9 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

ऑक्सफर्डच्या AZD1222 लसीची तिसरी आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली:
ऑक्सफर्डच्या AZD1222 लसीची तिसरी आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली

9 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (9 सप्टेंबर 2020)

ऑक्सफर्डच्या AZD1222 लसीची तिसरी आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली:

  • करोनाविरोधातील लढ्यात मोठा धक्का बसला आहे. करोना संकट रोखण्यासाठी सर्वात जास्त अपेक्षा असणाऱ्या ऑक्सफर्डच्या AZD1222 लसीची तिसरी आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे.
  • ब्रिटनमधील एका व्यक्तीला ऑक्सफर्डची करोना लस देण्यात आली होती. मात्र ही व्यक्ती आजारी पडल्यानंतर करोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे.
  • ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि AstraZeneca Plc ची ही लस स्पर्धेत सर्वात पुढे होती.
  • ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांनी करोना लस फक्त यशस्वी होणार नाही तर सप्टेंबरमध्ये लस उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केली होता. ऑक्सफर्डच्या या लसीचं उत्पादन AstraZeneca करणार आहे.

शैक्षणिक संस्था 21 सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू करा- आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली:

  • करोनामुळे गेल्या जवळपास पाच महिन्यांपासून बंद असलेल्या शैक्षणिक संस्था 21 सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे.
  • आरोग्य मंत्रालयाने इयत्ता नववी ते 12 वीचे वर्ग आणि शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी ते एच्छिक आहे.
  • त्याचप्रमाणे कौशल्य प्रशिक्षणही 21 सप्टेंबरपासून सुरू करण्यास आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे.
  • दोन वर्गामध्ये अंतर ठेवणे, उपकरणांची देवाणघेवाण न करणे, स्वतंत्र वेळा, शारीरिक अंतराचा नियम पाळणे आणि वर्गखोल्यांचे र्निजतुकीकरण करणे आदी मार्गदर्शक तत्त्वे आरोग्य मंत्रालयाने आखून दिली आहेत.
  • इयत्ता नववी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांनाच के वळ वर्गात आभासी अथवा शारीरिकदृष्टय़ा हजर राहण्याचा पर्याय उपलब्ध असेल. तर लहान मुलांसाठी ऑनलाइन वर्ग सुरूच राहणार आहेत.
  • शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांचे मान्यतापत्र घेणे बंधनकारक आहे. ज्या शाळा संक्रमणक्षेत्राच्या बाहेर आहेत त्या सुरू करण्याची परवानगी असेल.

भारत आणि फ्रान्स मध्ये 59 हजार कोटी रुपयांचा 36 राफेल विमानांबाबतचा करार करण्यात आला:

  • संरक्षणमंत्री राजनाथसिंह, फ्रान्सचे संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ले आणि भारतीय लष्करातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी अंबाला हवाई तळावर आयोजित करण्यात येणाऱ्या एका समारंभात पाच राफेल विमाने औपचारिकपणे भारतीय हवाई दलात (आयएएफ) दाखल करून घेण्यात येणार आहेत.
  • भारत आणि फ्रान्स यांच्यातील संरक्षणविषयक आणि सुरक्षाविषयक सहकार्य अधिकाधिक वृद्धिंगत करण्याबाबत राजनाथसिंह आणि पार्ले अंबालामध्ये चर्चा करणार आहेत. पार्ले यांचे गुरुवारी आगमन होणार असून समारंभ आटोपल्यानंतर त्वरितच ते मायदेशी रवाना होणार आहेत.
  • भारतात 29 जुलै रोजी पहिली पाच राफेल विमाने दाखल झाली, भारत आणि फ्रान्स यांच्यात 59 हजार कोटी रुपयांचा 36 राफेल विमानांबाबतचा करार करण्यात आला आहे.

बंगळूरुतील उड्डाणपुलास स्वा. सावरकर यांचे नाव- कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा:

  • काँग्रेस आणि जनता दलाने (धर्मनिरपेक्ष) विरोध केला असतानाही कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात आलेल्या एका उड्डाणपुलाचे मंगळवारी उद्घाटन केले.
  • बंगळूरु महापालिके ने 34 कोटी रुपये खर्च करून 400 मीटर लांबीचा हा उड्डाणपूल बांधला आहे, हा पूल येलहांका येथील मे. संदीप उन्नीकृष्ण मार्गावर आहे.
  • भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपले आयुष्य वेचले, त्यामुळे उड्डाणपुलास या महान देशभक्ताचे नाव देणे योग्य आहे, असे येडियुरप्पा या वेळी म्हणाले.

23 ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेनानची प्रभावी कामगिरी:

  • सेरेना विल्यम्सने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची सलग 12व्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
  • 23 ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेनाने प्रभावी कामगिरी करत ग्रीसच्या मारिया सकारीला नमवले.
  • सेरेनाने ही लढत 6-3, 6-7, 6-3 अशी जिंकली.
  • ‘‘प्रेक्षकांशिवाय खेळत असले तरी एक व्यावसायिक खेळाडू म्हणून सर्वोत्तम कामगिरी मला करता आली पाहिजे. तेच मी केले. वर्षांचे 365 दिवस सर्वोत्तम खेळ करण्याचाच माझा प्रयत्न असतो,’’ असे विश्वविक्रमी 24 ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी असलेल्या सेरेनाने म्हटले.

दिनविशेष :

  • 9 सप्टेंबरहुतात्मा शिरीषकुमार स्मृतिदिन.
  • 9 सप्टेंबर 1850 मध्ये कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे 31वे राज्य बनले.
  • ताजिकिस्ता देश सोविएत 9 सप्टेंबर 1991 मध्ये युनियनपासून स्वतंत्र झाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.