिळनाडू विधानसभेच्या विशेष सत्रात जलिकट्टू विधेयकाला 23 जानेवारी मंजुरी देण्यात आली.
- तामिळनाडूनमध्ये अनेक ठिकाणी जलिकट्टूच्या समर्थनासाठी आंदोलन सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर जलिकट्टू विधेयकासाठी येथील विधानसभेत विशेष अधिवेशन बोलविण्यात आले. या अधिवेशनाच्या विशेष सत्रात अवघ्या काही मिनिटातचं जलिकट्टू विधेयकाला एकमताने मंजूरी देण्यात आली.
- तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी 21 जानेवारी रोजी जलिकट्टू अध्यादेशाला मंजूरी दिली होती.
- दरम्यान, जलिकट्टू खेळावरील बंदी हटविण्यात आल्यानंतर सुद्धा चेन्नई येथील मरीना बीचवर आंदोलकांनी ठाण मांडला होता. तसेच, काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले.
मॉरिशसचे नवे पंतप्रधान प्रवीण्ड जगन्नाथ :
- भारतीय वंशाचे अनिरुद्ध जगन्नाथ यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानपदाचा 23 जानेवारी रोजी राजीनामा दिला आणि पंतप्रधानपदाची सूत्रे त्यांचे पुत्र प्रवीण्ड जगन्नाथ यांच्याकडे सोपविली.
- अनिरुद्ध जगन्नाथ यांनी राजीनाम्यानंतर संसदेच्या निवडणुका जाहीर कराव्यात, अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र ती अमान्य करण्यात आली.
- अनिरुद्ध जगन्नाथ (वय 86) यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र राष्ट्रपतींना सादर केले. तिथे राष्ट्रपतीपद हे शोभेचे असते.
- मात्र राजीनामा त्यांच्याकडेच द्यावा लागतो. त्यांच्या राजीनाम्यानंतर प्रवीण्ड जगन्नाथ यांच्या पंतप्रधान म्हणून नियुक्तीचे पत्र राष्ट्रपती अमीनाह फिरदोस गुरीब-हकीम यांनी लगेचच जारी केले.
- नवीन रक्ताला वाव देण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे मावळत्या पंतप्रधानांनी जाहीर केले. त्यांचे पुत्र प्रवीण्ड (वय 55) हे सध्या तेथील अर्थमंत्री होते.
दिनविशेष :
- 24 ते 26 जानेवारी हे शारीरिक शिक्षक दिन म्हणून साजरा करतात.
- 24 जानेवारी 1950 रोजी ‘जन गण मन’ या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.
- मुंबई मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेचा 24 जानेवारी 1996 रोजी प्रारंभ झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा