Current Affairs (चालू घडामोडी) of 20 December 2014 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. जयंत नारळीकरांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर 
2. राज्यातील भ्रष्ट शहरांच्या यादीत पुणे पहिला 
3. जगातील सर्वाधिक परफोर्मिंग नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी दुसरे
4. राजीव गांधी योजनेस आता दीनदयाल उपाध्याय यांचे नाव 

 

जयंत नारळीकरांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर :

  • ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला.
  • देशातील साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील प्रातिष्ठीत समजला जाणार्‍या साहित्य अकादमी पुरस्काराची शुक्रवारी घोषणा करण्यात आली.
  • चार नगरातले माझे विश्व‘ या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार करण्यात आला.
  • तसेच माधवी सरदेसाय यांना कोकणी भाषेतील मंथन या लेखसंग्रहासाठी गौरवण्यात येणार आहे.

राज्यातील भ्रष्ट शहरांच्या यादीत पुणे पहिला :

  • राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पुणे शहरात सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणे दाखल झाली आहेत.
  • पुण्यानंतर नाशिक व बॉम्बे च क्रमांक लागतो.

जगातील सर्वाधिक परफोर्मिंग नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी दुसरे :

  • जपानच्या रिसर्च कंपनीच्या सर्वेक्षणानुसार नरेंद्र मोदी हे जगातील दुसरे सर्वाधिक परफोर्मिंग नेते ठरले आहेत.
  • चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे यादीत अव्वल स्थानावर आहेत.
  • टोकियोतिल एका रिसर्च कंपनीने जगातील टॉप 30 परफोर्मिंग नेत्यांची यादी तयार केली आहे.

राजीव गांधी योजनेस आता दीनदयाल उपाध्याय यांचे नाव :

  • राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेस (आरजीजीव्हीवाय) दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना असे नाव देण्यात आले.
  • ‘निर्मल भारत अभियान‘ ऐवजी ‘स्वच्छं भारत मिशन‘ (ग्रामीण) असे नाव देण्यात आले आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.