Current Affairs of 16 July 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (16 जुलै 2016)
डेव्हिस चषकमध्ये भारताची कोरियावर आघाडी :
- युवा खेळाडू रामकुमार रामनाथन आणि अनुभवी साकेत मिनैनी यांनी येथे (दि.15) आपआपले एकेरीचे सामने जिंकताना भारताला दक्षिण कोरियाविरुद्ध डेव्हिस चषक आशिया ओशियाना झोन ग्रुप एक लढतीत 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.
- भारत आणि कोरिया यांच्यादरम्यान ग्रासकोर्टवर खेळवल्या जाणाऱ्या या लढतीच्या पहिल्या एकेरीत 21 वर्षीय रामकुमारने अपेक्षेनुसार कामगिरी करताना कोरियाच्या सियोंग चांग होंग याचा 2 तास 36 मिनिटांच्या संघर्षपूर्ण लढतीत 6-3, 2-6, 6-3, 6-5 अशी मात केली.
- कोरियन खेळाडूने चौथ्या सेटमध्ये पायाला क्रॅम्प आल्यामुळे सामन्यातून माघार घेतली.
- दुसऱ्या एकेरी सामन्यात साकेत मिनैनी याने कोरियन खेळाडू योंग क्यू लिम याच्याविरुद्ध 6-1, 3-6, 6-4 आघाडी घेतली.
- अशा प्रकारे भारताने या लढतीत 2-0 अशी आघाडी घेतली.
Must Read (नक्की वाचा):
‘स्वच्छ भारत’ मोहीमसाठी अमिताभ बच्चन यांची निवड :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचा ‘चेहरा’ म्हणून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची निवड निश्चित झाल्याचे (दि.15) संध्याकाळी जाहीर करण्यात आले.
- तसेच या योजनेतील शहरांतील; विशेषतः घनकचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावून त्यापासून बायो डिझेल व खत बनविण्याच्या विशिष्ट भागासाठीच्या सरकारी जाहिरातींत अमिताभ आपला आवाज देतील व त्याबाबतचे चित्रीकरणही करतील.
- ‘स्वच्छ भारत’ मोहिमेच्या जाहिरातींचा चेहरा कोण असणार, याबाबत गेले अनेक महिने चर्चा सुरू होती.
- मोदी राजवटीत गुजरातच्या पर्यटन व गीरच्या सिंहांबाबतच्या मोहिमेच्या जाहिराती बच्चन यांनी केल्या होत्या.
- वेंकय्या नायडू यांच्या नगरविकास मंत्रालयातील बाबूशाहीकडून मागील आठवड्यात बच्चन यांना याबाबत अधिकृत पत्र पाठविण्यात आले.
- दोन ऑक्टोबर 2014 पासून सुरू झालेली ‘स्वच्छ भारत’ ही सरकारी मोहीम न राहता ती लोकचळवळ बनावी, असे पंतप्रधानांचे स्वप्न आहे व त्या दृष्टीने बच्चन यांचा चेहरा व आवाज याच्या जाहिरात मोहिमेसाठी मिळणे ही लक्षणीय बाब मानली जाते.
‘ई-बे’ने खरेदी केली ‘टिकेट युटिल्स’ कंपनी :
- मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन वयाच्या 18 व्या वर्षी औरंगाबादच्या मुक्तक जोशी या तरुणाने स्थापन केलेली इव्हेन्ट तिकीट विक्री करणारी ‘टिकेट युटिल्स’ ही कंपनी ई-कॉमर्समधील अग्रगण्य असलेल्या अमेरिकेतील ‘ई बे’ कंपनीने खरेदी केली आहे.
- मुक्तक जोशी याचे औरंगाबादेतील सरस्वती भुवन प्रशालेत मराठी माध्यमातून दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे.
- देवगिरी महाविद्यालयातून बारावी केल्यानंतर त्याने एमआयटी महाविद्यालयात प्रवेश घेतला.
- तसेच या काळातच त्याने सॉफ्टवेअर कंपन्यांचे ‘फ्री लान्सिंग’ काम करण्यास सुरुवात केली.
- 2005 मध्ये बी.ई. कॉम्प्युटर सायन्स उत्तीर्ण झाला. 2007 मध्ये ‘टेक्नोप्रोटेन’ कंपनी स्थापन केली.
- तसेच त्यानंतर 2012 मध्ये ‘टिकेट युटिल्स’ची सुरुवात केली.
- अमेरिकेतील लास वेगास शहरात (दि.15) मुक्तकच्या ‘टिकेट युटिल्स’चा ‘ई-बे’शी करार झाला.
‘ऑपरेशन संकटमोचन’ यशस्वीरित्या पूर्ण :
- दक्षिण सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याची ‘ऑपरेशन संकटमोचन’ मोहीम (दि.15) यशस्वीरीत्या संपली.
- दक्षिण सुदानमधून 156 भारतीयांना घेऊन पहाटे पाचच्या सुमारास विमान तिरुअनंतपूरम विमानतळावर पोचले आणि तेथून हे विमान सकाळी दहा वाजता नवी दिल्लीला पोचले.
- केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी विमानतळावर भारतीय नागरिकांचे स्वागत केले.
- (दि.14) सुदानची राजधानी जुबा येथून 156 भारतीयांना आणण्यासाठी हवाई दलाची दोन विमाने रवाना करण्यात आली होती.
- भारतीयांना परत आणण्याची मोहीम परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली.
15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन :
- संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने नोव्हेंबर 2014 मध्ये 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला.
- तसेच त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 साली कौशल्य भारत (स्किल इंडिया) योजनेची घोषणा केली.
- मात्र अर्थसहाय्याविना कौशल्याचा विकास करायचा तरी कसा? असा सवाल अशासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
- मुद्रा बँकेमार्फत केंद्र शासनाने राज्यातील आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला.
- तसेच त्यात अनुभवी प्रशिक्षणार्थींना 10 लाख रुपयांपर्यंत, तर नवोदित प्रशिक्षणार्थींना 5 लाख रुपयांपर्यंतचा कर्ज पुरवठा करण्याचे निश्चित झाले.
- मात्र केंद्र शासनाकडे राज्यातून या कर्जपुरवठ्यासाठी केवळ शासकीय आयटीआयची यादी देण्यात आली.
दिनविशेष :
- 1844 : प्रा. काशिनाथ मराठे, तुकारामांच्या अभंगांचा इंग्रजीत अनुवाद करणारे प्राध्यापक यांचा जन्म.
- 1857 : युध्दातील कार्यकुशल सेनापती नानासाहेब पेशवे यांचा पराभव होऊन पेशवाईचा शेवट झाला.
- 1872 : रोआल्ड अमुंडसेन, नॉर्वेचा शोधक यांचा जन्म.
- 1888 : फ्रिट्स झेर्निके, नोबेल पारितोषिकविजेता डच भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा