Current Affairs of 2 May 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (2 मे 2016)
एलपीजी कनेक्शनसाठी ‘उज्ज्वला’ योजनेचा प्रारंभ :
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पाच कोटी एलपीजी कनेक्शन (घरगुती गॅस) देण्यासाठी आठ हजार कोटी रुपयांच्या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (दि.1) उद्घाटन केले.
- तसेच यापूर्वीच्या सरकारांनी गरिबांच्या घरांऐवजी मतपेटींवर लक्ष केंद्रित करीत निव्वळ घोषणा दिल्या होत्या, असा आरोप करतानाच त्यांनी जागतिक कामगारदिनानिमित्त ‘लेबर्स युनाइट द वर्ल्ड’ हा नारा दिला.
- कामगारदिनाचे औचित्य साधत त्यांनी उत्तर प्रदेशातील बलिया येथे उज्ज्वला योजनेचा प्रारंभ करताना त्यांनी रालोआ सरकारने कामगारांच्या कल्याणासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देत स्वत:ला कामगार क्रमांक एक असे संबोधले.
- पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील महिलांच्या नावे मोफत एलपीजी कनेक्शन पुरविले जातील.
- पहिल्यावर्षी दीड कोटी कनेक्शन दिले जातील, येत्या तीन वर्षांत पाच कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट गाठले जाईल.
- स्वातंत्र्यानंतरच्या 60 वर्षांत केवळ 13 कोटी गॅस कनेक्शन पुरविण्यात आल्याचे सांगत मोदींनी तुलनात्मक लेखाजोखा मांडला.
- 2016-17 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या योजनेसाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून कोणतेही रक्कम जमा न करता गरिबांना गॅस कनेक्शन मिळेल, अशी माहितीही त्यांनी दिली.
Must Read (नक्की वाचा):
विश्व तिरंदाजी स्पर्धेत भारताला एक रौप्य, दोन कांस्य :
- भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करीत चीनच्या शांघाय शहरात सुरू असलेल्या विश्व तिरंदाजी स्पर्धेत एक रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली.
- रिकर्व्ह प्रकारात जर्मनीवर सनसनाटी विजय नोंदवित अंतिम फेरीत दाखल झालेल्या महिला संघाला चायनीज तायपेईकडून 2-6 ने पराभवाचा धक्का बसताच रौप्यावर समाधान मानावे लागले.
- अनानू दास, जयंत तालुकदार आणि मंगलसिंग चम्पिया या त्रिकूटाने पुरुष रिकव्हर प्रकारात ब्रिटेनचा 6-0 ने पराभव करीत कांस्य जिंकले.
- मिश्र दुहेरीत स्टार दीपिका कुमारी आणि अतानू दास यांनी कोरियाच्या जोडीला मागे टाकून कांस्य जिंकले.
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा :
- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 56वा वर्धापन दिन (दि.1) राज्यभर ठिकठिकाणी ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
- मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी झालेल्या लढ्याच्या स्मृतींना उजाळा देत राज्य शासनासह विविध पक्ष व संघटनांनी ठिकठिकाणी समारंभांचे आयोजन केले.
- मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम झाला, त्या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
- मराठवाडा व विदर्भातील दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे, अशी ग्वाही राज्यपालांनी या वेळी केलेल्या भाषणात दिली.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौकातील स्मारकास पुष्पचक्र वाहून संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले.
- विधान भवनात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
राज्यात सर्वाधिक तापमान अकोला जिल्ह्यात :
- गेल्या 24 तासांत अकोल्याचे कमाल तापमान पुन्हा 45 अंशावर पोहोचले आहे.
- राज्यातील अन्य ठिकाणच्या तापमानाच्या तुलनेत अकोल्यात नोंदविण्यात आलेले तापमान सर्वाधिक आहे.
- दरम्यान, येत्या मंगळवार व बुधवारी विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
- एप्रिलमध्ये विदर्भातील सरासरी तापमान प्रचंड वाढले होते.
- मे महिना सुरू होताच या तापमानात आणखी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत अकोल्याचे तापमान 45 अंशावर पोहोचले.
- तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी हलक्या स्वरू पाचा पाऊस पडला.
- मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तर काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
गोव्याला पर्यटन विकासासाठी 100 कोटीचा निधी :
- जगभरातील पर्यटकांची पसंती असलेल्या गोव्यामध्ये राज्य सरकार वर्षभरात अनेक विकास प्रकल्प मार्गी लावणार आहे.
- केंद्र सरकारने त्यासाठी प्रथमच गोव्याला सुमारे 100 कोटींचा निधी दिला आहे.
- गोव्यात सागरी विमान सेवा मार्गी लावण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत.
- सागरी विमान प्रकल्पाचे एक प्रात्यक्षिकही पणजीत सरकारने करून पाहिले आहे.
- समुद्रावर उतरू शकणारे विमान हे देश-विदेशातून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरेल.
- केंद्र सरकारच्या परवानगीनंतर आम्ही सागरी विमान उपक्रम सुरू करू, असे गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष निखिल देसाई यांनी सांगितले.
- जमीन व पाण्यावर चालू शकतील, अशी तीन वाहने गोव्यातच तयार करण्यात आली आहेत.
- गोव्यातील प्रसिद्ध मांडवी नदीवर पणजीतील कांपाल किनारा ते रेईशमागूश किल्ल्याच्या बाजूला रोप वे प्रकल्प साकारणार आहे.
- अरबी समुद्राच्या किनारी आग्वाद तुरुंग असून कैद्यांचे नव्या तुरुंगात स्थलांतर करण्यात आले आहे.
- आग्वाद तुरुंगाचा वापर पर्यटनासाठी केला जाणार आहे, आग्वादच्या पट्ट्यात एका टर्मिनलचेही बांधकाम केले जाईल.
‘आधार’च्या उपक्रमाने जागतिक बँक प्रभावित :
- भारताने यशस्वीपणे राबविलेल्या ‘आधार’ उपक्रमाने जागतिक बँक प्रभावित झाली असून, या उपक्रमाच्या अनुभवाचा फायदा आफ्रिकी देशांसह अन्य देशात करून घेण्याचा विचार सुरू आहे.
- ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणा’चे महासंचालक डॉ. अजय भूषण पांडे यांनी एका मुलाखतीत सांगितले की, येथे जागतिक बँकेतील अधिकारी ‘आधार’च्या उपक्रमाने फारच प्रभावित झाले आहेत.
- आता या उपक्रमाचा फायदा अन्य देशातही करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी पांडे येथे आले आहेत.
- तसेच यावेळी झालेल्या चर्चेच्या आधारे त्यांनी ही माहिती दिली, ‘आधार’सारखा उपक्रम आपल्या देशात राबवू इच्छिणाऱ्या देशांच्या अधिकाऱ्यांशीही पांडे यांनी चर्चा केली.
- भारतात आतापर्यंत एक अब्ज लोकांना ‘आधार’मुळे ऑनलाइन ओळख मिळाली आहे.
दिनविशेष :
- 1920 : डॉ. वसंतराव देशपांडे, विख्यात गायक यांचा जन्म.
- 1921 : सत्यजित रे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रपट -दिग्दर्शक यांचा जन्म.
- 1969 : ब्रायन लारा, वेस्ट इंडिजचा माजी प्रख्यात फ़लंदाज याचा जन्म.
- पोलंड ध्वज दिन.
- ईराण शिक्षक दिन.
- ईंडोनेशिया शिक्षण दिन.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा