Current Affairs of 21 March 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (21 मार्च 2016)
योगेश्वर दत्तला ऑलिम्पिक कोटा मिळाला :
- देशाचा दिग्गज मल्लांमध्ये गणल्या जाणारा आणि रियोत भारताच्या पदकाचे आशास्थान असणाऱ्या योगेश्वर दत्तने कजाकिस्तानच्या अस्ताना येथे सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक क्वॉलीफाइंग स्पर्धेच्या फ्री स्टाईलच्या 65 किलो वजन गटाच्या फायनलमध्ये जागा मिळविली आणि त्याचबरोबर त्याने (दि.19) रिओ ऑलिम्पिकचा कोटाही मिळवला.
- योगेश्वर आता सुवर्णपदकासाठी चीनच्या कताई यिरानबिएक याच्याशी दोन हात करेल, कताईने उपांत्य फेरीत अॅडम बातिरोव याचा 6-1 असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली.
- 2012 च्या लंडन ऑलिम्पिकच्या कास्यपदक विजेत्या योगेश्वरने क्वालिफिकेशन राऊंडमध्ये जू सोंग किम याचा 8-1 असा पराभव केला आणि उपांत्यपूर्व फेरीत व्हिएतनामच्या युआन दिन्ह एनगुएन याचा 12-2 असा पराभव केला.
- लयीत दिसणाऱ्या योगेश्वरने कोरियाच्या सियुंगचुल ली याचे 7-2 असे आव्हान मोडीत काढताना दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली.
- रिओ ऑलिम्पिकचे तिकीट पक्के करणारा योगेश्वर हा भारताचा दुसरा मल्ल ठरला, याआधी नरसिंह यादव याने ऑलिम्पिक कोटा मिळवला होता.
- रिओ ऑलिम्पिकसाठी योगेश्वर दत्त (65 किलो) याच्या आधी नरसिंह यादवने 74 किलो फ्री स्टाईल प्रकारात कोटा प्राप्त केला होता.
- 2012 च्या लंडन ऑलिम्पिकसाठी भारताचे चार पुरुष आणि एक महिला पहिलवान पात्र ठरले होते.
Must Read (नक्की वाचा):
महाभारत खंडांचे पुनर्मुद्रण होणार :
- भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने संपादित केलेली ‘महाभारत’ची संशोधित आवृत्ती इतिहास अभ्यासक, तज्ज्ञ आणि संशोधकांसाठी प्रमाण मानली जाते.
- तसेच या आवृत्तीच्या 19 खंडांना अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर मागणी होती, मात्र, निधीअभावी त्याचे पुनर्मुद्रण करणे संस्थेला शक्य नव्हते.
- दानशूर व्यक्तींकडून महाभारताच्या पुनर्मुद्रणासाठी संस्थेला आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळे या सर्व खंडांच्या पुनर्मुद्रणाचे काम संस्थेने हाती घेतले आहे.
- अनेक प्रकाशित पोथ्या वाचून त्याची वर्गवारी करून संशोधनाच्या शास्त्रीय पद्धतीतून महाभारताचा पहिला खंड 1941 मध्ये प्रकाशित करण्यात आला.
- तसेच त्यानंतर दुसरा खंड 1943 मध्ये प्रसिद्ध झाला. या दोन्ही खंडांचे संपादन व्ही. एस. सुकथनकर यांनी केले होते.
- हा शेवटचा खंड श्रीपादकृष्ण बेलवलकर यांच्या संपादकीय मार्गदर्शनातून 1966 मध्ये प्रकाशित करण्यात आला.
20 मार्च जागतिक चिमणी दिन :
- 20 मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो.
- आपल्या घरात, अंगणात, बिनधास्तपणे वावरणारी चिमणी गायब झाली आहे.
- पुर्वीच्या काळी शहरासह ग्रामीण भागात मातीची घरे होती.
- मात्र बदलत्या काळानुसार मातीची घरे जमीनदोस्त झाल्याने सिमेंट कॉंक्रिटची जंगले उभी राहिली.
- शहरातील झाडे मोठया प्रमाणात तोडली या वन बीएचकेच्या जंगलात चिमण्यांना घरटी बांधायला जागाच उरली नाही.
- तसेच याचा परिणाम म्हणून चिमण्यांची संख्या हळूहळू कमी झाली.
