Current Affairs of 18 May 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (18 मे 2016)
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर :
- कर्णधार सरदार सिंग आणि अव्वल ड्रॅग फ्लिकर रुपदिंर पालसिंग यांना 10 ते 17 जून या कालावधीत लंडनमध्ये होणाऱ्या एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 18 सदस्यांच्या भारतीय हॉकी संघातून विश्रांती देण्यात आली आहे.
- कर्णधारपदाची जबाबदारी गोलकीपर पी.आर. श्रीजेशवर सोपविण्यात आली आहे.
- तसेच या व्यतिरिक्त हॉकी इंडियाने स्ट्रायकर रमणदीप सिंग आणि डिफेंडर जसजीत सिंग कुलार यांनाही विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
- रिओ ऑलिम्पिकपूर्वी भारताची ही दुसरी अंतिम स्पर्धा आहे.
- चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर भारतीय संघ वलेंसिया येथे सहा देशांचा समावेश असलेल्या स्पर्धेत सहभागी होणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
हान कांग यांना ‘मॅन बुकर’ पुरस्कार :
- दक्षिण कोरियाचे लेखक हान कांग (वय 45) यांच्या ‘द व्हेजिटेरियन’ या पुस्तकाला साहित्य जगतातील प्रतिष्ठेचा ‘मॅन बुकर’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
- तसेच यातील नायिका मांसाहार बंद करण्याचा निर्णय घेते आणि त्यानंतर तिचा होणाऱ्या छळाचे वर्णन यात आहे.
- हान यांच्यासह इटलीच्या लेखिका एलेना फेरांट, अंगोलाचे लेखक, जोस एदुआर्दो अंगुलसा, चीनचे लेखक यान लियांके, तुर्कस्तानचे ओरहान पामुक व ऑस्ट्रेलियाचे रॉबर्ट सिटलर यांची नावे अंतिम फेरीसाठी निवडण्यात आली होती. त्यात कांग यांनी बाजी मारली.
- ‘द व्हेजिटेरियन’चा इंग्रजी अनुवाद ब्रिटनमधील दिबोरा स्मिथ यांनी केला आहे.
मुकेश अंबानी ‘ऑथमर गोल्ड मेडल’ ने सन्मानित :
- उद्योगक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि विशेषत: गुजरात येथील जामनगर येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी उभारल्याबद्दल विख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांना नुकतेच प्रतिष्ठेच्या ‘ऑथमर गोल्ड मेडल फॉर आन्थ्रप्रुनियल लीडरशीप’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- ‘द केमिकल हेरिटेज फाऊंडेशन’ च्या वतीने अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे झालेल्या एका शानदार कार्यक्रमात या पुरस्काराने अंबानी यांना गौरविण्यात आले.
- केमिकल हेरिटेज फाऊंडेशनचे अध्यक्ष कार्स्टन रेनहार्डट् आणि डेल्फी ऑटोमोटिव्हचे अध्यक्ष राज गुप्ता यांच्याहस्ते मुकेश अंबानी यांचा हा गौरव करण्यात आला.
- या पुरस्काराचे श्रेय आपले वडील स्व.धीरुभाई अंबानी यांना देताना मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स केवळ वस्त्रोद्योगात होती त्यावेळी धीरूभाईंनी केमिकल इंजिनियर होण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन दिले.
- तसेच, यावेळी भारत आणि अमेरिका संबंधावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, 21 साव्या शतकात आपल्याला दोन प्रमुख मुद्यांच्या विरोधात लढा द्यावा लागणार आहे.
येऊरमध्ये होणार वन्यजीव गणना :
- ठाणे येथील येऊर परिक्षेत्रात वावर असलेल्या प्राणी – पक्ष्यांचे अस्तित्त्व आहे की नाही यासाठी वनविभागातर्फे दरवर्षीप्रमाणे करण्यात येणारी वन्यजीव गणना याही वर्षी केली जाणार आहे.
- तसेच या परिक्षेत्रातील 20 पाणवठ्यांवर ती केली जाणार असून बुद्धपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच येत्या 21 मे रोजी तिला सुरूवात होणार आहे.
- येऊर वनपरिक्षेत्र विस्तीर्ण परिसर आहे. या परिक्षेत्रांतर्गत येऊर, घोडबंदर, चेना आणि नागलाबंदर ही चार ठिकाणे येतात.
- तसेच दरवर्षी वन्यजीव गणनेच्या माध्यमातून या वन्यजीवांचे निरीक्षण आणि संख्या नोंदविली जाते.
- 21 मे रोजी गणनेस सुरूवात होणार असून यासाठी वनविभाग कर्मचारी आणि स्वयंसेवक सज्ज झाले आहेत.
रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका :
- राज्यातील पहिली नगरपालिका अशी ओळख असणाऱ्या पनवेलचे राज्यातील 27 व्या महानगरपालिकेत रूपांतर होणार आहे.
- नगरपालिका, सिडको विकसित क्षेत्र व 68 गावांची मिळून नवीन पालिका होणार आहे.
- शासनाच्या या निर्णयामुळे जवळपास तीन वर्षांपासूनची उत्सुकता संपली असून तालुक्याच्या रखडलेल्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
- स्वातंत्र्यपूर्व काळाज इंग्रजांनी शहरांच्या नियोजनासाठी नगरपालिका कायदा तयार केला.
- पनवेलमध्ये नगरपालिका कायदा लागू करण्याची मागणी नागरिकांनी केली होती.
- तसेच या मागणीची दखल घेऊन 1852 मध्ये पनवेलचे नगरपालिकेत रूपांतर झाले.
- राज्यातील पहिली नगरपालिका म्हणून या शहराचा लौकिक आहे.
- शासनाने मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई वसविण्याचा निर्णय घेतल्यानंतर पनवेल ग्रामीण परिसराचे झपाट्याने शहरीकरण झाले.
- परंतु येथील कारभार ग्रामपंचायतींमध्ये विभागला होता.
- सिडको, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका या चार आस्थापनांमध्ये विभागणी झाल्यामुळे तालुक्याच्या विकासामध्ये सर्वसमावेशकता येत नव्हती.
दिनविशेष :
- 1682 : छत्रपती शाहूराजे भोसले, संभाजीराजे व माहाराणी येसुबाई यांचे पुत्र यांचा जन्म.
- 1933 : एच. डी. देवेगौडा, भारताचे तेरावे पंतप्रधान.
- 1972 : कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा