अमरावती प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती

अमरावती प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती

1. अमरावती जिल्हा :
 • जिल्ह्याचे मुख्य ठिकाणअमरावती
 • क्षेत्रफळ12,210 चौ.कि.मी.
 • लोकसंख्या28,87,826 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
 • तालुके14 – अचलपूर, मोर्शी, दर्यापूर, अमरावती, चांदुरबाजार, भातकुली, अंजनगांव (सुर्जी), नांदगांव (खं.), चिखलदरा, धारणी, वरुड, तिवसा, चांदूर रेल्वे, धामनगांव रेल्वे.
 • सीमा – अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, दक्षिणेस यवतमाळ जिल्हा असून पूर्वेस नागपूर व वर्धा हे दोन जिल्हे आहेत. पश्चिम व नैऋत्येस अकोला जिल्हा आहे.
अमरावती जिल्हा विशेष –
 • अमरावती येथे पूर्वी उंबराची झाडे मोठ्या प्रमाणात होती. उंबराच्या या झाडांवरून उंदुबरावती असे झाले व कालांतराने उमरावतीचे अमरावती असा अपभ्रंश होत जावून आजचे अमरावती हे नाव उदयास आले.
 • अमरावती जिल्हयातल कौंडन्यपूर हे गाव रुख्मिणीचे माहेर म्हणून प्रसिद्ध. डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांची कर्मभूमी. डॉ. पंजाबराव देशमुख, विर वामनराव जोशी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे बाबा अशा थोर पुरुषांची जन्मभूमी.
 • अमरावती विधापिठाचे नामकरण ‘संत गाडगे बाबा अमरावती विधापीठ’ असे करण्यात आले.
अमरावती जिल्हयातील प्रमुख स्थळे
 • अमरावती – येथील संत गाडगे महाराजांनी समाधी व अंबादेवी मंदीर प्रसिद्ध आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे मुख्यालय येथे आहे.
 • चिखलदरा – थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले हे स्थळ विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाते.
 • परतवाडा  – इमारती लाकडाच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे.
 • रिद्धपूर – येथे गोविंद्प्रभुंची समाधी आहे. महानुभावांची काशी म्हणून प्रसिद्ध.
 • शेडगावसंत गाडगे महाराजांचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे.
 • मोझरी – संत तुकडोजी महाराजांनी स्थापना केलेला गुरुकुंज आश्रम येथे आहे. महाराजांची समाधी येथेच आहे.
 • ऋणमोचन – येथील मुदगलेश्वराचे मंदीर प्रसिद्ध आहे.
 • बडनेरा – विड्याच्या पानासाठी बडनेरा परिसर प्रसिद्ध आहे.
 • कौंडिण्यपुर – विदर्भाची पौराणिक राजधानी कुंडीनपूर या नावाने महाभारतात प्रसिद्ध असलेले आता कौंडिण्यपुर म्हणून ओळखले जाते. प्राचीन अवशेषांकरिता विशेष प्रसिद्ध आहे.
 • सालबर्डी – हे गाव मोर्शी तालुक्यात असून मारू नदीच्या काठावर वसलेले आहे. गावाजवळच 2 बौद्ध व 5 हिंदू लेणी आहेत. शिवाय नुकत्याच काळात पाशुपत पंथाच्या 2 लेण्यांचा शोध लागलाय. तसेच लंकेश्वर व पंचवतार मंदिरे, डोंगरावरील शिव मंदीर प्रसिद्ध आहे.
अमरावती जिल्हयाची वैशिष्ट्ये –
 • कुंडीनपूरचा राजा भीष्मकाची कन्या रुक्मिणी ही भगवान श्रीकृष्णाची पत्नी असल्याचा उल्लेख महाभारतात सापडतो.
 • वर्धा नदीच्या काठावर कौंडण्यपुर येथे विठ्ठल-रुक्मिणी चे मंदीर विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे मोठी यात्रा भरल्या जाते. ही भगवान श्रीकृष्णाची पत्नी असल्याचा उल्लेख महाभारतात सापडतो.
 • मर्यादापुरषोत्तम रामाचे आजी अजोबा नल, दमयंतीपैकी नल यांची कौंडण्यपुर ही जन्म नगरी असल्याचा उल्लेख आढळतो.
 • अमरावती जिल्ह्यातून वाहणार्‍या नद्या – तापी, पूर्णा, वर्धा, पेढी, चंद्रभागा, विदर्भा, गाडगा, सिपना, शहाणूर
 • अमरावती जिल्ह्यामध्ये औधोगिक वसाहती – अमरावती, अंजनगाव, दर्यापूर, अचलपूर, मोर्शी, वरुड.
 • ढाकणे-कोलखाज वन्यप्राणी अभयारण्य अमरावती जिल्ह्यात आहे.
 • अमरावती विधापिठाचे नाव-संत गाडगे बाबा अमरावती विधापीठ.
 • अमरावती जिल्ह्यामध्ये कृषी उत्पादनाच्या प्रमुख बाजारपेठा- अमरावती, चांदूर, दार्यापूर, अचलपूर, धामनगांव, वरुड.
 • अमरावती जिल्ह्यामध्ये  प्रमुख औधोगिक उत्पादने – तेल गाळणे, हस्तकला, यंत्रमाग, कापड, हातमाग.
 • अमरावती जिल्ह्यातून गेलेला राष्ट्रीय हमरस्ता – घुळे-कलकत्ता (6)
 • अमरावती जिल्ह्यातील आदिवासी जमाती – कोरकू व गोंड
 • अमरावत जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण – चिखलदरा
2. अकोला जिल्हा :
 • जिल्ह्याचे मुख्य ठिकाणअकोला
 • क्षेत्रफळ 5,429 चौ.कि.मी.
 • लोकसंख्या18,18,617 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
 • तालुके7 – अकोट, बाळापूर, तेल्हारा, अकोला, मूर्तीजापूर, पातुर, बार्शी टाकळी.
 • सीमा – उत्तरेस व पूर्वेस अमरावती जिल्हा, दक्षिणेस वाशिम जिल्हा असून पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.
अकोला जिल्हा विशेष –
 • अकोला हे शहर अकोलसिंग नावांच्या रजपूत सरदाराने वसविले असल्याचे सांगितले जाते. या शहराचा ‘आईन-ए-अकबरी’ यामध्ये नरनाळ्याच्या सुभ्याचा अकोला हा एक परगणा असल्याचा उल्लेख आढळतो. कापसाचे आगार म्हणून हा जिल्हा ओळखला जातो.
 • 22 किमी. क्षेत्रावर पसरलेला, 67 बुरूज व 27 दरवाजे असलेला किल्ला इतिहास प्रसिद्ध असू गाविलगडच्या पर्वतरांगेत वसला आहे.
अकोला जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –
 • अकोला – मोरणा नदीमुळे या शहराचे जुने व नवे असे दोन भाग पडलेले आहे. पंजाबराव कृषी विधापीठाचे मुख्य ठिकाण, सतीमाता मंदीर व जैन मंदीर व जैन मंदीर प्रसिद्ध आहे.
 • बाळापूर – बालापूरचा किल्ला 1757 मध्ये इस्माईल खानाने पूर्ण केला या किल्ल्याच्या खाली बळादेवीचे मंदीर आहे.
 • नरनाळा – येथील 22 दरवाज्यांचा किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे. 1509 मध्ये महाबत खानाने बाधलेली मस्जिद आहे.
 • मूर्तीजापूर – येथे संत गाडगे महाराजांचा आश्रम आहे.
 • पातुर – हे साग व चंदनी लाकडासाठी प्रसिद्ध आहे.
 • पारस – औष्णिक वीज निर्मिती केंद्र.
 • अकोट – सतरंज्या व गोणी प्रसिद्ध.
 • आडगाव – ता. अकोट, मुगल काळातील परगण्याचे हे केंद्र. याच गावात 1671 साली व्दारकेश्वराचे मंदीर बाधण्यात आले. गावाजवळच इंग्रज अधिकारी मेजर बुलक याचे थडगे आहे.
 • हिवरखेड – आंब्यासाठी प्रसिद्ध आहे.
अकोला जिल्हयाची वैशिष्ट्ये –
 • मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात सातपुड्याच्या पर्वत रांगेतून उगम असलेली पूर्णा नदी ही अकोल्या जिल्ह्याची प्रमुख नदी होय.
 • अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम या जिल्ह्याची निर्मिती 1 जुलै 1998 रोजी करण्यात आली.
 • अकोला जिल्ह्यातून गेलेले राष्ट्रीय हमरस्ते – धुळे-कोलकत्ता (6)
 • अकोला जिल्ह्यात शिवाजी शिक्षण संस्थेच्या जास्त शाळा आहेत.
3. बुलढाणा जिल्हा :
 • जिल्ह्याचे मुख्य ठिकाणबुलढाणा     
 • क्षेत्रफळ9,661 चौ. कि.मी.
 • लोकसंख्या25,88,039 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
 • तालुके13 – जळगांव जामोद, मलकापुर, बुलढाणा, खामगांव, नांदुरा, चिखली, मेहकर, शेगाव, देऊळगांवराजा, सिंदखेडराजा, संग्रामपुर, लोणार, मोताळा.
 • सीमा – बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, दक्षिणेस परभणी व जालना हे दोन जिल्हे असून पूर्वेस अकोला जिल्हा आहे. पश्चिमेस औरंगाबाद व जळगाव हे दोन जिल्हे आहेत.
बुलढाणा जिल्हा विशेष –
 • प्राचीन ‘कुंतल’ देशात हा प्रदेश समाविष्ट होता. सम्राट अशोकाच्या साम्राज्याच्या हा प्रदेश एक भाग होता. भिल्लांचे वस्तीस्थान म्हणजे ‘भिल्लठाणा’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन बुलढाणा हे नाव रूढ झाले.
 • जिल्ह्याचे मुख्यालय असलेले बुलढाणा हे शहर वनश्रीने नटलेले व निसर्गरम्य स्थळ आहे. या शहराला विदर्भाचे प्रवेशव्दार म्हणून ओळखले जाते.
 • हजारो वर्षापूर्वी उल्का पडल्यामुळे या जिल्ह्यात लोणार हे ठिकाण खार्‍या पाण्याच्या सरोवरासाठी जगभर प्रसिद्ध आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख स्थळे – 
 • बुलढाणा – हे शहर अजिंठ्याच्या डोंगर रांगात वसले असून थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे.
 • खामगाव – येथे एक कुष्ठरोग निवारण केंद्र आहे. जवळच गारडगावाला प्रेक्षणीय बुद्ध विहार आहे.
 • मलकापुर – येथील गौरीशंकर मंदिर विहार आहे.
 • देऊळगाव राजा – देऊळगाव -राजा येथील बालाजी मंदीर प्रसिद्ध आहे.
 • शेगांव – येथे गजानन महाराजांची समाधी आहे.
 • सिंदखेड-राजाछत्रपती शिवाजी महाराजाच्या मातोश्री जिजाई यांचे जन्मस्थान
 • जामोद – जामोदचे प्राचीन जैन मंदीर प्रसिद्ध आहे.
 • लोणार – उल्कापातामुळे तयार झालेला तलाव व त्या शेजारी यादवकालीन मंदीर प्रसिद्ध आहे. 18 व्या शतकात लोणार महात्म्यही लिहिले गेले त्यात लवणासुर या राक्षसाची कथा या महात्म्यात येते.
बुलढाणा जिल्हयाची वैशिष्ट्ये –
 • राणीबाग वनोधान बुलढाणा जिल्ह्यात आहे.
 • लोणार क्रेटर वनोधान बुलढाणा जिल्ह्यात आहे.
 • बुलढाणा जिल्ह्यातून पेनगंगा, पूर्णा, पांडव, नळगंगा, बेंबळा, बाणगंगा, केदार, ज्ञानगंगा या नद्या वाहतात.
 • बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख औधोगिक उत्पादने कापड, यंत्रमाग, भांडी, तेल काढणे, साखर, हत्यारे ही आहेत.
 • बुलढाणा जिल्ह्यात नळगंगा नदीवर नळगंगा धरण आहे.
 • बुलढाणा जिल्ह्यातून गेलेल्या लोहमार्गाची एकूण लांबी मुंबई-भुसावळ-हावडा (ब्रोंडगेज), जलंब-खामगांव (ब्रोंडगेज), 46 कि.मी.  
4. वाशिम जिल्हा :
 • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण वाशिम       
 • क्षेत्रफळ5,153 चौ.कि.मी.
 • लोकसंख्या11,96,714 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
 • तालुके6 – वाशिम, मलेगांव, रिसोड, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा.
 • सीमा – उत्तरेस अकोला व अमरावती, दक्षिणेस यवतमाळ व हिंगोली जिल्हे असून पूर्वेस यवतमाळ आणि पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.
वाशिम जिल्हा विशेष –
 • 1 जुलै 1998 रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम जिल्हा निर्माण करण्यात आला.
 • वाशिमला पुरातन इतिहास आहे. वाशिमचे पुरातन नाव वत्सगुल्म होते. वत्स ऋषीच्या नावावरून हे नाव आले असावे. काही अवशेशावरून वाकाटक साम्राज्याचा संदर्भही वाशिम सोबत जोडला आहे.
 • या जिल्ह्याचा बराचसा भाग डोंगराळ व पठारी आहे. पैनगंगा ही या जिल्ह्याची प्रमुख नदी असून दक्षिण भाग सखल प्रदेशाचा आहे.