- शहरीकरणामुळे मोठया प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे विणीच्या हंगामात घरटे बांधून अंडी घालण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नाही.
19 मार्चला जगभरात ‘वसुंधरा दिन’ साजरा:
- पृथ्वीच्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर (दि.19) जगभर ‘वसुंधरा दिन’ पाळण्यात आला.
- तसेच यानिमित्ताने जगाच्या विविध भागांत काही वेळ दिवे मालवून हवामान स्वच्छ ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
- जगाशी जोडून घेण्यासाठी आपण वावरत असलेल्या अत्याधुनिक उपकरणांमुळेही पृथ्वीचे तापमान वाढत चालल्याचे एका ताज्या अभ्यासात आढळून आले आहे, बदलत्या हवामानामुळे पृथ्वीचे अस्तित्व संकटात आले आहे.
- पृथ्वी वाचविण्यासाठी जगभर 19 मार्चला ‘वसुंधरा दिन’ साजरा केला जातो.
- तसेच यानिमित्ताने जागतिक समुदायांत जनजागृती करण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू एफ आणि स्वयंसेवी संघटना यांच्यातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
- आयफेल टॉवर ते एम्पायर स्टेट बिल्डिंग आणि तैपेयी येथे आणि इतरत्र स्थानिक वेळेनुसार रात्री 8.30 वाजता तासाभरासाठी दिवे बंद करण्यात आले.
पीपीएफ, किसान विकासपत्र यांचा व्याजदर कमी :
- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, किसान विकास पत्र यासारख्या अल्पबचत गुंतवणुकीवरील व्याजदर सरकारने कमी केले असून ते 8.7 टक्क्य़ांवरून 8.1 टक्क्यांवर आले आहेत.
- 16 फेब्रुवारीला हा निर्णय घेण्यात आला होता त्याची अंमलबजावणी आता होणार आहे.
- प्रत्येक तिमाहीसाठी बदलते व्याजदर राहण्याची शक्यता असून 1 एप्रिल ते 30 जून या पहिल्या तिमाहीसाठी व्याज दर 8.1 टक्के राहणार आहे.
- किसान विकासपत्रावरील व्याज दर 8.7 टक्के आहे तो 7.8 टक्के केला आहे.
- टपाल अल्पबचत योजनात व्याजदर 4 टक्के आहे तो तेवढाच राहील.
- नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवरचा दर 8.1 टक्के राहील तो सध्या 8.5 टक्के होता.
- पाच वर्षांच्या मासिक उत्पन्न योजनेत व्याजदर 8.4 टक्के होता तो 7.8 टक्के केला आहे.
- सुकन्या समृद्धी योजनेत व्याज दर 9.2 टक्के होता तो 8.6 टक्के केला आहे.
- ज्येष्ठ नागरिक योजनेत पाच वर्षांच्या मुदतीसाठी व्याजदर 9.3 टक्के होता तो 8.6 टक्के केला आहे.
- टपालाच्या एक वर्षांच्या मुदत ठेवीसाठी 8.4 टक्के व्याजदर होता तो आता एक वर्षांसाठी 7.1 टक्के, दोन वर्षांसाठी 7.2 टक्के तर तीन वर्षांसाठी 7.4 टक्के राहील.
- पाच वर्षांच्या ठेवीसाठी 8.5 टक्के व्याजदर होता तो 7.9 टक्के केला आहे.
- पुनरावर्ती ठेवीसाठी 8.4 टक्के व्याजदर होता तो 7.4 टक्के केला आहे.
दिनविशेष :
- 1916 : बिस्मिल्ला खाँ, भारतीय सनईवादक यांचा जन्म.
- 1992 : भारताची ‘शंकूल’ ही दुसरी पाणबुडी नौदलात सामील झाली.
- पृथ्वी दिन.
- जागतिक वनदिन.
- ऑस्ट्रेलिया सलोखा दिन.
- नामिबिया स्वातंत्र्य दिन.
- विश्व वंशभेद निर्मूलन दिवस.
- दक्षिण आफ्रिका मानवी हक्क दिन.
- संयुक्त राष्ट्रे वंशभेद निर्मूलन दिन.
- इजिप्त, लेबेनॉन, जॉर्डन मातृ दिन.
- रात्र-दिवस समान असणारा दिवस आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा