9 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

9 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (9 जून 2020)

अमित शाह करणार कॅम्पेनची सुरूवात:

 • देशात वाढत असलेल्या करोनाच्या प्रादुर्भावानं कॅम्पेनचं चित्रचं बदलून टाकलं आहे. बिहार नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज व्हर्च्युअल रॅलीद्वारे भाजपाच्या कॅम्पेनची सुरूवात करणार आहेत. शाह यांची ही व्हर्च्युअल रॅली महत्त्वाची मानली जात आहे.
 • पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी (2021) विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. परंतु भाजपा यासाठी आतापासूनच तयारी करत असल्याचं दिसत आहे,
 • अमित शाह निरनिराळ्या मीडिया प्लॅ़टफॉर्मवर 11 वाजता भाजपा कार्यकर्त्यांना आणि सामान्य जनतेला संबोधित करणार आहेत. ही रॅली राज्यातील राजकीय स्थिती बदलून टाकणार असल्याचं मत पश्चिम बंगालचे भाजपा प्रमुख दिलिप घोष यांनी व्यक्त केलं.
 • आगामी विधासभा निवडणुकीच्या दृष्टीनं ही आमच्यासाठी महत्त्वाची रॅली आहे आणि अधिकाधिक लोकांना यात सामिल करून आम्ही जागतिक विक्रम करण्याची तयारी करत असल्याचे ते म्हणाले.
 • बिहारमध्येदेखील भाजपानं अमित शाह यांची व्हर्च्युअल रॅली यशस्वी केली होती. रॅलीसाठी 72 हजार बूथवर 72 हजार एलईडी स्क्रिनही लावण्यात आले होते. पश्चिम बंगालमध्येही अशाच प्रकारची तयारी करण्यात येत आहे. “ही रॅली आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
 • कारण 3 ते 4 महिन्यांनंतर कोणती राजकीय बैठक यानिमित्तानं होत आहे. आम्ही याद्वारे अधिक लोकांना जोडण्याचा प्रयत्न करत असून जागतिक विक्रम करण्याचाही प्रयत्न करणार आहोत,” असं घोष म्हणाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 जून 2020)

देशात सलग सहाव्या दिवशी 9 हजारांहून अधिक रुग्ण:

 • देशात सलग सहाव्या दिवशी नऊ हजारांहून अधिक करोना रुग्णांची भर पडली. गेल्या 24 तासांत देशात 9,983 रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या 2 लाख 56 हजार 611 वर पोहोचली आहे.
 • देशभरात आतापर्यंत 1 लाख 24 हजार 95 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 48.49 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 206 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या 7,135 वर पोहोचली आहे.
 • केंद्र सरकारच्या प्रसिद्धी विभागातील (पीआयबी) अधिकारी करोनाबाधित झाल्याने निर्जंतुकीकरणासाठी दिल्लीतील राष्ट्रीय माध्यम केंद्र बंद करण्यात आले आहे. श्रम शक्ती भवन मात्र मंगळवारपासून पुन्हा खुले केले जाणार आहे.
 • कामगार कल्याण मंत्रालयातील दोन अधिकारी बाधित झाल्यानंतर श्रम शक्ती भवन बंद करण्यात आले होते. केंद्रीय निवडणूक आयोगातील अधिकारीही करोनाबाधित झाला आहे.
 • केंद्रीय आरोग्य सचिव प्रीति सुदन यांनी दहा राज्यांमधील 38 जिल्हाधिकारी व 45 महापालिका आयुक्तांशी चर्चा करून करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यात महाराष्ट्र, तेलंगण, तमिळनाडू, राजस्थान, हरयाणा, गुजरात, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश होता. अधिकाधिक नमुना चाचण्या घेणे, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, विलगीकरण केंद्रे व अन्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

दिनविशेष :

 • अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना 9 जून 1866 मध्ये झाली.
 • एडविन आर्मस्ट्राँग यांनी 9 जून 1935 मध्ये पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.
 • भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादुर शास्त्री यांनी 9 जुन 1964 मध्ये सूत्रे हाती घेतली होती.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.