Current Affairs (चालू घडामोडी) of 22 December 2014 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. युजीसीच्या शिष्यवृतींमध्ये वाढ
2. राजिंदर खन्ना ‘रॉ’ चे प्रमुख
3. रिचर्ड वर्मा अमेरिकेचे भारतातील राजदूत

युजीसीच्या शिष्यवृतींमध्ये वाढ :

  • विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यर्थ्यांना देण्यात येणार्‍या सोळा प्रकारच्या शिष्यवृत्तींमध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या जवळपास 50% वाढ केली आहे.
  • डिसेंबर पासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
  • याचा फायदा उच्च शिक्षण घेणार्‍या गुणवंत तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना होणार आहे.

राजिंदर खन्ना ‘रॉ’ चे प्रमुख :

  • भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’च्या प्रमुखपदी विभागाचे विशेष सचिव राजिंदर खन्ना यांची शनिवारी नियुक्ती करण्यात आली.
  • केंद्रीय गृहमंत्रालय विशेष सचिव म्हणून कार्यरत असलेल्या प्रकाश मिश्रा यांची केंद्रीय राखीव पोलीस दलाचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली आहे.
  • ‘रॉ’ अर्थात रिसर्च अँड अॅनालिसिस विंग ही भारताची देशाबाहेरील गोपनीय माहिती गोळा करणारी संस्था असून सीआरपीएफ हे जगातील सर्वात मोठे निमलष्करी दल आहे.
  • सीआरपीएफकडे सुमारे तीन लाख जवान आहेत.

रिचर्ड वर्मा अमेरिकेचे भारतातील राजदूत :

  • भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक रिचर्ड राहुल वर्मा यांनी शनिवारी भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून शपथ घेतली.
  • अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी वर्मा यांना शपथ दिली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.