Current Affairs of 2 May 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (2 मे 2018)

चालू घडामोडी (2 मे 2018)

देशातील पहिल्या फ्लोटिंग एलनजी टर्मिनलचे उद्घाटन :

 • जयगड बंदरात सुरु झालेल्या एलएनजी टर्मिनलमुळे देशाला नवी व्यवस्था मिळाली आहे, या प्रकल्पामुळेच भविष्यात दाभोळ गॅस प्रकल्प बारमाही चालेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
 • एच एनर्जीच्या वतीने जेएसडब्ल्यू जयगड बंदरात देशातील पहिले एफएसआरयुवर आधारित एलएनजी टर्मिनल सुरु करण्यात आले आहे.
 • तसेच यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन हिरानंदानी यांचे कौतुक करताना सांगितले की देशातला पहिला प्रकल्प जयगड बंदरात उभा राहत आहे.. 17 महिन्यात फ्लोटिंग टर्मिनल रुपात उभे केले.
 • देशाला एलएनजीची आवश्यकता असल्याचे सांगत 2030 पर्यंत संपूर्ण देशात क्लीन फ्लूएल वापरण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्णत्वास जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 मे 2018)

ताजमहालाच्या संरक्षणासाठी पुढाकारची आवश्यकता :

 • जगातील सात आश्‍चर्यांमध्ये गणना केली जाणाऱ्या आग्रा येथील ताजमहालाच्या रंगात झालेल्या बदलाबाबत सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने देश-विदेशांतील तज्ज्ञांची मदत घ्यावी आणि डागडुजी करण्यासाठी पावले उचलावीत, अशी सूचनाही न्यायालयाने केली.
 • पर्यावरण संवर्धन कार्यकर्ते एम.सी. मेहता यांनी या विषयावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आग्रा परिसरातील कारखान्यांमधून होणारे वायू व जलप्रदूषण आणि अनिर्बंध वृक्षतोडीमुळे ताजमहालाला धोका निर्माण झाला आहे.
 • त्यापासून या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण करावे, अशी मागणी त्यांनी केली असून काही छायाचित्रेही सादर केली आहेत. न्यायालयाने ही छायाचित्रे पाहिली आणि केंद्र सरकारची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ए.एन.एस. नाडकर्णी यांना ताजमहालाचा रंग का बदलला, अशी विचारणा केली. या स्मारकाचा रंग पहिल्यांदा पिवळसर आणि आता करडा व हिरवट झाला आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
 • भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातर्फे ताजमहालाची देखभाल केली जाते, असे नाडकर्णी यांनी सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 मार्चला होणार आहे.

कांदळी ही राज्यातील पहिली ऑनलाईन ग्रामसभा :

 

 • कांदळी (ता.जुन्नर) येथे 1 मे रोजी राज्यातील पहिली ऑन लाईन ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेच्या विषय पत्रिकेतील 24 विषयांवर 250 हून अधिक नागरिकांनी ऑनलाईन संपर्क साधत सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे सरपंच विक्रम भोर यांनी सांगितले.
 • ऑनलाईन ग्रामसभेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार शरद सोनवणे, गटविकास अधिकारी सतीश गाढवे, तहसिलदार किरण काकडे तसेच आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
 • ‘ज्या नागरिकांना ग्रामसभेला प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नाही त्यांना आपल्या समस्या, प्रश्न मांडता यावेत यासाठी ऑनलाइन ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.  
 • ग्रामपंचायतीने एक ऍप तयार केले आहे. यात ग्रामपंचायतीची सर्व माहिती देण्यात आली आहे. ग्रामसभेच्या वेळेस ज्या ग्रामस्थास सहभाग घ्यायचा असेल त्यांनी ऍप डाऊनलोड करुन घेतले तर प्रत्यक्ष ग्रामसभा सुरु असताना सभेत जे काही प्रश्न उपस्थित होतील ते दिसतील त्यात हो किंवा नाही अशा स्वरूपात उत्तर नोंदविता येणार आहेत. गावातील एकूण एक हजार 700 खातेदार असून आजपर्यंत 1077 जणांनी ऐप डाउनलोड करून घेतले आहे.