 • या जिल्ह्यामध्ये आंध, गोंड आणि बंजारा या आदिवासी जमाती येथे प्रामुख्याने आढळतात.
वाशिम जिल्ह्यातील प्रमुख स्थळे – 
 • वाशिम – येथील पद्मावती तलाव, मधेश्वर मंदिर आणि बालाजी मंदिर प्रसिद्ध आहे.
 • कारंजा – नृसिंह सरस्वतीचे जन्मस्थान. येथील जैन मंदिर प्रेक्षणिय आहे.
 • तर्हाळा – हे पठाण लोकांचे पवित्र स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
 • रिसोड – अमरदासबाबांचे मंदिर आहे.
5. यवतमाळ जिल्हा :
 • जिल्ह्याचे मुख्य ठिकाणयवतमाळ
 • क्षेत्रफळ13,582 चौ.कि.मी.
 • लोकसंख्या27,75,457 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
 • तालुके16 – दारव्हा, यवतमाळ, पुसद, राळेगांव, वणी, बाभुळगांव, कळंब, मारेगांव, पांढरकवडा, घाटंजी, दिग्रस, नेर, उमरखेड, महागांव, आर्णी, झरिजामाणी.
 • सीमाउत्तरेस वर्धा व अमरावती जिल्हा, दक्षिणेस नांदेड जिल्हा व आंध्र प्रदेश आहे. पूर्वेस चंद्रपूर जिल्हा आणि पश्चिमेस परभणी व अकोला जिल्हा आहे.
यवतमाळ जिल्हा विशेष –
 • यवतमाळ शहराचे नाव पूर्वी यवत किंवा यवते असे असावे. यवते चा महाल असा प्रत्यय लागून यवतमाळ हे नाव पडले असावे.
 • महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी अग्रेसर असल्यामुळे ‘पांढरे सोने पिकविणारा किंवा कापसाचा जिल्हा’ म्हणून ओळखला जातो.
 • वर्धा व पैनगंगा या दोन नधा जिल्ह्याच्या प्रमुख नधा होत.
यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख स्थळे – 
 • यवतमाळ – प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी शारदाश्रम ही संस्था येथे आहे. येथील केदारेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.
 • वणी – येथील रंगनाथस्वामींचे मंदिर प्रसिद्ध आहे.
 • पाटणबोरी – हे ठिकाण पांढरकवडा तालुक्यात असून दगडापासून फरशी बनविण्याचा उधोग येथे आहे.
 • घाटंजी – मोरोली महाराजांच्या यात्रेकरिता प्रसिद्ध.
 • कळंब – कलंबचा श्री चिंतामणी विदर्भातील भाविकांचे महत्वाचे श्रद्धास्थान आहे. भारतातील 21 महत्वाच्या आणि पौराणिक आधार असलेल्या गणेश स्थानांमध्ये श्री चिंतामणीचा समावेश होतो.
यवतमाळ जिल्ह्याचीवैशिष्ट्ये – 
 • पोहरा देवीचे जगदंबा मंदिर बंजारा समाजाची काशी म्हणून उल्लेख होतो.
 • जैनांची काशी म्हणून ओळखले जाणारे शिरपूर जैन हे पुरातन गांव जैन धर्मीयांच्या तीर्थक्षेत्राबरोबरच प्रेक्षणीय पर्यटन स्थळ आहे.
 • किनवट अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यात आहे.
 • टेपेश्वर राखीव मृगया क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यात आहे.
 • यवतमाळ जिल्हयातून पैनगंगा नदी वाहते.
 • यवतमाळ जिल्ह्यातून गेलेला राष्ट्रीय हमरस्ता – हैद्राबाद- जबलपुर (क्र.7)
 • विदर्भामध्ये नागपुर व अमरावती ही दोन प्रशासकीय विभाग येते.
 • नागपुर प्रशासकीय विभागात 6 जिल्हे व अमरावती प्रशासकीय विभागात 5 जिल्हे अशी एकूण 11 जिल्हे विदर्भात आहे.
 • विदर्भात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा – गडचिरोली. (क्षेत्रफळ – 14,412 चौ.कि.मी.)
 • विदर्भात क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा – भंडारा. (क्षेत्रफळ – 3,895 चौ.कि.मी.)
 • विदर्भातील लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा – नागपूर.
 • सहकारी तत्वावर विदर्भातील पहिला साखर कारखाना – जिजामाता सहकारी साखर कारखाना मर्यादित हा होय.
You might also like
1 Comment
 1. MOHAN DILIP BANCHARE says

  sir govind prabhu yanchi samadhi riddhapur la nahi ahr

Leave A Reply

Your email address will not be published.