Current Affairs of 12 October 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (12 ऑक्टोंबर 2015)

चालू घडामोडी (12 ऑक्टोंबर 2015)

इमोज आणण्यासाठी फेसबुक प्रयत्नशील :

  • फेसबुकवरील एखाद्या पोस्टवर “लाइक” आणि “कमेंट” करण्यापलीकडे जाऊन भावना व्यक्त करण्यासाठी विविध प्रकारच्या इमेज आणण्यासाठी फेसबुक प्रयत्नशील आहे. facebook
  • फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी त्यापैकीच काही इमेजींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
  • व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे सर्व इमोजी उपलब्ध झाल्यानंतर प्रत्येक पोस्टखाली लाइकसह संबंधित पोस्टवरील भावना व्यक्त करण्यासाठी एकूण सात बटने उपलब्ध होतील.
  • त्यामध्ये प्रेम, हास्य, यश, आश्‍चर्य, दु:ख आणि राग या पर्यायांचा समावेश असेल.
  • तंत्रविषयक वृत्त देणाऱ्या एका इंग्रजी दैनिकाने स्पेन आणि आयर्लंडमध्ये अशा प्रकारच्या इमोजी दिसण्यास सुरवात झाल्याचे म्हटले आहे.
  • इतर देशांसह भारतामध्ये ही सुविधा केव्हा उपलब्ध होईल, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

सामाजिक कार्यकर्त्या सारा जोसेफ यांनी साहित्य अकादमी पुरस्कार केला परत :

  • देशात जातीय दंगलींमध्ये झालेल्या वाढीबद्दल दुःख व्यक्त करत मल्याळम लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सारा जोसेफ यांनी आपला साहित्य अकादमी पुरस्कार परत केला आहे.
  • देशात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार परत करणाऱ्या सारा जोसेफ या केरळमधील पहिल्या लेखिका आहेत.
  • देशात दिवसेंदिवस जातीय दंगलींमध्ये वाढ होत आहे, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी दर्शविली आहे.
  • सारा जोसेफ यांच्यापूर्वी हिंदी कवी अशोक वाजपेयी आणि लेखिका नयनतारा सेहगल यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केला आहे.
  • यापूर्वी कन्नड लेखक शशी देशपांडे यांनी साहित्य अकादमी समितीच्या पदांचा राजीनामा दिला होता.
  • तसेच कन्नड लेखक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येबद्दल निषेध नोंदवत त्यांनी राजीनामा दिला होता.

खड्‌गप्रसाद शर्मा ओली यांची नेपाळचे नवे पंतप्रधान म्हणून निवड :

  • पंतप्रधान निवडीसाठी नेपाळच्या संसदेत झालेल्या मतदानानंतर खड्‌गप्रसाद शर्मा ओली यांची नवे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली.
  • माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांचा त्यांनी पराभव केला.
  • कोईराला यांनी राजीनामा देण्याचे निश्‍चित केल्यानंतर एकमताने नवा नेता निवडण्यात संसदेला अपयश आल्याने मतदान झाले होते.
  • ओली लवकरच देशाचे 38 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील.
  • कोईराला हे स्वत: 2014 मध्ये ओली यांच्या पक्षाच्या पाठिंब्यावर पंतप्रधान झाले होते.

जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे “370”वे कलम कायमस्वरूपाचे :

  • जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील “370”वे कलम कायमस्वरूपाचे असून त्यामध्ये सुधारणा करणे अथवा ते रद्द करणे शक्‍य नसल्याचे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
  • तसेच राज्यघटनेतील कलम 35 (अ) हे विद्यमान कायद्याला संरक्षण देते, असे न्या. हसनैन मसुदी आणि न्या. जनकराज कोटवाल यांनी दिलेल्या 60 पानी निकालपत्रात म्हटले आहे.
  • या कलमामुळेच राज्याला मर्यादित स्वातंत्र्य आणि विशेष दर्जा मिळाला असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

सहकार्य करण्याचा निर्णय भारत आणि मालदीव यांनी संयुक्तपणे घेतला :

  • संरक्षण, सुरक्षा, ऊर्जा आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याचा निर्णय भारत आणि मालदीव यांनी संयुक्तपणे घेतला आहे. Karar
  • सुमारे 15 वर्षांच्या खंडानंतर दोन देशांमध्ये संयुक्त आयोग पुन्हा स्थापन झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मालदीवच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.
  • तसेच या बैठकीनंतर दोन्ही देशांमध्ये क्रीडा आणि युवक कल्याणासंबंधी सहकार्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.

सानिया व मार्टिना यांनी सलग आठवा चषक जिंकला :

  • भारताची सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी आपले विजयी अभियान कायम राखले आहे. Sania Mirza
  • डब्ल्यूटीए चायना ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकून सलग आठवा चषक जिंकला.
  • अग्रमानांकित सानिया-मार्टिना जोडीने सहाव्या मानांकित तैपेईच्या हाओ चिंग चान व युंग जान चान यांना 6-7 (9-11), 6-1 आणि 10-8 असे नमवून विजेतेपदावर आपला हक्क प्रस्थापित केला.
  • तसेच टायब्रेकरमध्ये 7-7 अशी बरोबरी असताना या जोडीने सलग चार गुण मिळविले.
  • सानियाचे 2015 मधील हे नवववे तर हिंगीसचे आठवे विजेतेपद आहे.

मुलींच्या सर्वाधिक हत्येमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर :

  • नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने जारी केलेल्या गेल्या वर्षाच्या आकडेवारीनुसार, 6 वर्षांखालील मुलींच्या सर्वाधिक हत्या 62 महाराष्ट्रात झाल्या आहेत.
  • या चिमुरडींच्या हत्येमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.
  • त्याखालोखाल तामिळनाडू (34), उत्तर प्रदेश (27), मध्य प्रदेश (26) यांचा क्रमांक आहे.
  • अल्पवयीन मुलींवरील अत्याचार कमी करण्यासाठी आणि आरोपींना जरब बसवून जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी देशामध्ये ‘पॉस्को’ कायदा करण्यात आला.

डॉ. मलगट्टी यांचा साहित्य अकादमी कार्यकारी मंडळाचा राजीनामा :

  • साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचे सत्र सुरूच असून गुजरातमधील विख्यात आदिवासी कार्यकर्ते गणेश देवी यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला.
  • बंगळुरू येथील वृत्तानुसार कन्नड लेखक व संशोधक डॉ. अरविंद मलगट्टी यांनी साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाचा राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले आहे.
  • कलबुर्गी यांच्या हत्येवर साहित्य अकादमीने मौन पाळल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे. राजीनामा पत्र सचिव व अध्यक्षांना पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.
  • पंजाबचे गुरुबचन भुल्लर, अजमेर सिंह औलाख व आत्मजित सिंह यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत करणार असल्याचे सांगितले.

ऑस्ट्रेलियाची गौतम बुद्धाची शिल्पकृती भारताला परत दिली जाणार :

  • जर्मनीने अलीकडेच दुर्गामातेची मूर्ती भारताला परत दिल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाच्या कलासज्जेत असलेली गौतम बुद्धाची शिल्पकृती भारताला परत दिली जाणार आहे.
  • बुद्धाची ही बसलेल्या अवस्थेतील मूर्ती उत्तर प्रदेशातील मथुरेची असण्याची शक्यता आहे.
  • सध्या ती ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथे राष्ट्रीय कला सज्जेत आहे असे भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • गेल्या आठवडय़ाच ही मूर्ती परत करण्याबाबतची सूचना ऑस्ट्रेलियाच्या कला सज्जेने भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाला पाठवली आहे.
  • हे शिल्प वालुकाश्माचे बनवलेले असून तशी शिल्पे मथुरेतच आढळतात.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.