आता सिम कार्ड घेण्यासाठी आधार कार्डची सक्ती नाही :

 • तुम्हाला मोबाइलचे नवे सिम कार्ड घ्यायचे असेल तर आधार कार्ड बंधनकारक होते. मात्र केंद्र सरकारने हा नियम शिथील केला असून आता मोबाइलचे सिम कार्ड घेण्यासाठी आधार कार्डची आवश्यकता नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
 • मोबाइल ऑपरेटर कंपन्या ग्राहकांकडून ओळख पत्र म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा मतदान ओळख पत्र यांचाही स्वीकार करू शकतात असेही केंद्राने स्पष्ट केले आहे. टेलिकॉम सचिव अरूण सुंदराजन यांनी सांगितले आहे की मोबाइल कंपन्यांनी या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी.
 • ग्राहकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून या नव्या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करण्यात आल्याचेही सुंदराजन यांनी स्पष्ट केले.
 • सगळ्या टेलिकॉम कंपन्यांना असा आदेश देण्यात आले आहेत की ज्या व्यक्तीकडे आधार कार्ड नाही त्या व्यक्तीलाही सिम कार्ड दिले जावे. फक्त आधार कार्ड नाही हे कारण देऊन ग्राहकाला सिम कार्ड देण्यास मनाई करू नये. केवायसी अर्थात नो युअर कस्टमर चा अर्ज भरून घेताना त्यासोबत ओळखपत्र म्हणून इतरही पर्याय स्वीकारण्यास हरकत नाही असेही कोर्टाने म्हटले आहे.

विमान प्रवासादरम्यान इंटरनेट वापराला मंजुरी :

 • विमान प्रवासादरम्यान मोबाईल सेवा ‘कनेक्टिव्हिटी’ला 1 मे रोजी दूरसंचार आयोगाने सशर्त मंजुरी दिली. यामुळे आता विमान सुरु असताना प्रवाशांना आपला फोन फ्लाईट मोडवर टाकण्याची गरज पडणार नाही. उलट ते फोनवरून कॉल करु शकतील तसेच त्यांना इंटरनेटचा वापरही करता येणार आहे. दूरसंचार आयोगाच्या बैठकीत याला मंजूरी देण्यात आली.
 • येत्या तीन ते चार महिन्यांत या सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. केवळ भारतीय हवाई हद्दीतच याचा वापर करता येणार असून विमानाने 3000 मीटर्सची उंची गाठल्यानंतरच ही कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे.
 • विमानाने उड्डाण केल्यानंतर केवळ चार ते पाच मिनिटांतच 3000 मीटर्सची उंची गाठते. या सेवेसाठी सर्विस प्रोव्हायडर्सना वर्षासाठी 1 रुपया प्रतिवर्ष या प्रमाणे फी आकारली जाणार आहे. मात्र, त्यासाठी ट्रायच्या कायद्यात सुधारणा करावी लागणार आहे.

शाहझार रिझवी जागतिक तिरंदाजी क्रमवारीत अव्वल :

 • भारतीय तिरंदाज शाहझार रिझवी याने 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय तिरंदाजी फेडरेशनच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली.
 • कोरिया येथे नुकत्याच पार पडलेल्या तिरंदाजी विश्वचषकात 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात त्याने रौप्यपदक पटकावले. या कामगिरीमुळे 1654 रेटिंग पॉईंट्ससह शाहझार जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला. त्याने रशियाच्या आर्टम चेर्नोसोव्ह (1046) आणि जपानच्या टोमोयुकी मत्सुदा (803) यांना मागे टाकले.
 • शाहझारने या आधी मार्चमध्ये मेक्सिकोत झालेल्या विश्वचषकात विश्वविक्रम करत सुवर्ण पदक पटकावले होते. शाहझार व्यतिरिक्त ‘टॉप 10’ मध्ये जितू राय या भारतीय तिरंदाजाचा समावेश आहे. तर ओम प्रकाश मिठरवाल याला 12व्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. 

दिनविशेष :

 • मराठी चित्रपटसृष्टी चे चित्रमहर्षी ‘भालजी पेंढारकर’ यांचा जन्म 2 मे 1899 मध्ये झाला.
 • 2 मे 1964 रोजी बँक ऑफ कराडचे बँक ऑफ इंडिया मधे विलिनीकरण झाले.
 • वेस्ट इंडीजचा प्रख्यात क्रिकेटपटू ब्रायन लारा यांचा जन्म 2 मे 1969 रोजी झाला.
 • सन 1999 मध्ये 2 मे रोजी मीरा मोस्कोसो पनामा देशाच्या अध्यक्ष म्हणून निवडलेल्या पहिल्या महिला ठरल्या.
 • एस.राजेन्द्रबाबू यांनी 2 मे 2004 रोजी भारताचे 34वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 मे 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.