Current Affairs of 23 June 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (23 जून 2016)

चालू घडामोडी (23 जून 2016)

भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने नवा इतिहास घडविला  :

 • भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) येथील सतीश धवन अंतराळ तळावरून एकाच अग्निबाणाने एकाच वेळी तब्बल 20 उपग्रहांचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण करून (दि.22) नवा इतिहास रचला.
 • तसेच या उपग्रहांमध्ये ‘इस्रो’चा स्वत:चा ‘कार्टोस्टॅट-2’ या मालिकेतील उपग्रह व चेन्नई येथील सत्यभागा विद्यापीठाचा ‘सत्यभामा सॅट’ व पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचा ‘स्वयम’ हे तीन उपग्रह भारतीय होते.
 • इतर 17 उपग्रह विदेशी सरकारे किंवा खासगी संस्थांचे होते व त्यांचे प्रक्षेपण व्यापारी तत्त्वावर करण्यात आले.
 • ‘इस्रो’च्या अत्यंत विश्वासार्ह व ‘वर्कहॉर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएसएलव्ही-सी 34 या अग्निबाणाने त्याच्या सलग 35 व्या सफल उड्डाणात ही गौरवास्पद कामगिरी फत्ते केली.
 • हवाई तळाच्या दुसऱ्या लॉन्चपॅडवरून हा अग्निबाण ठरल्या कार्यक्रमानुसार (दि.22) सकाळी 9.26 या अचूक वेळेला झेपावला अवघ्या 26 मिनिटांत त्याने सर्व 20 उपग्रह पृथ्वीपासून 503 किमी अंतरावर ठरल्या क्रमाने व ठरल्या अंतरांवर ‘सन सिंक्रोनस ऑर्बिट’ म्हणजे सूर्याच्या स्थितिक कक्षेत स्थापित केले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 जून 2016)

एनआयटीकडून एक नवी सुरक्षा प्रणाली विकसित :

 • सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर फोटोंशी ‘खेळ’ (फेरफार) करून ‘मॉर्फ’ इमेज पोस्ट करणे आता शक्‍य होणार नाही.
 • हॅकर्सकडून होणारा हा प्रकार थांबविण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी गोवा मार्फत एक नवी सुरक्षा प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
 • तसेच यामुळे हॅकर्सच्या अडचणी वाढणार असून, यूजर्सना मात्र मोठा दिलासा मिळणार आहे.
 • एनआयटीने तयार केलेली ही यंत्रणा असे आक्षेपार्ह फोटो तयार करणाऱ्या हॅकर्सची ओळख पटविण्याचे काम करणार असून, ती यूजर्सनाही लगेचच याची माहिती देणार असल्याने हा फोटोंचा ‘खेळ’ लवकरच कमी होईल.
 • तसेच, या यंत्रणेत असे फेरफार झालेले फोटो आढळल्यास ते ब्लॉक करण्याचीही सोय आहे.
 • कधी कधी तुमचे मित्र-मैत्रिणीही थट्टा म्हणून असे प्रकार करतात, त्यामुळे ज्याच्या फोटोत फेरफार करण्यात आला आहे; त्याच्या परवानगीनेच असे फोटो अपलोड करायचे स्वातंत्र्य इतरांना राहील, असे मत संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे सहायक प्राध्यापक चिराग नवीनचंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

भारताचा झिम्बाब्वेवर तीन धावांनी विजय :

 • टी-20 मालिकेच्या तिस-या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 3 धावांनी पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली.
 • तसेच या सामन्यात भारताने झिम्बाब्वेला 139 धावांचे आव्हान दिले. याचा सामना करताना झिम्बाब्वे चांगली खेळी केली.
 • मात्र शेवट्या फळीत भारताने दिलेले आव्हान पूर्ण करता आले नाही. अवघ्या तीन धावांनी पराभव स्विकारावा लागला.
 • या सामन्यात झिम्बाब्वेने 20 षटकात सहा बाद 135 धावा केल्या. 

अ‍ॅथलिट अंजू बॉबी जॉर्जने दिला राजीनामा :

 • विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणारी भारताची एकमेव महिला अ‍ॅथलिट अंजू बॉबी जॉर्ज हिने केरळ राज्य क्रीडा परिषदेच्या अध्यक्षपदाचा (दि.22) राजीनामा दिला.
 • अंजू बॉबी जॉर्जने येथे एका पत्रकार परिषदेत केरळ राज्य क्रीडा परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. तिच्याबरोबरच परिषदेतील 13 सदस्यांनीही राजीनामा दिला.
 • केरळचे क्रीडामंत्री ई. पी. जयराजन यांचा अपमान केल्याचा आरोप अंजूवर आहे.
 • त्याचप्रमाणे जयराजन यांनी अंजूवर अध्यक्षपदाच्या रूपात आर्थिक गैरव्यवहार करण्याचा कथित आरोप केला.
 • तसेच याविषयी अंजूने म्हटले, खेळ एखादी पार्टी अथवा राजकीय व्याप्तीच्या बाहेर आहे.
 • मला क्रीडा परिषदेचा अध्यक्ष बनण्याची संधी मिळाली होती, याचा मला आनंद होता; परंतु दुर्दैवाने जे काम व्हायला हवे होते ते झाले नाही. त्यामुळे मी आपल्या पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.
 • अंजूला ओमन चंडी यांच्या नेतृत्वाखालील याआधीच्या यूडीएफ सरकारने क्रीडा परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्त केले होते.
 • क्रीडा परिषदेच्या अन्य सदस्यांत भारतीय राष्ट्रीय हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेश, व्हॉलीबॉलपटू टॉम जोसेफ आणि अ‍ॅथलिट प्रीजा श्रीधरन यांचा समावेश आहे.

भारताला NSG च्या सदस्यत्वासाठी फ्रान्सकडून पाठिंबा :

 • भारताला आण्विक पुरवठादार समूहाच्या (NSG) सदस्यत्वाला फ्रान्सने पाठिंबा दर्शविला आहे.
 • (दि.23) सेऊलमध्ये होणा-या 48 देशांच्या बैठकीत आण्विक पुरवठादार समूहाचे सदस्यत्व असलेल्या इतर देशांना भारताला समर्थन देण्यासाठी फ्रान्स आवाहन करणार असल्याचे, फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
 • भारताच्या आण्विक पुरवठादार समूहाच्या (NSG) सदस्यत्वाला चीनने विरोध केला असून हा विरोधाला मोडून काढण्यासाठी भारताने इतर देशांना यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून वस्त्रोद्योगासाठी विशेष पॅकेजला मंजुरी :

 • वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने (दि.22) वस्त्रोद्योग क्षेत्रातील रोजगारनिर्मिती व निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पॅकेजला मंजुरी दिली.
 • केंद्रीय मंत्रिमंडळाने या पॅकेजवर शिक्कामोर्तब केले. सहा हजार कोटी रुपयांच्या या पॅकेजमुळे येत्या तीन वर्षांत एक कोटी रोजगार तयार होतील, असा आशावाद सरकारतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वस्त्रोद्योग व परिधान क्षेत्रातील पॅकेजच्या मंजुरीसह, पाटणा (बिहार) येथे गंगा नदीवरील महात्मा गांधी पुलाची पुनर्बांधणी, कर्नाटकमधील हुबळी-होस्पेटदरम्यान राष्ट्रीय महामार्ग 63 चे चौपदरीकरण आदी निर्णयांनाही हिरवा कंदील दाखविण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 जून 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.