9 एप्रिल 2022 चालू घडामोडी – Current Affairs
9 April 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (9 एप्रिल 2022)
18 वर्षांवरील सर्वाना वर्धक मात्रा :
- रविवारपासून 18 वर्षांवरील सर्वाना करोनाची वर्धक मात्रा (बूस्टर डोस) सशुल्क देण्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी केली.
- करोनाची दुसरी मात्रा घेतल्यानंतर 9 महिने पूर्ण झालेले 18 वर्षांवरील सर्व नागरिक सशुल्क वर्धक मात्रेसाठी पात्र आहेत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
- 18 वर्षांवरील सर्वाना खासगी लसीकरण केंद्रांवर वर्धक मात्रा सशुल्क उपलब्ध करण्यात येईल, असेही आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
- ‘सीरम’निर्मित कोव्हिशिल्डच्या एका वर्धक मात्रेसाठी 600 रुपये मोजावे लागणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी प्रथमच कृष्णवर्णीय महिला :
- अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयात एका कृष्णवर्णीय महिलेची न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आहे.
- तर केतनजी ब्राऊन जॅक्सन असे या महिलेचे नाव आहे.
- जॅक्सन या सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झालेल्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत.
- तसेच जॅक्सन न्यायमूर्ती स्टीफन ब्रेयर यांची जागा घेतील.
- जॅक्सन यांच्या नियुक्तीमुळे आता सर्वोच्च न्यायालयात प्रथमच चार महिला न्यायमूर्ती असतील. त्यापैकी दोन कृष्णवर्णीय न्यायमूर्ती आहेत.
सर्वोच्च न्यायालयाची दुरुस्ती कायद्याला मंजुरी :
- ‘परकीय योगदान (नियमन) कायदा- 2010’मध्ये केंद्राने केलेल्या दुरुस्तींना सर्वोच्च न्यायालयाने अखेर शुक्रवारी मंजुरी दिली.
- तर या दुरुस्ती कायद्याद्वारे प्रामुख्याने सार्वजनिक सुव्यवस्था व सामान्य जनतेचे हित जपले जाऊ शकेल.
- तसेच, परकीय स्रोतांतून येणाऱ्या विदेशी योगदानाचा गैरवापर रोखण्याचा हेतू आहे.
- सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी ही दुरुस्ती गरजेची असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली आहे.
- तीन रिट याचिकांवर एकत्रित सुनावणी घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धात दक्षिण कोरियावर शानदार विजय :
- भारतीय महिला हॉकी संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना शुक्रवारी दक्षिण कोरियाला 3-0 असे नामोहरम केले आणि ‘एफआयएच’ कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेची दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली.
- भारताने साखळीत सर्व सामने जिंकत अग्रस्थानासह उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
- कोरियाविरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यात भारताकडून मुमताज खान, लालिरडिकी आणि संगीता कुमारी यांनी गोल केले.
- तसेच नेदरलँड्सशी भारताची रविवारी उपांत्य फेरी होईल.
कोरिया खुली बॅडिमटन स्पर्धात श्रीकांत, सिंधू विजयी :
- भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांनी शुक्रवारी दिमाखदार विजयांसह कोरिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
- महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूने बुसानन ओंगबामरुंगफानवर 21-10, 21-16 असा विजय मिळवला.
- तर तिसऱ्या मानांकित सिंधूने बुसाननविरुद्ध 17-0 असे वर्चस्व राखले.
- पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीतील माजी अग्रस्थानावरील खेळाडूंमधील झुंज रंगतदार ठरली.
- पण श्रीकांतने कोरियाच्या सन वॅन हू याच्यावर 21-12, 18-21, 21-12 अशी मात केली.
दिनविशेष:
- समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म 9 एप्रिल 1828 रोजी झाला.
- पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर यांचा जन्म 9 एप्रिल 1887 मध्ये झाला.
- सन 1967 मध्ये बोइंग-767 या विमानाने पहिले उड्डाण केले होते.
- सन 1994 सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी.एम. भार्गव यांना आर.डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- लता मंगेशकर यांना सन 1995 मध्ये अवधरत्न अनई साहू सूरसन्मान प्रदान करण्यात आले.