अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी संपूर्ण माहिती

अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी संपूर्ण माहिती

  • राजकीय मुत्सद्दी नेते, निष्णात वाक्पटू आणि संवेदनशील कवी, अशी ओळख असलेले भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले.
  • प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते चालण्याफिरण्यास असमर्थ आहेत.
  • त्यामुळे राजशिष्टाचार बाजूला ठेवून राष्ट्रपती स्वत: कृष्णमेनन मार्गस्थित वाजपेयींच्या निवासस्थानी गेले आणि त्यांना ‘भारतरत्न’ प्रदान केला.
  • जन्म : 25 डिसेंबर 1924, (ग्वाल्हेर) 

  • शिक्षण : राज्यशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी

 राजकीय कार्य :

  • आर्य कुमार सभेच्या माध्यमातून ग्वाल्हेरमधून 1939 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश.
  • 1942 मध्ये भारत छोडो चळवळीत सहभाग, अटक.
  • श्‍याम प्रसाद मुखर्जी यांच्यासमवेत भारतीय जनसंघाचे काम.
  • 1957 मध्ये बलारामपूर मतदारसंघातून संसदेत प्रवेश.
  • विरोधी पक्षात अभ्यासपूर्ण आणि उल्लेखनीय कारकिर्द
  • आणीबाणीनंतर जनता पक्षामधून दिल्ली मतदारसंघातून संसदेवर.
  • बहुमतातील जनता पक्षाच्या सरकारमध्ये मार्च 1977 ते जुलै 1979 दरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री. याशिवाय 2 वेळा अत्यल्प काळासाठी परराष्ट्रमंत्री.
  • 1980 मध्ये लालकृष्ण अडवाणी आणि भैरोसिंग शेखावत यांच्यासोबत मिळून भारतीय जनता पक्षाची स्थापना.
  • भारतीय जनता पक्षाचे पहिले अध्यक्ष.
  • 1996 च्या लोकसभेसाठी पंतप्रधान पदासाठीचे उमेदवार.
  • 16 मे 1996 ते 1 जून 1996 या केवळ 13 दिवसांसाठी पंतप्रधानपदी विराजमान.
  • त्यानंतर बहुमत सिद्ध होण्यापूर्वीच पंतप्रधानपदाचा राजीनामा.
  • 19 मार्च 1998 ते 22 मे 2004 दरम्यान पुन्हा पंतप्रधानपद.

 अटलबिहारी वाजपेयी यांनी घेतलेले प्रमुख निर्णय :

  • मे 1998 मध्ये पोखरण येथे जमिनीखाली अणुचाचण्या.
  • 1998 साली पाकिस्तानसोबत चर्चेसाठी लाहोर भेट, लाहोर-दिल्ली दरम्यान बससेवेची सुरुवात.
  • 1999 साली कारगिलमध्ये पाकिस्तान सैन्याच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला (कारगिल युद्ध)
  • काठमांडूवरून दिल्लीला जाणारे भारतीय प्रवासी विमानाचे अपहरण झाल्यावर तीन दहशतवाद्यांच्या बदल्यात सर्व प्रवाश्‍यांची सुखरूप सुटका.

 अटलबिहारी वाजपेयी यांना मिळालेले पुरस्कार :

  1. 1992 – पद्मविभूषण पुरस्कार
  2. 1993 – कानपुर विश्‍वविद्यालयाची डि.लीट.
  3. 1994 – लोकमान्य टिळक पुरस्कार
  4. 1994 – उत्कृष्ट संसद पटू : भारतरत्न पंडित गोविंद वल्लभपंत पुरस्कार
  5. 2014 – भारतरत्न

 अटलबिहारी वाजपेयी यांचे साहित्यिक कार्य :

  1. मासिक राष्ट्रधर्म, साप्ताहिक पाञ्चजन्य, दैनिक स्वदेश, दैनिक अर्जुन या नियतकालिकांचे संपादक म्हणून काम.
  2. प्रकाशित पुस्तके
  3. मेरी संसदीय यात्रा (चार खंड)
  4. मेरी इक्‍यावन कवितायें (कवितासंग्रह)
  5. स्नकल्प काल
  6. शक्ती से शक्ती
  7. फोर डिकेड्‌स ऑफ पार्लमेंट (तीन खंड)
  8. लोकसभा में अटलजी (भाषणांचा संग्रह)
  9. मृत्यु या हत्या
  10. अमर बलिदान
  11. कैदी कविराज की कुंडलिया (आणीबाणीच्या काळात तुरुंगात लिहिलेल्या कविता)
  12. न्यू डायमेंशन्स ऑफ इंडियाज्‌ फॉरिन पॉलिसी (a collection of speeches delivered as External Affairs Minister during 1977-79)
  13. जनसंघ और मुसलमान
  14. संसद मे तीन दशक (Speeches in Parliament 1957-1992)
  15. अमर आग है (कविता संग्रह)
  16. न दैन्यं न पलायनम्‌ (कविता संग्रह)
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.