औरंगाबाद प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती

औरंगाबाद प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती

1. औरंगाबाद जिल्हा :
  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – औरंगाबाद
  • क्षेत्रफळ – 10,107 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या – 36,95,928 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – 9 – कन्नड, सिल्लोड, सोयगांव, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद, पैठण, फुलंब्री.
  • सीमा – उत्तरेस जळगाव जिल्हा, पूर्वेस जालना जिल्हा, दक्षिणेस गोदावरी नदीच्या पलीकडे बीड, पश्चिमेस नाशिक जिल्हा आहे.
औरंगाबाद जिल्हा विशेष –
  • या शहराचे पुवीचे नाव ‘खडकी’ होते.
  • मलीक अंबर याने 1604 मध्ये या शहराची स्थापना केली व पुढे 1626 मध्ये या शहराचे नाव ‘फत्तेहपूर’ असे ठेवले गेले.
  • 1653 मध्ये औरंगाजेब सुभेदार म्हणून आल्यानंतर त्यांनी या शहराला ‘औरंगाबाद’ असे नाव दिले.
  • औरंगाबाद जिल्हा अंजिंठा आणि वेरूळ लेण्यामुळे प्रसिद्ध आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –
  • औरंगाबाद – येथील ‘बीबी का मकबरा’ दख्खनचा ताजमहाल म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद येथील पाणचक्की पाहण्याजोगी आहे. येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विधापीठाचे मुख्य कार्यालय आहे.
  • दौलताबाद – ‘देवगिरी’ हा यादवकालीन किल्ला आहे. देवगिरी ही यादवाजी राजधानी होती. पुढे दिल्लीचा सुलतान महंमद तुगलकाने देवगिरीचे नाव ‘दौलताबाद’ ठेवले.
  • खुलताबाद – येथे मोगल सम्राट औरंगजेबाची कबर आहे.
  • वेरूळ – खुलताबाद तालुक्यात वेरूळची लेणी किंवा गुंफा मंदिरे आहेत. तेथील कैलास लेणी जगप्रसिद्ध आहेत. श्री घृष्णेश्वर हे बारावे व शेवटचे ज्योतिर्लिंग येथे आहे.
  • अजिंठा – सिल्लोड तालुक्यात अजिंठ्याचा जगप्रसिद्ध लेणीसमूह आहे.
  • पैठण – येथे एकनाथांची समाधी आहे. जायकवाडी प्रकल्पातील ‘नाथसागर’ जलाशय येथेच आहे.
  • आपेगांव – संत ज्ञानेश्वराचे जन्मस्थळ.
  • पितळ्खोरा – बौद्धकालीन लेणी ही भारतातील सर्वात प्राचीन लेणीगणली जाते.
औरंगाबाद जिल्ह्याची वैशिष्ट्ये –
  • पाणी व जमिन व्यवस्थापन संस्था (WALMI)- औरंगाबाद
  • घुष्णेश्वर हे पवित्र ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? – औरंगाबाद
  • जायकवाडी वनोध्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? – औरंगाबाद
  • औरंगाबाद जिल्ह्यातून कोणकोणत्या नद्या वाहतात?
  • – गोदावरी, दूधना, खाम, येळगंगा, पूर्णा, वाघूर, केळणा, अंजना, गिरजा, शिवणा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विधापीठ कोठे आहे? – औरंगाबाद
  • औरंगाबाद जिल्ह्यामध्ये प्रमुख शेतकी उत्पादने कोणकोणती होतात? – बाजारी, ज्वारी, करडई, उस, केळी, द्राक्ष.
  • पैठण्या व शालूसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध शहर कोणते? – पैठण
  • हिमरू शालीसाठी प्रसिद्ध शहर कोणते? – औरंगाबाद
  • औरंगाबाद जिल्ह्यातील औधोगिक वसाहती कोणत्या?- औरंगाबाद, चिखलठाणा, पैठण, वाळूंज
  • पैठण-जायकवाडी जलविधुत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? – औरंगाबाद
  • प्रादेशिक वस्तुसंग्रहालय कोठे आहे? – औरंगाबाद
  • महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा कोणता? औरंगाबाद
  • औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवर कोणते धरण आहे? – जायकवाडी धरण
  • पितळ्खोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? – औरंगाबाद
  • म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? – औरंगाबाद
  • कैलास लेणे कोठे आहे? – वेरूळ
  • देवगिरी- दौलताबाद किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? – औरंगाबाद
  • औरंगाबाद जवळ चिखलठाणा येथे विमानतळ आहे.
  • भारतात अलाहाबादनंतर खुलताबाद येथे हनुमानाची मूर्ती निद्रिस्त अवस्थेत आहे. या ठिकाणाला भद्रा मारुती म्हणून ओळखल्या जाते.
  • जायकवाडी हा राज्यातील सर्वात मोठा बहुद्देशीय प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यात आहे. या धरणाच्या जलाशयास नाथसागर म्हणून ओळखले जाते.
  • औरंगाबाद शहर हे बावन्न दरवाजांचे शहर ओळखले जाते.
2. जालना जिल्हा :
  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – जालना
  • क्षेत्रफळ – 7,718 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या – 19,58,486 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – 8 – जालना अंबड, भोकरदन, जाफराबाद, परतूर, मंठा, बदनापूर, घनसांवगी.
  • सीमा – उत्तरेस जळगाव जिल्हा, पूर्वेस परभणी जिल्हा असून ईशान्येस बुलढाणा जिल्हा, दक्षिणेस बीड, पश्चिमेस औरंगाबाद जिल्हा, नैऋत्येस अहमदनगर जिल्हा आहे.
जालना जिल्हा विशेष –
  • औरंगाबाद आणि परभणी या जिल्हयांनी पुनर्रचना करून 1 मे 1981 ल महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर जालना हा नवीन जिल्हा अस्तीत्वात आला.
  • जालना जिल्ह्यात लमाणी व भिल या जाती आढळतात.
जालना जिल्ह्यातील महत्वाची स्थळे –
  • जालना – जालना हे शहर बी बियाण्यांच्या उत्पादनासाठी व व्यापारासाठी विशेष प्रसिद्ध आहे.
  • अंबड – मात्स्सोदरी देवीचे व खंडोबाचे मंदिर प्रसिद्ध आहे.
  • जांब – समर्थ रामदासाचे जन्मस्थान
जालना जिल्ह्याची वैशिष्ट्ये –
  • जांबसमर्थ हे धार्मिक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? – जालना
  • जालना जिल्ह्यातील औधोगिक वसाहती कोणत्या? – जालना, अंबड, परतूर
  • जालना जिल्ह्यातील प्रमुख औधोगिक उत्पादने कोणती? – हस्तकला, कापड, औषधे, साखर, यंत्रासामग्री, सीमेंट पाईप, विडी, तेलबिया, सूत गिरणी
3. लातूर जिल्हा :
  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – लातूर
  • क्षेत्रफळ – 7,157 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या – 24,55,543 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – 10 – लातूर, अहमदपूर, औसा, निलंगा, उदगीर, चाकूर, देवणी, शिरूर-अनंदपाळ, जळकोट, रेणापुर.
  • शेजारी जिल्हे – उत्तरेस परभणी आणि पूर्वेस परभणी जिल्हा असून पूर्वेस व उत्तरेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस व पश्चिमेस उस्मानाबाद जिल्हा, वायव्येस बीड जिल्हा असून आग्नेयेस कर्नाटक राज्यातील बीदर जिल्हा आहे.
लातूर जिल्हा विशेष –
  • उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करून 16 ऑगस्ट 1982 ला स्वतंत्र ‘लातूर’ जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
  • पुरातनकाळात लातूरला सत्पुर, श्रीपूर, रत्नापूर अशी नवे होती. कालांतराने त्याचा लोप होऊन लातूर हे नाव पडले असावे. पेशवाईमध्ये ‘लातूरी नाणे’ चलनात होते.
  • ‘लातूर पॅटर्न’ मुळे शैक्षणिक क्षेत्रात फार मोठी क्रांती घडून आली.
लातूर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –
  • लातूर – हे शहर मराठवाड्यातील ‘विधेचे माहेरघर’ गणले जाते. येथील सुरताशाहवाली दर्गा, सिद्धेश्वर मंदिर, केशवराज मंदिर व पार्श्वनाथ मंदिर प्रसिद्ध आहेत.
  • उद्गीर – उदगीरचा यादवकालीन भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे.
  • ओस – औरंगजेबाने बाधलेली मास्जिद प्रसिद्ध आहे.
  • खरोसा – हे गाव हिंदू व बौद्ध लेण्यासाठी प्रसिद्ध आहे.
  • रेणापुर – येथील रेणुकादेवीचे मंदिर व हलती दीपमाळ प्रसिद्ध आहे.
  • वडवळ – अहमदपूर तालुक्यातील या गावालगत औषधी वनस्पती असलेली टेकडी आहे.
  • निलंगा – नीलकंठश्वरचे प्रसिद्ध मंदिर व दूधभुकटीचा कारखाना.
  • हत्ती बेट – हतीच्या आकाराचा हा डोंगर ‘हत्ती बेट’ म्हणून प्रसिद्ध आहे. डोंगरावर हत्तीच्या आकाराचे भरपूर दगड, प.पू. गंगाराम महाराजांचे समाधीस्थान आहे.
लातूर जिल्ह्याची वैशिष्ट्ये –
  • लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी – मांजरा नदी.
  • लातूर हे शहर मराठवाड्यातील विधेचे माहेर घर गणले जाते.
  • लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग एकही नाही.
  • लातूर जिल्ह्यातील देवणी, शिरूर-अनंतपाळ व जळकोट हे तीन तालुके 26 जून 1999 पासून अस्तित्वात आली.
  • 30 सप्टेंबर 1993 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तुर व लातूर जिल्ह्यातील किल्लारी या गावांना भूकंपामुळे फार मोठ्या संकटाला तोंड धावे लागले.
  • सूर्यफुलाच्या उत्पादनात आशिया खंडात लातूर जिल्ह्यात पहिला क्रमांक आहे. खाद्यतेलाच्या बाबतीत भारतामध्ये आघाडीवर आहे.
4. बीड जिल्हा :
  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – बीड
  • क्षेत्रफळ – 10,693 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या – 25,85,962 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – 11 – गेवराई, आष्टी, माजलगांव, पाटोडा, केज, अंबाजोगाई, धारूर, परळी, बीड, शिरूळ-कासार, वडवणी.
  • सीमा – उत्तरेस जालना व औरंगाबाद हे दोन जिल्हे, पूर्वेस लातूर जिल्हा, दक्षिणेस उस्मानाबाद जिल्हा, पश्चिमेस अहमदनगर जिल्हा, ईशान्येस परभणी जिल्हा असून आग्नेयेस कर्नाटक राज्यातील बीदर जिल्हा आहे.
बीड जिल्हा विशेष –
  • 1 नोव्हेंबर 1956 ला व्दिभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आल्यानंतर बीड जिल्हा या राज्याचा एक भाग बनला.
  • पुढे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करण्यात आला.
  • बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोर्‍यात बिळासारख्या किंवा खळग्यासारख्या ठिकाणी हे शहर बसले असल्याने ‘बीळ’ या शब्दावरून या जिल्ह्याचे नाव ‘बीड’ असे पडले असावे अशी उपपत्ती आहे.
  • हा ऐतिहासिक जिल्हा आहे. भारतातील प्रसिद्ध गणितज्ञ भास्कराचार्य हे बीडचेच होते. उस कामगारासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे.
बीड जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –
  • बीड – शहरात कंकालेश्वराचे जलमंदिर आहे. शहराजवळ ‘खजाना’ ही प्रसिद्ध विहीर असून तिचे पाणी कधीच आटत नाही. येथील औष्णिक विधुत केंद्र राष्ट्रीय पातळीवरही महत्वाचे गणले जाते.
  • मांजरशुभा – जवळच ‘कपिलधार’ नावाचा धबधबा आहे.
  • राक्षसभुवन – 10 ऑगस्ट 1763 रोजीची पेशवा व निजाम यांच्यातील निर्णायक युद्धाची जागा येथील शनिमंदिर प्रसिद्ध आहे.
  • आष्टी – येथील हजारतशाह बुखारी यांचा दर्गा अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
  • आंबेजोगाई- जोगाई व खोलेश्वर यांची प्राचीन मंदिरे, आधकवी मुकुंदराज व संतकवी दासोपंत यांच्या समाधीसाठी प्रसिद्ध.
  • परळी – येथील बैजनाथाचे मंदिर प्रसिद्ध असून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.
बीड जिल्ह्याची वैशिष्ट्ये –
  • बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी गोदावरी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते.
  • बीड येथे चर्मोधोग प्रकल्प मराठवाडा विकास महामंडळातर्फे राबविण्यात येते.
5. उस्मानाबाद जिल्हा :
  • जिल्हाचे मुख्य ठिकाण – उस्मानाबाद
  • क्षेत्रफळ – 7,569 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या – 16,60,311 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – 8 परांडा, भूम, उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब, उमरगा, वाशी, लोहारा.
  • सीमा – उत्तरेस बीड जिल्हा, पूर्वेस लातूर जिल्हा, दक्षिणेस कर्नाटक राज्य, पश्चिमेस सोलापूर जिल्हा, वायव्येस अहमदनगर जिल्हा आहे.
उस्मानाबाद जिल्हा विशेष –
  •  उस्मानाबादचे पूर्वीचे नाव ‘धाराशीव’ असे होते. 1910 मध्ये तत्कालीन निजाम मीर-उस्मानअली याने या शहरास स्वत:चे नाव दिले. तेव्हापासून हे शहर ‘उस्मानाबाद’ म्हणून ओळखले जाते.
  •  उस्मानाबाद हा जिल्हा प्राचीन लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. कुंथलगिरीची नैन लेणी, चांभार लेणी व धाराशीवलेणी या लेण्या प्रसिद्ध आहेत.
  •  या जिल्ह्यातील तेर येथे उत्खननात रोमन संस्कृतीशी जुळणार्‍या वस्तु सापडल्या. यावरून प्राचीन धाराशीवचा ग्रीक व रोमन संस्कृतीशी संबंध असावा.
उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –
  • उस्मानाबाद – उस्मानाबाद येथील हजरत ख्याजा शम्सुद्दीन गाझीचा दर्गा अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
  • तुळजापूर – महाराष्ट्रचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी किंवा भवानी मातेच्या मंदिरामुळे राज्यात प्रसिद्ध.
  • नळदुर्ग – हे ठिकाण भुईकोट किल्यामुळे प्रसिद्ध आहे. ‘पाणी महल’ हे नळदुर्गाच्या किल्यातील प्रमुख आकर्षण आहे.
  • तेरणा – तेरणा हे ऐतिहासिक गाव बौद्धकालीन स्तूप व संत गोरा कुंभाराचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
  • परांडा – एकेकाळची निजामशाहीची राजधानी. ऐतिहासिक किल्ला व संतकवी हंसराज स्वामीचा मठ.
  • डोणगाव – रामदास स्वामीचे पट्टाशिष्य कल्याणस्वामी यांचा मठ व ख्वाजा बद्रुद्दीन साहेबांचा दर्गा यासाठी प्रसिद्ध.
उस्मानाबाद जिल्ह्याची वैशिष्ट्ये –
  • तेर वस्तुसंग्राहालय कोणत्या जिल्हयात आहे? – उस्मानाबाद
  • उस्मानाबाद जिल्ह्यातून कोणकोणत्या नाद्या वाहतात? – गिरणा, सिना, मांजरा, तेरणा, बोरी, लावरज
  • उस्मानाबाद जिल्हयामध्ये कृषी उत्पादनाच्या प्रमुख बाजारपेठा कोणत्या? – उस्मानाबाद, उमरण, तुळजापूर, कळंब
  • उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोणत्या औधोगिक वसाहती आहेत? – उस्मानाबाद, भूम, कळंब
  • उस्मानाबाद जिल्ह्यातून गेलेल्या लोहमार्गाची एकूण लांबी किती? – मिरज-लातूर (नॅरोगेज), 30 कि.मी.
  • उस्मानाबाद जिल्ह्यातून गेलेले राष्ट्रीय हमरस्ते कोणते? – पुणे-सोलापूर-हैद्राबाद (क्र.9)
6. परभणी जिल्हा :
  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – परभणी
  • क्षेत्रफळ – 6,517 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या – 18,35,982 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – 9 – जिंतूर, पाथ्री, परभणी, गंगाखेड, पूर्णा, पालम, सेलू, सोनपेठ, मानवत.
  • सीमा – उत्तरेस हिंगोली जिल्हा, पूर्वेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस लातूर व बीड हे दोन जिल्हे, पश्चिमेस बीड व जालना हे दोन जिल्हे आहेत.
