Current Affairs of 13 June 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (13 जून 2016)
साईना नेहवालला ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद :
- रिओ ऑलिम्पिकपूर्वी भारताची फुलराणी सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजचे विजेतेपद पटकावले.
- चीनच्या सुन यू हिला तीन गेमपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात पिछाडीवरून नमवताना सायनाने दुसऱ्यांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
- जागतिक क्रमवारीत 12व्या स्थानी असलेल्या सुन यू हिने आक्रमक सुरुवात करताना पहिल्या गेममध्ये 21-11 अशी बाजी मारुन सायनावर दडपण आणले.
- मात्र, यानंतर झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना सायनाने आपला सर्व अनुभव पणास लावताना सलग दोन गेम जिंकत सुन यूला 11-21, 21-14, 21-19 असे नमवले.
- तसेच याआधी सायनाने उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या रेचानोक इंतानोन आणि उपांत्य सामन्यात 2011 व 2013 साली जागतिक विजेती ठरलेल्या चीनच्या यिहान वांगला पराभूत केले होते.
- विशेष म्हणजे, हे विजेतेपद यंदाच्या मोसमात सायनाचे पहिले विजेतेपद ठरले.
- तसेच याआधी 2014 साली या स्पर्धेत बाजी मारलेल्या सायनाला तब्बल वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर विजेतेपदासाठी थांबावे लागले.
- गतवर्षी दिल्लीला झालेल्या इंडिया सुपर सीरिजचे विजेतेपद पटकावल्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद सायनाने पटकावलेले पहिले विजेतेपद ठरले.
Must Read (नक्की वाचा):
संभाजीराजेंची राज्यसभेवर नियुक्ती :
- युवराज संभाजीराजे छत्रपती यांची राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली.
- भाजपने त्यांच्या नावाची शिफारस राज्यसभेसाठी केली होती.
- तसेच ते खासदार झाल्याचे समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी भवानी मंडप, शिवाजी पुतळा परिसरात त्यांच्या कार्यालयात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.
- लोकसभेच्या 2009 च्या निवडणुकीत संभाजीराजे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढवली होती.
- तसेच त्यामध्ये अपक्ष उमेदवार (कै.) खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर संभाजीराजे यांनी राजकीय पक्षांपासून अलिप्त राहत तरुणांच्या संघटनाचे काम सुरू केले.
- राज्यात विदर्भ, मराठवाड्यासह विविध भागांत त्यांनी तरुणांचे मोठ्या प्रमाणात संघटन करण्याचे काम सुरू केले.
- रायगडावर त्यांनी छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळाही भव्यदिव्य करत लाखो तरुणांना दिशा देण्याचे काम सुरू केले.
- राजर्षी शाहू महाराजांचा वारसा लाभलेल्या संभाजीराजे यांना भाजपच्या चिन्हावर निवडून आणण्यापेक्षा राजर्षी शाहूंच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी थेट राष्ट्रपतींकडून नेमणूक करण्याचे ठरले.
तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा द. आफ्रिकेवर विजय :
- सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे शतक आणि गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर 36 धावांनी विजय मिळविला.
- सेंट किट्समधील मैदानावर (दि.11) रात्री झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 288 धावा केल्या होत्या.
- तसेच या आव्हानापुढे दक्षिण आफ्रिकेची स्थिती एकवेळ 3 बाद 210 अशी होती.
- मात्र, त्यानंतर अवघ्या 42 धावांतच त्यांचे बाकीचे खेळाडू बाद झाल्याने आफ्रिकेचा डाव 252 धावांत संपुष्टात आला आणि त्यांना 36 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
- संथ खेळपट्टीवर वॉर्नरने संयमी फलंदाजी करत 157 चेंडूत शतक झळकाविले.
भारताला धोरणात्मक भागीदार करण्याचे विधेयक :
- अमेरिका व भारत यांना असलेले सुरक्षा धोके सारखेच असून भारताला महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार करण्यासाठी एका वरिष्ठ रिपब्लिकन सिनेटरने एक विधेयक मांडले आहे.
- अमेरिकेच्या अध्यक्षांनी जागतिक धोरणात्मक बाबींचा विचार करून भारताला महत्त्वाचे स्थान द्यावे, असे या विधेयकात म्हटले आहे.
- सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीचे अध्यक्ष जॉन मॅक्केन यांनी नॅशनल डिफेन्स अॅथोरायझेशन अॅक्ट (एनडीएए) 2017 हे सुधारणा विधेयक मांडले आहे.
- तसेच या 4618 व्या दुरूस्ती विधेयकात म्हटले आहे, की भारत व अमेरिका यांचे सुरक्षा धोके सारखे असून त्यांच्यात ठोस संरक्षण व धोरणात्मक भागीदारी असली पाहिजे.
- अमेरिका व भारत यांच्यातील संबंध गेल्या वीस वर्षांत वृद्धिंगत झाले असून त्यात दोन्ही देशांची भरभराट, लोकशाही मूल्ये, आर्थिक सहकार्य, प्रादेशिक शांतता व सुरक्षा तसेच स्थिरता यात मोठी प्रगती झाली आहे.
- भारताला जागतिक पातळीवर महत्त्वाच्या धोरणात्मक व संरक्षण भागीदाराचा दर्जा द्यावा, असे आवाहन या विधेयकात अध्यक्षांना करण्यात आले आहे.
- एनडीएए 2017 या विधेयकावर पुढील आठवडय़ात मतदान होण्याची शक्यता असून सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे.
- भारताला प्रगत तंत्रज्ञान देणे, लष्करी नियोजन करणे, मानवतावादी मदत करणे, तस्करीविरोधात उपायोजना करणे यात सहकार्याची अपेक्षाही त्यात केली आहे.
राज्यसभा निवडणूक विजयी उमेदवारांची यादी :
- सात राज्यांतील राज्यसभेच्या 27 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल (दि.11) जाहीर झाला.
- तसेच यामध्ये उत्तरप्रदेशमधून समाजवादी पक्षाचे 7 आणि बसपाचे दोन उमेदवार आणि भाजपचा एक उमेदवार विजयी झाला.
- काँग्रेस नेते कपिल सिब्बल हेदेखील बसपाच्या पाठिंब्यावर उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवडून आले आहेत.
- तर हरियाणातून भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा विजयी झाले.
- राजस्थानमध्ये भाजपने चारही जागांवर विजय मिळवला.
- भाजप नेते व्यंकय्या नायडू, ओम प्रकाश माथूर, हर्षवर्धन सिंग आणि रामकुमार वर्मा यांनी राजस्थानातून विजय मिळवला.
- तसेच राज्यसभेच्या 57 जागा रिकाम्या झाल्या होत्या. यापैकी 30 जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने 27 जागांसाठी निवडणूक झाली होती.
दिनविशेष :
- 1879 : गणेश दामोदर सावरकर, थोर क्रांतीकारक यांचा जन्म.
- 1983 : पायोनियर 10 हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा