Current Affairs of 22 June 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (22 जून 2016)

चालू घडामोडी (22 जून 2016)

व्हर्सिटी ग्रंथालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव :

  • जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील व्हर्सिटी केंद्रीय ग्रंथालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात येणार आहे. याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) मागणी केली होती.
  • अभाविपने जेएनयूतील डाव्या गटांसोबत वैचारिक लढाई आणखी तीव्र केली असून, त्याचाच भाग म्हणून व्हर्सिटी ग्रंथालयाला बाबासाहेबांचे नाव देण्याची मागणी केली होती.
  • तसेच एप्रिलमध्ये जेएनयू कॅंपसमध्ये भारतीय संविधानाची प्रतिकृती बसविण्याची मागणीही अभाविपने केली होती.
  • व्हर्सिटी ग्रंथालय समितीने अभाविपच्या मागणीला मंजुरी देत याबाबतचा प्रस्ताव कार्यकारी समितीपुढे ठेवला आहे. याबाबतचा निर्णय विद्यापीठस्तरीय समिती घेणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 जून 2016)

‘वैद्यनाथ’ बँक निवडणुकीत पंकजा मुंडे विजयी :

  • वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 17 जागांवर पंकजा मुंडे पुरस्कृत लोकनेते गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनलने सरासरी दहा हजार मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळविला.
  • तसेच विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे पुरस्कृत वैद्यनाथ विकास पॅनलला एकही जागा मिळविता आली नाही.
  • (दि.21) रात्री 11 च्या सुमारास अंतिम मतमोजणी यादी जाहीर झाली.
  • खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी सर्वाधिक 13 हजार 367 मते मिळवली.

नगर जिल्ह्याच्या महापौरपदी सुरेखा कदम :

  • भारतीय जनता पक्षातील गांधी गटाच्या उमेदवार नंदा साठे यांनी महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा कदम यांची महापौरपदी, तर भाजपच्या श्रीपाद छिंदम यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.
  • महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक काही तासांवर आल्यानंतरही ‘कोणाच्या गळ्यात माळ पडणार,’ याची उत्कंठा कायम होती.   
  • महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक (दि.21) सकाळी 11 वाजता महापालिकेच्या सभागृहात पार पडली.

ब्लिट्स स्पर्धेत हरिका द्रोणावलीला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार :

  • रँडमास्टर हरिका द्रोणावली हिने कझाकिस्तानच्या युरासियान बिल्ट्स बुद्धिबळ स्पर्धेत सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पूरस्कार पटकावला.
  • भारताच्या दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूने 2500 डॉलर आणि 60 ईएलओ गुण मिळविले.
  • तसेच यासोबतच ती स्पर्धेत पहिल्या 10 खेळाडूंच्या यादीत सहभागी झाली.
  • हरिकाने गेल्या अठवड्यात हंगेरीच्या जलाकारोस आतंरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवातदेखील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता.
  • तसेच यात ती क्लासिकल रँकिंगच्या यादीत नवव्या स्थानावर होती.
  • हरिका आणि यिफान यांनी स्पर्धेच्या अखेरीस समान 12.5 गुण मिळविले होते आणि तिने टायब्रेकरमध्ये विजय मिळविला.

कर चुकविणाऱ्यांचे पॅनकार्ड होणार ब्लॉक :

  • कर चुकविणाऱ्यांना आळा घालण्यासाठी प्राप्तिकर विभागाने त्यांचा पॅन क्रमांक ‘ब्लॉक’ करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • त्याशिवाय, त्यांना सिलिंडरसाठी मिळणारे अनुदान रोखण्याचा विचार असून त्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळू नये, अशी सोय करण्यात येणार आहे.
  • कर बुडवून सरकारला फसविणाऱ्या व्यक्तींना रोखण्यासाठी प्राप्तिकर विभागाने आपल्या अहवालात हे उपाय सुचविले आहेत.
  • तसेच याअंतर्गत, प्राप्तिकर विभागाकडून ब्लॉक करण्यात आलेल्या पॅन क्रमांकांची यादी प्रॉपर्टी रजिस्ट्रारकडे पाठवली जाईल व त्यांना संबंधित व्यक्तींच्या कोणत्याही मालमत्तेची नोंदणी नाकारण्याची विनंती केली जाईल.
  • अशा व्यक्तींच्या बँक खात्यात जमा होणारे सिलिंडर अनुदान बंद करण्याची शिफारस अर्थ मंत्रालयाकडे केली जाणार आहे.
  • सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून मिळणारी कर्जे, ओव्हरड्राफ्ट सुविधादेखील बंद करण्यात येईल.
  • सोबतच, देशाच्या कोणत्याही भागात या लोकांना मिळणाऱ्या कर्ज किंवा अनुदान सुविधा थांबविण्यासाठी प्राप्तिकर कार्यालयांमध्ये या माहितीचा प्रसार केला जाणार आहे.

बॅडमिंटनपटू अनुरा प्रभुदेसाईला कांस्यपदक :

  • गोव्याची स्टार बॅडमिंटनपटू अनुरा प्रभुदेसाई हिने ज्युनिअर रँकिग बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी गटात कांस्यपदक पटकावले. ही स्पर्धा बंगळुरु येथे झाली.
  • स्पर्धेत तिने पश्चिम बंगालच्या रिया मुखर्जीसोबत खेळताना ही कामगिरी केली.
  • स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन प्राप्त या जोडीने उपांत्यपूर्व फेरीत काव्या गांधी आणि खुशबू कुमार या जोडीचा 21-17, 21-14 ने पराभव केला.
  • तसेच महिमा अग्रवाल आणि शिखा गौतम या अव्वल मानांकित जोडीकडून उपांत्य सामन्यात त्यांना 21-13, 21-12 अशा फरकाने पराभूत व्हावे लागले.

दिनविशेष :

  • 1757 : प्लासीची लढाई, या लढाईत विजय मिळाल्याने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला.
  • 1908 : डॉ. विष्णू भिकाजी कोलते, महानुभाव साहित्य संशोधक यांचा जन्म.
  • 1978 : प्लुटोचा उपग्रह चारोनचा शोध लागला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 जून 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.