Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs (चालू घडामोडी) of 15 January 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. ‘इस्त्रो’च्या प्रमुखपदी ए.एस.किरणकुमार
2. गुजरात मध्ये 25 लाख कोटींचा गुंतवणूक करार 
3. दिनविशेष 
 
 

‘इस्त्रो’च्या प्रमुखपदी ए.एस.किरणकुमार :

  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) प्रमुखपदी केंद्र सरकारने अहमदाबाद येथील स्पेन अॅप्लिकेशन सेंटरचे (सॅक) संचालक ए.एस.किरणकुमार यांचे नाव निश्चित झाले आहे.
  • किरणकुमार यांचा कालावधी तीन वर्षाचा असणार आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली किरणकुमार यांची निवड करण्यात आली आहे.
  • ए.एस.किरणकुमार हे इस्त्रोमधील सर्वात वरिष्ठ शास्त्रज्ञ असल्याने त्यांची निवड करण्यात आलेली आहे.

गुजरात मध्ये 25 लाख कोटींचा गुंतवणूक करार :

  • व्हायब्रंट गुजरात‘ परिषदेला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळून तब्बल 25 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले.
  • 2013 मध्ये 12 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले होते, यंदा त्यात दुप्पट वाढ झाली.

दिनविशेष :

  • 15 जानेवारी लष्करी दिन
  • 1919 – राजर्षि शाहू छत्रपती महाराजांनी आदेश काढून स्पृश्य-अस्पृश्य विद्यार्थ्यांना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था केली.
  • 1949 – भारताच्या स्वातंत्र्यानंतर फिल्डमार्शल के.एम.करिअप्पा यांनी पहिले लष्करप्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली. हा दिवस लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो.
  • 1996 – भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरविणार्‍या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस‘ असे केले.
  • 2006 – सौरमालेच्या जन्माचा अभ्यास करण्यासाठी ‘नासा‘ने अंतराळात पाठविलेली अवकाश कुपी 2.9 अब्ज किलोमीटरचा प्रवास करून अमेरिकेच्या हवाई दलाच्या उटाह तळावर सुखरूप उतरली.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World