Current Affairs of 15 July 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (15 जुलै 2016)
माजी डेप्युटी कौन्सिल जनरल देवयानी आता खासगी सचिव :
- भारताच्या न्यू यॉर्कमधील माजी डेप्युटी कौन्सिल जनरल देवयानी खोब्रागडे यापुढे समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या खासगी सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
- तसेच देवयानी यांच्या नियुक्तीचे पत्र काढण्यात आले.
- देवयानी या निवृत्त सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांच्या कन्या आहेत.
- उत्तम खोब्रागडे हे सध्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.
- देवयानी या 1999 च्या बॅचच्या आयएफएस अधिकारी असून, न्यू यॉर्कमध्ये असताना आपल्याकडील घरकाम करणाऱ्या महिलेविषयी व्हिसा प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याबद्दल अटक करण्यात आली होती.
Must Read (नक्की वाचा):
दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेचे शांततेसाठी प्रयत्न :
- दक्षिण चिनी समुद्रावर चीनचा कोणताही अधिकार नसल्याचा संवेदनशील निर्णय आंतरराष्ट्रीय लवादाने सुनावल्यानंतर चीन संतप्त झाला आहे.
- तसेच या समुद्रातील वादग्रस्त बेटांवर फिलिपिन्स, इंडोनेशिया आणि व्हिएतनामसह सहा देशांनीही हक्क सांगितला आहे.
- त्यामुळे या परिस्थितीत कोणत्याही देशाकडून आक्रमक पाऊल उचलले जाऊ नये म्हणून अमेरिकेने राजनैतिक मार्गाने प्रयत्न सुरू केले आहेत.
- आंतरराष्ट्रीय लवादाच्या निर्णयाला महत्त्व देण्यास चीनने नकार दिला आहे.
- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी, संरक्षण मंत्री ऍश्टन कार्टर यांच्यासह इतर उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी दक्षिणपूर्व आशियामधील देशांशी यासंदर्भात संवाद साधावयास सुरवात केली आहे.
- चीनविरोधात आघाडी निर्माण करण्याचा अमेरिकेचा कोणताही उद्देश नसून, या भागामध्ये राजकीय शांतता निर्माण करण्यासाठीचाच हा प्रयत्न आहे.
- चीनच्या प्रभावास पायबंद घालण्याचा अमेरिकेचा प्रयत्न करत असल्याचा चुकीचा संदेश दिला जाऊ नये, यासाठीही अमेरिका प्रयत्नशील आहे.
पहिल्यांदाच पोर्तुगालने जिंकला युरो चषक :
- युरो करंडक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात पोर्तुगालने फ्रान्सवर 1-0 असा पराभव केला.
- 2004 नंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेल्या पोर्तुगालने इतिहास रचला व पहिल्यांदाच युरो चषक जिंकण्याचे स्वप्न साकार केले.
- अंतिम सामन्यातील पहिला भाग पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दुर्दैवी दुखापतीमुळेच गाजला.
या लक्षवेधी अंतिम सामन्याच्या पूर्वार्ध तसेच उत्तरार्धात गोलशून्य बरोबरी कायम राहिली. - 90 मिनिटांच्या कालावधीत फ्रान्सकडून अनेकदा गोल करण्याचा प्रयत्न झाला.
- परंतु पोर्तुगालचा गोलकिपर लुइस पेट्रीश्योने जबरदस्त किपिंग करीत फ्रान्सचे आव्हान परतवून लावले.
- अतिरिक्त वेळेमध्ये एडरने 25 यार्डांवरून केलेल्या गोलच्या जोरावर पोर्तुगाल संघाने फ्रान्सवर 1-0 ने विजय मिळविला.
‘डिजीटल’ योजनेत पिंपरी-चिंचवडचा समावेश :
- स्मार्ट सिटीत पिंपरी-चिंचवडचा समावेश हुकला असला, तरी नागरिकांना स्मार्ट सेवा देण्यासाठी राज्य सरकारने ‘डिजीटल बॅकबोन इन्फ्रास्ट्रक्चर’ या योजनेमध्ये शहराचा समावेश झाला आहे.
- तसेच या योजनेसाठी नागपूरनंतर निवड झालेले पिंपरी-चिंचवड हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे ठरणार आहे, अशी माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
- स्मार्ट सिटीत राजकारण झाल्याने पिंपरी-चिंचवडचे स्मार्ट सिटीचे स्वप्न अपूर्ण राहिले.
- स्मार्ट सिटीच्या धर्तीवर डिजीटल बॅकबोन इन्फ्रास्ट्रक्चर ही योजना राबविण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे, त्या संदर्भातील आराखडा तयार करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
- शहरातील सेवा स्मार्ट करण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटीच्या धर्तीवर राज्य सरकारची ही योजना आहे.
‘टाल्गो’ रेल्वेची यशस्वी चाचणी :
- भारताची सर्वांत जलद रेल्वे टाल्गोची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली.
- ‘टाल्गो’ने भारतातील आतापर्यंतच्या सर्वांत जलद अशा ‘गतिमान एक्स्प्रेस’ला वेगामध्ये मागे टाकले आहे.
- 180 किलोमीटर प्रतितास चालणारी ही रेल्वे लवकरच भारतीयांच्या सेवेत दाखल होणार आहे.
- भारतीय रेल्वे संशोधन निर्मिती व मानक संस्थेने (आरडीएसओ) याबाबत नुकतीच माहिती दिली.
- ‘टाल्गो’ची (दि.13) यशस्वी चाचणी घेण्यात आली. यामध्ये तिचा वेग व इतर उपकरणांची तपासणी करण्यात आली.
- मथुरा-पलवाल रेल्वेमार्गावर घेण्यात आलेल्या चाचणीवेळी ‘टाल्गो’ने 84 किलोमीटर अंतर 38 मिनिटांमध्ये पार करत ‘गतिमान एक्स्प्रेस’च्या प्रतितास वेगाला मागे टाकले.
- प्रकाशाची उत्तम व्यवस्था व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर ही रेल्वे भारतातील सर्वांत जलद रेल्वे झाल्याचे आग्य्राचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रभास कुमार यांनी सांगितले.
दिनविशेष :
- ब्रुनेई सुलतानाचा जन्मदिन.
- 1927 : ‘कुटुंबनियोजन’ या विषयावर लेख लिहून रघुनाथ धोंडो कर्वे यांचा ‘समाजस्वास्थ’चा पहिला अंक प्रकाशित झाला.
- 1927 : शिवाजीराव भोसले, ख्यातनाम वक्ते व शिक्षणतज्ञ यांचा जन्म.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा