Current Affairs of 11 April 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (11 एप्रिल 2016)

चालू घडामोडी (11 एप्रिल 2016)

2016 ची मिस इंडिया प्रियदर्शिनी चॅटर्जी :

 • जगाच्या सौंदर्यात भर टाकणा-या एफबीबी फेमिना मिस इंडिया 2016 चा किताब प्रियदर्शिनी चॅटर्जीने पटकावला आहे.
 • 9 एप्रिलला यश राज स्टुडिओमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.
 • तसेच त्यावेळी प्रियदर्शिनी चॅटर्जीला मिस इंडिया 2016 घोषित करण्यात आले आहे.
 • मिस इंडिया हा किताब पटकावलेल्या प्रियदर्शिनी चॅटर्जी मिस वर्ल्ड 2016 ला भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
 • पंखुरी गिडवानी हिला रनर या कॅटगरीत एफबीबी फेमिना मिस इंडिया 2016 चे दुसरे पारितोषिक मिळाले आहे.
 • तर सुश्रूती क्रिष्णा हिला रनर अप कॅटेगरीत पहिला पारितोषिक मिळाले आहे.
 • मात्र प्रियदर्शिनी चॅटर्जी यावेळी मिस इंडिया 2016 ची विजेती ठरली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 एप्रिल 2016)

‘जदयू’च्या अध्यक्षपदी नितीश कुमार :

 • बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची (दि.10) जदयूच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
   
 • जदयुच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने त्यांची निवड करण्यात आली.
 • पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाल्याने नितीश यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी आली आहे.
 • शरद यादव यांना तिसऱ्यांदा अध्यक्ष करण्यासाठी पक्षाच्या घटनेत बदल करण्यात आला होता.
 • परंतु त्यांनी चौथ्यांदा पक्षाध्यक्ष होण्याला नकार दिला. शरद यादव यांनी सलग 10 वर्षे पक्षाध्यक्षपद भूषविले होते.
 • कार्यकाळातील मुदत संपल्यानंतर यादव यांनी पक्षाचा कार्यभार नितीश कुमारांकडे सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

भारताचे आशियाई खो-खो स्पर्धेत विजेतेपद :

 • भारताने संपूर्ण स्पर्धेवर आपले वर्चस्व राखताना नुकत्याच झालेल्या आशियाई खो-खो स्पर्धेत मुलांच्या व मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावले.
 • विशेष म्हणजे, दोन्ही गटांचे विजेतेपद उंचावताना भारताने बांगलादेशला पराभूत केले.
 • तसेच या आधी झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेतही अंतिम सामना भारत- बांगलादेश असाच रंगला होता.
 • इंदौर येथे झालेल्या या स्पर्धेच्या महिलांचा अंतिम सामना एकतर्फी झाला.
 • भारताने अपेक्षित बाजी मारताना, बांगलादेशचा 14-9, 12-7 असा पराभव केला.
 • नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम संरक्षण स्वीकारले.
 • सारिका काळेने उत्कृष्ट अष्टपैलू खेळ केला तर ऐश्वर्या सावंतने चांगले संरक्षण करून तिला उपयुक्त साथ दिली.
 • पुरुषांच्या गटात आक्रमण व भक्कम बचाव या जोरावर भारताने बांगलादेशचा 27-16 असा 11 गुणांनी पराभव केला.
 • मध्यंतरालाच 15-7 अशी आघाडी घेऊन भारतीयांनी आपले विजेतेपद निश्चित केले होते.

संयुक्त राष्ट्रसंघात साजरी होणार डॉ. आंबेडकर जयंती :

 • संयुक्त राष्ट्र संघटनेत प्रथमच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे.
 • तसेच त्यात असमानता दूर करतानाच शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांवर भर दिला जाईल.
 • संयुक्त राष्ट्रातील भारताचा स्थायी दूतावास व कल्पना सरोज फाउंडेशन, फाउंडेशन फॉर ह्य़ूमन होरायझन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आंबेडकर यांची 125 वी जयंती 13 एप्रिलला म्हणजे एक दिवस आधी साजरी केली जाईल.
 • संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरउद्दीन यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकर यांची जयंती प्रथमच संयुक्त राष्ट्रात साजरी होत आहे.
 • डॉ. आंबेडकर हे लाखो भारतीय लोकांचे समानता व सामाजिक न्यायासाठीचे प्रेरणास्थान आहेत.
 • डॉ. आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला तर मृत्यू 1956 मध्ये झाला त्यांना 1990 मध्ये मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला आहे.

स्पेस एक्स कंपनीच्या ड्रॅगन कुपीचे उड्डाण :

 • नासासाठी स्पेस एक्स या कंपनीने अवकाश स्थानकात सामान नेण्याचे काम सुरू केले असून, हे यान सोडण्यासाठी वापरलेले अग्निबाण नष्ट न होता ते परत महासागरातील जहाजावर आणण्यात यश आले आहे.
 • तसेच आता अग्निबाणांचा फेरवापर करणे शक्य होणार आहे.
 • मानवरहित फाल्कन अग्निबाणाने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकासाठी सामान व एक छोटी खोलीच अवकाशात नेली आहे.
 • ड्रॅगन हे कुपी स्वरूपाचे अवकाशयान अवकाश स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील बुस्टर अग्निबाण परत आले आहे.
 • कॅलिफोर्नियात हॉथोर्न येथे या कंपनीचा काचेचे अवकाश नियंत्रण कक्ष आहे.
 • स्पेस एक्स अवकाशयानाने या वर्षांत प्रथमच सामानाची खेप अवकाशयानाकडे नेली आहे.
 • आता ड्रॅगन या कुपीच्या माध्यमातून 7 हजार पौंड वजनाचे सामान अवकाश स्थानकाकडे नेले आहे.
 • मंगळ व चंद्र यांच्यावर पाठवण्यासाठीही अशा तयार खोल्या कंपनी तयार करीत आहे.
 • 260 मैल अंतरावर अवकाश वाहतूक जास्त असते.
 • नासाच्या ऑर्बायटल एटीके या व्यावसायिक वाहनाने मार्चमध्ये उड्डाण केले होते.
 • ड्रॅगन कुपीत वीस उंदीर असून त्यात कोबीलेटय़ूस या वनस्पती आहेत.
 • द बिगेलो एक्सपांडेबल अ‍ॅक्टिव्हिटी मॉडय़ुल म्हणजे बीम ही नासाच्या 21व्या शतकातील ट्रान्सहबची आवृत्ती असून, 1990मध्ये त्याचा आराखडा तयार असूनही जमले नव्हते.
 • हॉटेल व्यावसायिक रॉबर्ट बिगेलो यांनी ट्रान्सहबचे हक्क विकत घेतले असून, त्यांनी बीम ही खोली अवकाशात नेण्यासाठी नासाचा मंच वापरू देण्यासाठी प्रयत्न केले व त्यात त्यांना यशही आले.

केडीएमसीच्या घनकचरा प्रकल्पाला मंजुरी :

 • केडीएमसीने स्वच्छ भारत अभियानातंर्गत 114 कोटीचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अहवाल तयार केला आहे.
 • तसेच या अहवालाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली असून तो अहवाल अंतिम मंजूरीसाठी केंद्राकडे पाठविला आहे.
 • केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर शहरातील घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे असल्याने त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
 • केंद्राने नुकत्याच जाहीर केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत कल्याण डोंबिवलीचा उल्लेख अस्वच्छ शहर म्हणून झाला होता.
 • तसेच हा अस्वच्छ शहराचा डाग पुसून काढण्यासाठी केडीएमसीने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले आणि 114 कोटींचा घनकचरा प्रकल्प अहवाल राज्य सरकारला सादर केला.
 • मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या उच्चाधिकार समितीपुढे केडीएमसी आयुक्त इ. रवींद्रन यांच्या वतीने सादर करण्यात आला होता.

दिनविशेष :

 • 1827 : महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म.
 • 1930 : ऋषिकेश येथील प्रसिध्द राम झुला प्रवाशासाठी खुला करण्यात आला.
 • 1930 : पंडित मोतीलाल नेहरु यांनी आनंदभवन हे साडेचारशे दालने असलेले प्रासादतुल्य घर राष्ट्राला अर्पण केले.
 • 1970 : अपोलो 13चे प्रक्षेपण.
 • रेल्वे सप्ताह दिन.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 एप्रिल 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.