Current Affairs of 10 March 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (10 मार्च 2016)

चालू घडामोडी (10 मार्च 2016)

‘रायसोनी नटसम्राट’ एकपात्री स्पर्धा :

  • सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे आणि परिसरातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी लोकमत युवा नेक्स्ट घेऊन आली आहे ‘रायसोनी नटसम्राट’ एकपात्री स्पर्धा.
  • रायसोनी ग्रुपच्या सहकार्याने ही स्पर्धा येत्या 16 तारखेला होणार आहे,प्रत्येक मुला-मुलींत चांगले कलागुण असतात.
  • तसेच करिअरला कलागुणांची जोड मिळाल्यास यश हे निश्चित असते, त्यामुळे मुलांना स्वत:मधील कलागुण ओळखून त्या आधारे करिअरची निवड केल्यास आवडीच्या क्षेत्रात भविष्यात यश मिळविणे शक्य होते.
  • युवा नेक्स्टच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात.
  • विद्यार्थ्यांचे मनोरंजन हाच केवळ उद्देश नसून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करणे हासुद्धा आयोजनामागील उद्देश असतो.
  • ‘लोकमत’च्या या विविध उपक्रमांतर्गतच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘रायसोनी नटसम्राट’ या एकपात्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
  • सहभागी विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी तीन मिनिटे देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या नाटकातील एक प्रवेश या वेळी सादर करायचा आहे.
  • उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘रायसोनी नटसम्राट’ या उपाधीने गौरविण्यात येणार आहे, स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना अनेकविध पारितोषिक देण्यात येणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 मार्च 2016)

बीएमडब्लूला 100 वर्ष पूर्ण :

  • बीएमडब्लू आणि मर्सिडीज बेन्झ या वाहन उद्योगक्षेत्रातील जगातील दोन आघाडीच्या जर्मन कंपन्यांनी स्पर्धा करतानाही ही नैतिकता जपली आहे.  
  • मिर्सिडीजची व्यावसायिक स्पर्धक असलेल्या बीएमडब्लूने दोन दिवसांपूर्वी 7 मार्चला 100 वर्ष पूर्ण केली.
  • तसेच त्यानिमित्ताने मिर्सिडीजने बीएमडब्लूला सोशल मिडीयावरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
  • मर्सिडीजने सोशल मिडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला असून, शंभर वर्षाच्या स्पर्धेबद्दल बीएमडब्लूचे आभार मानले आहेत.
  • मिर्सिडीजने आपले संग्रहालय पाहण्यासाठी बीएमडब्लूच्या कर्मचा-यांना निमंत्रणही दिले आहे.

    बीएमडब्लू आणि मर्सिडीज हे भारतातील गाडयांचे लोकप्रिय ब्राण्डस आहेत.

  • तसेच या दोन्ही कंपन्या आलिशान गाडयांच्या निर्मितीसाठी ओळखल्या जातात.

पर्यटनस्थळी आता पोलीस दल सज्ज :

  • 2017 हे ‘व्हिजिट महाराष्ट्र’ वर्ष म्हणून राज्य शासनाने घोषित केले असून, पर्यटन क्षेत्राला चालना देणाऱ्या नव्या पर्यटन धोरणास राज्य मंत्रिमंडळाने (दि.8) मान्यता दिली.
  • महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी हवाई, रस्ते आणि रेल्वे प्रवास आणि हॉटेल निवासाचे एकत्रित असे स्मार्ट तिकीट देण्यात येणार आहे, तर पर्यटन स्थळी सुरक्षेसाठी विशेष पोलीस दलाची स्थापना करण्यात येणार आहे.
  • विदर्भ, कोकण आणि कोल्हापूर भागातील खाद्यपदार्थ, तसेच मुंबईच्या खाऊ गल्ल्यांमध्ये मिळणाऱ्या पदार्थांचे मार्केटिंग केले जाणार असून, त्यासाठी विविध महोत्सव आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
  • पर्यटन पोलीस हे सुरक्षेशिवाय पर्यटकांना परिसरातील कायदा, रूढी, संस्कृती व आकर्षण याबद्दलची माहिती देतील.
  • स्थानिक रहिवाशांनी पर्यटनस्नेही कसे राहावे, यासाठी प्रशिक्षणही देतील.
  • राज्यातील निवडक किल्ल्यांवर विद्युत रोषणाई व सांस्कृतिक कार्यक्रम केले जातील.
  • किल्ल्यांजवळ किंवा लहान किल्ल्यांना जोडणाऱ्या मार्गावर बलून सफारी सुरू करण्यात येतील.
  • तसेच दुर्ग परिक्रमेसह सीप्लेन सेवा देण्यात येणार आहे.

सनदी अधिकाऱ्यांना प्रशासकीय सेवा पुरस्कार :

  • स्वच्छ भारत मिशन आणि प्रधानमंत्री जनधन योजना आदींची उत्कृष्ठ अंमलबजावनी करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारमधील सनदी अधिकाऱ्यांना पंतप्रधान उत्कृष्ठ प्रशासकीय सेवा पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात येणार आहे.
  • दरवर्षी 21 एप्रिल रोजी सार्वजनिक सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो.
  • तसेच या दिवशी प्रशासनात उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुरस्कारांनी सन्मानित केले जाते.
  • या वर्षीपासून जनधन किंवा स्वच्छ भारत सारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावनी करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांचाही पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

उष्णतारोधक आवरणाची यशस्वी चाचणी :

  • मंगळावर जाण्यासाठी आवश्यक असलेल्या व फुगवता येणाऱ्या डोनटच्या आकाराच्या उष्णतारोधक आवरणाची चाचणी नासाने यशस्वीरीत्या घेतली आहे.
  • उष्णतारोधक आवरणाचे नवे तंत्रज्ञान अमेरिकेच्या नासा या संस्थेच्या वैज्ञानिकांनी विकसित केले आहे.  
  • तसेच या आवरणामुळे अवकाशयान मंगळावर गेल्यानंतरही तेथील उष्ण वातावरणात हळूहळू खाली येत यशस्वीरीत्या उतरू शकणार आहे.
  • नासा अशा आवरणाचा उपयोग दुसऱ्या ग्रहावर उतरण्यासाठी करणार असून ते आवरण अग्निबाणात बसू शकेल असे आटोपशीर करावे लागणार आहे.
  • नासाच्या लँगले रीसर्च सेंटरच्या अभियंत्यांनी 9 फूट व्यासाचे हे डोनटच्या आकाराचे उष्णतारोधी आवरण चाचणीसाठी सिद्ध केले व अवकाश मोहिमेत नेमकी परिस्थिती काय असेल याचा अदमास घेऊन चाचणी यशस्वी केली.
  • तसेच या आवरणाला ‘टोरस’ असे म्हटले जाते.
  • हायपरसॉनिक इनफ्लेटेबल एरोडायनॅमिक डिअ‍ॅक्सिलरेटर म्हणजे एचआयएडी हे आवरण पॅराशूटसारखे काम करते.
  • मंगळाच्या वातावरणातील बलांचा वापर त्यात अवकाशयानाची गती कमी करण्यासाठी केला जातो.
  • अवकाशयानाची गती कमी झाल्याने त्याचे तेथील वातावरणात खाली येताना रक्षण होते, चाचणीच्यावेळी निर्वात पंपाचा वापर करण्यात आला.
  • या चाचणीत इनफ्लेटेबल टोरससाठी वापरलेल्या साहित्याची पॅकिंगच्या दृष्टीने चाचणी झाली.
     
  • पृथ्वीबाहेर जाऊन परत येणे व मंगळावर जाणे या प्रकारच्या मोहिमांसाठी त्याचा उपयोग होणार असल्याचे जॉन्सन यांनी सांगितले.

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ला दंड :

  • आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक व अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना यमुना नदीकिनारी (दि.4) तीन दिवसांचा आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • परंतु राष्ट्रीय हरित लवादाने या प्रकरणी आर्ट ऑफ लिव्हिंगला पर्यावरण भरपाईपोटी 5 कोटी रुपये दंड केला आहे.
  • तसेच हा महोत्सव आयोजित करताना कुठलेही पर्यावरण परवाने घेतले नाहीत, असे सांगून लवादाने आधी या महोत्सवास हरकत घेतली होती.
  • हरित लवादाने या प्रकरणी दिल्ली विकास प्राधिकरणालाही 5 लाख व दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीला 1 लाख रुपये दंड ठोठावला.
  • तसेच अशी परवानगी यापुढे देऊ नये, अशी तंबीही लवादाने या दोन्ही संस्थांना दिली आहे.
  • राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष स्वतंत्रकुमार यांच्या नेतृत्वाखालील पीठाने हा निर्णय केला.

दिनविशेष :

  • 1615 :मोघल साम्राज्याचा  बादशहा औरंगजेब यांचा जन्म झाला.
  • 1897 : सावित्रीबाई फ़ुले यांचा जन्म.
  • 1952 : पिंपरी येथे हिंदूस्थान अ‍ॅंटिबायोटिक्स या पेनिसिलिन कारखान्याचे काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते उदघाटन झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.