परभणी जिल्हा विशेष –
  • या शहरात प्रभावती देवीचे प्राचीन मंदिर आहे, या देवीच्या नावावरूनच या शहराचे परभणी हे नाव पडले. जिल्हा निजामानंतर मुंबई प्रांताचा आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याचा घटक बनला.
  • संत जनाबाईचा जन्म याच जिल्ह्यातील गंगाखेड येथे झाला होता.
परभणी जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –
  • परभणी – मराठवाडा कृषी विधापीठाचे मुख्य ठिकाण आहे. येथील शिवाजी उधान प्रेक्षणीय असून येथील रोशनखान गाढीही प्रसिद्ध आहे.
  • मानवत – मानवत ही कापडाची मोठी बाजारपेठ आहे.
  • गंगाखेड – तालुक्याचे मुख्य ठिकाण ‘दक्षिण काशी’ नावाने ओळखले जाते. येथे संत जनाबाईची समाधी आहे.
  • चारगणा – जिंतुर तालुक्यात दगडी झुलता मनोरा आहे.
  • जिंतुर – तालुक्याचे ठिकाण . येथील गुहा व जैन शिल्पे प्रसिध्द.
  • पूर्णा – पूर्णा व गोदावरी या दोन नद्यांचा संगम.
  • जांभूळभेट – मोरसाठी प्रसिध्द.
परभणी जिल्ह्याची वैशिष्ट्ये –
  • परभणी जिल्ह्यातून कोणत्या नद्या वाहतात ?  गोदावरी, पूर्णा, पैनगंगा, दूधणा
  • मराठवाडा कृषि विद्यापीठ कोठे आहे?  परभणी
  • परभणी जिल्ह्यामध्ये प्रमुख ओद्योगिक उत्पादन कोणते?  साखर, हातमाग, कापड, कातडी कसावणे.
  • परभणी जिल्ह्यातून गेलेल्या लोहमार्गाची एकूण लांबी किती ? मनमाड-काचीकुडा (मिटरगेज), परळी-परभणी (मिटरगेज), पूर्णा-हिंगोली-अकोला (मिटरगेज)
7. हिंगोली जिल्हा :
  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – हिंगोली
  • क्षेत्रफळ – 4,524 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या – 11,78,973 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – 5 – हिंगोली, सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी.
  • सीमा – उत्तरेस बुलढाणा व वाशिम हे दोन जिल्हे, पूर्वेस नांदेड व यवतमाळ हे दोन जिल्हे, दक्षिणेस नांदेड व परभणी हे दोन जिल्हे, पश्चिमेस परभणी व जालना हे दोन जिल्हे आहेत.
हिंगोली जिल्हा विशेष –
  • परभणी जिल्ह्याचे विभाजन करून 1 मे 1999 ला महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर हिंगोली हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला.
  • धार्मिक जनांची अनेक श्रध्दास्थाने जपणारा हा जिल्हा आहे. याला संत नामदेवाचा जिल्हा संबोधल्या जाते.
हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –
  • हिंगोली – हिंगोली येथे जनावरचा मोठा दवाखाना आहे. येथील दसरा महोत्सव प्रसिध्द आहे.
  • वसमत – येथे प्लायवूडचा कारखाना आहे. येथे हातमागावरील व यंत्रमागावरील कापडाची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते.
  • औंढा नागनाथ – हे स्थान देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक गणले जाते. येथे संत नामदेव व त्यांचे गुरु विठोबा खेचर यांच्या समाध्या आहेत.
  • येलदरी – या ठिकाणी वीजनिर्मिती केंद्र उभारण्यात आले आहे.
  • नरसी – येथील नृसिंहाचे मंदिर प्रसिध्द आहे. हे संत नामदेवाचे जन्मस्थान मानले जाते.
  • शिरडशहापूर – येथील जैन मंदिर प्रसिध्द आहे.
  • भाटेगाव – कळमनुरी तालुक्यात मत्स्यबीज केंद्र आहे.
हिंगोली जिल्ह्याची वैशिष्ट्ये –
  • हिंगोली जिल्ह्यातील नरसी हे ठिकाण संत नामदेवांचे जन्मस्थान मानले जाते.
  • हिंगोली जिल्ह्यात सिध्देश्वर व येलदरी येथे पूर्णा नदीवर धरणे बाधण्यात आली आहेत.
