Current Affairs of 19 April 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (19 एप्रिल 2016)
पहिली भारतीय महिला ऑलिंपिक जिम्नॅस्टिक्स :
- दीपा करमाकरने (दि.18) ऐतिहासिक कामगिरी करताना ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारी पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट होण्याचा मान मिळवला.
- दीपाने येथे अखेरच्या पात्रता व चाचणी स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत रिओ ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले.
- 22 वर्षीय दीपाने एकूण 52.698 गुणांची कमाई करीत ऑगस्टमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये कलात्मक (आर्टिस्टिक) जिम्नॅस्टिकसाठी स्थान निश्चित केले.
- ऑलिम्पिकसाठी 52 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिम्नॅस्टिकमध्ये पात्रता गाठणारी दीपा पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
- भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 11 भारतीय पुरुष जिम्नॅस्टिकपटूंनी ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला.
- तसेच त्यापैकी 1952 मध्ये दोन, 1956 मध्ये तीन आणि 1964 मध्ये सहा खेळाडू सहभागी झाले होते.
- आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक महासंघातर्फे अधिकृतपणे जाहीर झालेल्या यादीमध्ये दीपाने रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली असल्याचे स्पष्ट केले आहे.
- जागतिक महासंघाने स्पष्ट केले, की रिओमध्ये जिम्नॅस्टिक चाचणी स्पर्धेत महिला पात्रता स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक महासंघाने (एफआयजी) रिओ 2016 ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवणाऱ्या देशांची व वैयक्तिक खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
Must Read (नक्की वाचा):
स्मार्ट सिटीअंतर्गत 51 प्रकल्प उभारणार :
- स्मार्ट सिटी योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या स्पेशल पर्पज व्हेईकलच्या (एसपीव्ही) माध्यमातून शहरात 51 प्रकल्पांची उभारणी होणार आहे.
- तसेच त्यातील 15 प्रकल्प येत्या 3 महिन्यांत सुरू करण्याचा निर्णय एसपीव्ही संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत घेण्यात आला.
- पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या दहा संचालकांची बैठक (दि.18) महापालिकेमध्ये झाली.
- कंपनीचे अध्यक्ष कुणाल कुमार यांनी सांगितले, ‘स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 51 प्रकल्प’ उभारले जाणार आहेत.
- तसेच त्यातील लगेच सुरू करता येतील अशा 15 प्रकल्पांचे कामांची टेंडरप्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
- त्याचबरोबर बसना जीपीएस सिस्टिम बसविणे, मोबाईल अॅपवर बसची माहिती उपलब्ध करून देणे आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
रंगना हेराथची 20-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती :
- श्रीलंकेचा स्टार लेफ्ट आर्म स्पिनर रंगना हेराथ याने 20-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली.
- हेराथ म्हणाला, की निवृत्ती घेण्याचा निर्णय सोपा नव्हता; परंतु मी कसोटी क्रिकेटवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू इच्छितो आणि त्यासाठी मी छोट्या स्वरूपाच्या क्रिकेटला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला.
- हेराथने याविषयी श्रीलंकन क्रिकेट मंडळालाही कळवले आहे आणि मंडळाने त्याच्या निर्णयाला मान्यताही दिली आहे.
- स्टार गोलंदाज म्हणाला, की आम्हाला या वर्षी 12 कसोटी सामने खेळायचे आहेत आणि यात आपली तयारी आणखी मजबूत करण्यासाठी मी वनडे आणि 20-20 मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला.
- 38 वर्षीय हेराथने आपल्या वनडे कारकीर्दीत 71 वनडे सामन्यांत 74 विकेट्स घेतल्या आहेत.
- तसेच त्याने 2014 मध्ये श्रीलंकेला 20-20 वर्ल्ड चॅम्पियन बनण्यात निर्णायक भूमिका बजावली होती.
राहुल आवारे रियो ऑलम्पिकसाठी पात्र :
- रियो ऑलम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे याची डावलण्यात आलेली संधी त्याला पुन्हा मिळणार आहे.
- राज्याचे मुख्यमंत्री, पुण्याचे खासदार यांच्यापासून शहरातील कुस्तीपटूंनी या अन्यायाविरोधात आवाज उठविल्याने महाराष्ट्राच्या या मल्लाला आपले कौशल्य आजमविण्याची संधी मिळणार आहे.
- राहुल हा 57 किलो गटात खेळत असून, त्यासाठी तो जॉर्जिया येथे होणाऱ्या सराव शिबिरासाठी दाखल होणार होता.
- मात्र, आपली निवड केवळ सराव शिबिरासाठी झाली असून, मंगोलिया येथे होणाऱ्या ऑलम्पिक पात्रता फेरीसाठी संदीप तोमर याला पाठविणार असल्याची माहिती त्याला समजली.
- भारतीय कुस्ती महासंघाने तोमरला व्हिसादेखील मंजूर केला असल्याची माहिती त्याला मिळाली.
जितेंद्र यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर :
- राज्य शासनातर्फे राज कपूर यांच्या स्मृतिनिमित्त दिल्या जाणाऱ्या राज कपूर जीवनगौरव पुरस्कारासाठी अभिनेते जितेंद्र यांची निवड करण्यात आली आहे.
- तर अभिनेते अनिल कपूर यांची राज कपूर विशेष योगदान पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
- हिंदी चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती आणि दिग्दर्शन आदी क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल राजकपूर यांच्या नावाने हे पुरस्कार दिले जातात.
- राज कपूर जीवनगौर पुरस्कार पाच लाख रुपये आणि विशेष योगदान पुरस्कार तीन लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
- सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने जितेंद्र व अनिल कपूर यांची निवड केली.
- येत्या 30 एप्रिल रोजी बोरिवली येथे जनरल अरुणकुमार वैद्य मैदानावर एका सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
- ‘गीत गाता चल’या चित्रपटाद्वारे नायक म्हणून जितेंद्र यांनी हिंदी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले.
- तसेच त्यांनी 200 हून अधिक चित्रपटातून काम केले असून यातील 100 पेक्षा जास्त चित्रपट बॉक्स ऑफिसवर ‘हिट’ ठरले आहेत.
- अनिल कपूर यांनी ‘हमारे तुम्हारे’ या चित्रपटातील एका छोटय़ा भूमिकेद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले.
दिनविशेष :
- 1890 : व्हेनेझुएलाने स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
- 1971 : रशियाने सर्वप्रथम मानवनिर्मित अंतराळस्थानक सॅल्युत 1चे प्रक्षेपण केले.
- 1975 : भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट याचे प्रक्षेपण.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा