8 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

चंद्रयान -2
चंद्रयान -2

8 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (8 सप्टेंबर 2021)

आता झाडांनाही मिळणार पेन्शन:

  • छोटे शेतकरी आणि भूमिहीन मजुरांचा रोजगार वाढवण्यासाठी सध्या वेगवेगळ्या योजनांवर काम केले जात आहे.
  • आता अशीच योजना हरियाणा सरकारनेही आणली आहे, जी येत्या काळात भूमिहीन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते.
  • हरियाणा सरकारने ‘प्राणवायू देवता’ नावाची एक अनोखी पेन्शन योजना सुरू केली आहे.
  • तर याअंतर्गत, सरकारने 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या झाडांना पेन्शन देण्याची योजना आखली आहे.
  • तसेच या झाडांच्या काळजीवाहकांना दरवर्षी 2,500 रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • या योजनेचा फायदा शेतकरी आणि भूमिहीन मजुरांना तर होईलच पण सोबतच झाडे तोडणेही थांबेल.

चंद्रयान -2 मोहिमेला दोन वर्ष पुर्ण :

  • चंद्रावर मॅगनिज आणि क्रोमियम या मुलद्रव्यांचे अस्तित्व चांद्रयान -2 यानाने शोधले आहे. या मुलद्रव्यांचे प्रमाण नगण्य स्वरुपात आहे.
  • चांद्रयान -2 मोहिमेला दोन वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने ‘ल्युनर सायन्स वर्कशॉप’ चे आयोजन केले होते. यावेळी या शोधाबद्द्ल माहिती देण्यात आली.
  • चांद्रयान -2 हे चंद्राभोवती 100 किलोमीटर उंचीवर फिरत असून त्यावरील वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून आणखी पुढील काही वर्षे नवीन माहिती मिळत राहील असा विश्वास इस्त्रोचे अध्यक्ष डॉ के सीवन यांनी यावेळी व्यक्त केला.
  • तर चांद्रयान -2 ने चंद्राभोवती 9000 प्रदक्षिणा पूर्ण केल्या असल्याचंही यावेळी जाहिर करण्यात आलं.
  • चांद्रयान -2 यान हे 22 जुलै 2019 ला प्रक्षेपित करण्यात आलं होतं.

‘फिडे’ ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धाचा भारत यंदाही जेतेपदासाठी प्रमुख दावेदार:

  • गतविजेता भारत यंदाही ‘फिडे’ ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धा जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार आहे.
  • भारताने गतवर्षी रशियासह संयुक्तरीत्या ‘फिडे’ ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
  • तर यंदाच्या ऑलिम्पियाड स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात होणार आहे.
  • ऑनलाइन स्वरूपात होणारी ही स्पर्धा जिंकण्यासाठी भारत आणि रशिया यांच्यातच चुरस असेल, असे ठिपसे यांनी नमूद केले.

दिनविशेष :

  • 8 सप्टेंबरआंतरराष्ट्रीय साक्षरता दिन.
  • 8 सप्टेंबरजागतिक शारीरिक उपचार दिन.
  • 8 सप्टेंबर 1954 मध्ये साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना झाली.
  • स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने 8 सप्टेंबर 1962 मध्ये नवीन संविधान अंगीकारले.
  • मॅसेडोनिया युगोस्लाव्हिया पासून 8 सप्टेंबर 1991 मध्ये स्वतंत्र झाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.