  • औरंगाबाद प्रशासकीय विभागास मराठवाडा म्हटले जाते.
  • मराठवाड्यात 8 जिल्हे आहेत.
  • मराठवाडयातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा – बीड
  • मराठवाडयातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा – हिंगोली
  • मराठवाडयातील लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा – औरंगाबाद
8. नांदेड जिल्हा :
  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – नांदेड
  • क्षेत्रफळ – 10,528 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या – 33,56,556 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – 16 – किनवट, हदगाव, नांदेड, मुखेड, भोकर, कंधार, बिलोली, देगलूर, लोहा, मुदखेड, उमरी, हिमायतनगर, धर्माबाद, माहुर, नायगाव, अर्धापूर.
  • सीमा – उत्तरेस यवतमाळ जिल्हा ,दक्षिणेस कर्नाटक राज्यातील बिदर जिल्हा असून पूर्वेस आंद्रप्रदेशातील निजामाबाद व आदिलाबाद हे दोन जिल्हे आहेत. पश्चिम व वायव्येस परभणी जिल्हा असून पश्चिम व नैऋर्त्येस लातूर जिल्हा आहे.
नांदेड जिल्हा विशेष –
  • नांदेड या भागात नंद घराण्याचे राज्य होते. त्यामुळे या प्रदेशास ‘नंदतट’ असे म्हटले जाते.
  • ‘नंदतट’ या शब्दाचा आपभ्रश होत जाऊन नांदेड हे नाव पडले असावे अशी एक उत्पत्ती आहे.
  • येथे शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंदसिंहजी यांची एका अफगाणाकडून हत्या केली गेली.
  • गुरुगोविंदसिंह यांची समाधी नांदेड येथे आहे.
नांदेड जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –
  • नांदेड – शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंदसिंहजी  यांची समाधी नांदेड येथे आहे. येथील गुरुव्दारा सचखंड प्रसिध्द आहे. जगभरातील शिखांचे पवित्र तिर्थस्थान आहे. जवळच नरळी येथे कुष्टरोग्यासाठी वसविण्यात आलेले ‘नंदनवन’ हे कुष्ठधाम आहे.
  • किनवट- जवळच किनवट अभयारण्य आहे. हे अभयारण्य पर्यटकांचे आकर्षण स्थळ बनले आहे.
  • माहुर- येथील दत्तशिखरावर रेणुकामातेचे मंदिर आहे. जवळच ‘माहुरगड’ धरण हे पर्यटन केंद्र होत आहे. माहुर जवळ राष्ट्रकूट काळातील लेण्या असून ह्या लेण्या ‘पांडव लेणी’ म्हणून ओळखल्या जातात. या लेणीमध्दे महादेवाची पिंड आहे.
  • कंधार – यरठून जवळच ‘मण्याड’ धरण हे एक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत आहे.
  • देगलूर – धुंदा महाराज यांचा मठ या गावात आहे. या महाराजांनी 1818 मध्ये पंढरपूर येथे समाधी घेतील.
  • उनकदेव – शिव मंदिरासाठी हे गाव प्रसिध्दा आहे.
  • मुदखेड – गावात अपरंपार स्वामींचा 600 वर्ष जुना मठ आहे.
  • माळेगाव – हे गाव लोहा तालुक्यात असून येथे दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा भरते.
नांदेड जिल्ह्याची वैशिष्ट्ये –
  • नांदेड कोणत्या नदीच्या काठावर आहे ? गोदावरी.
  • नांदेड जिल्ह्यामध्ये मन्याड नदीवर कोणते धरण आहे? मन्याड धरण.
  • नांदेड जिल्ह्यात कोणत्या नदया वाहतात? गोदावरी , पैनगंगा , मांजरा , आसना, सीता, दूधणा, सरस्वती , मन्यार, लेंडी, कायाधू, मन्याड.
  • माहुर वस्तुसंग्रालय कोणत्या जिल्ह्यात आहे ? नांदेड.
  • महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता ? नांदेड.
  • नांदेड नगरीत गुरु-ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळा 24 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2008 या कालावधीत संपन्न झाला.

 

You might also like
1 Comment
  1. Shanke nagesh says

    Q paper

Leave A Reply

Your email address will not be published.