8 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

8 October 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (8 ऑक्टोबर 2021)

टांझानियातील कादंबरीकार अब्दुलरझाक गुर्ना यांना साहित्याचे नोबेल :

 • वसाहतवादाच्या चरक्यात पिचल्या गेलेल्या पिढीच्या वेदनांना आणि निर्वासितांच्या दु:खांना कथारूप देणारे टांझानिया या पूर्व आफ्रिकी राष्ट्राचे लेखक अब्दुलरझाक गुर्ना यांना यंदाचे साहित्याचे नोबेल जाहीर करण्यात आले.
 • तर जगासाठी अज्ञात असलेल्या प्रदेशातील आयुष्य त्यांनी आपल्या कादंबऱ्यांमधून चितारले.
 • तसेच लेखकाच्या एकूण साहित्यिक योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो.
 • 10 अब्ज स्वीडिश क्रोनोर असे प्रतिष्ठित अशा नोबेल पारितोषिकाचे स्वरूप आहे.
 • नायजेरियातील लेखक वोल सोयिंका यांना 1986 साली नोबेलने गौरविण्यात आले होते. त्यानंतर नोबेल मिळविणारे ते दुसरे कृष्णवर्णी आफ्रिकी आहेत.
 • तर ‘पॅरेडाईझ’ या कादंबरीमुळे ते जागतिक साहित्य वर्तुळात ओळखले गेले.
 • तसेच ही कादंबरी 1994 साली ‘बुकर’ पारितोषिकाच्या लघुयादीत दाखल झाली होती. वसाहतोत्तर कालातील महत्त्वाच्या लेखकांपैकी सर्वोत्तम म्हणून स्वीडिश अकादमीने गुर्ना यांचा गौरव केला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 ऑक्टोबर 2021)

‘आरआयएमसी’च्या प्रवेश परीक्षेला बसण्याची महिला उमेदवारांना परवानगी :

 • राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) मुलींचा समावेश केल्यानंतर काही दिवसांतच, डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये (आरआयएमसी) प्रवेशासाठी 18 डिसेंबरला होणाऱ्या परीक्षेला महिला उमेदवारांना बसण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली. तर परीक्षेचे वेळापत्रक न बदलता या संदर्भात
 • सुधारित जाहिरात प्रकाशित करावी, असे निर्देश न्या. एस. के. कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्र सरकारला दिले.
 • तसेच राष्ट्रीय सैनिकी शाळांच्या बाबतीत ही प्रक्रिया 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
 • जून 2022 मध्ये होणाऱ्या प्रवेश परीक्षेला बसणाऱ्या मुलींना जानेवारी 2023 मध्ये या संस्थेत प्रवेश मिळू शकेल आणि जानेवारी 2028 पर्यंत ठरावीक काळानंतर प्रवेश क्षमतेत वाढ होईल, असे खंडपीठ म्हणाले.

मलेरियावर जगातील पहिली लस :

 • मलेरिया आजारावरील जगातील पहिल्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यता दिलीय.
 • RTS S/AS01असं या मलेरिया लसीचं नाव आहे. यामुळे मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंवर नियंत्रण राखण्यात यश येणार आहे.
 • तर विशेष म्हणजे मलेरियाचे सर्वाधिक बळी आफ्रिकन देशांमध्ये जातात.
 • औषध कंपनी जीएसकेने (GSK) 1987 मध्ये तयार केलेल्या या लसीचे घाना, केनिया आणि मलावी या देशांमध्ये 2019 पासून 20 लाख डोस देण्यात आले.
 • सध्या जगात विषाणू आणि जीवाणूविरोधात अनेक लसी उपलब्ध आहेत. मात्र, परपोषी डासांवरील ही पहिलीच लस आहे जिला जागतिक आरोग्य संघटनेने व्यापक वापरासाठी मान्यता दिलीय.
 • तसेच ही लस मलेरियाच्या 5 प्रजातींपैकी प्लास्मोडीयम फाल्सीपॅरम या एका परपोषी प्रजातीवर प्रभावी आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट खेळाडूंसाठी ‘आयसीसी’कडून मानसोपचारतज्ज्ञ :

 • संयुक्त अरब अमिरातीमधील जैव-सुरक्षा परिघात होणाऱ्या ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान खेळाडूंच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी मानसोपचारतज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे.
 • ‘आयसीसी’च्या एकात्मता विभागाचे प्रमुख असलेल्या मार्शल यांच्याकडेच जैव-सुरक्षा परिघातील सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
 • ट्वेन्टी-20 विश्वचषकाचा पहिला टप्पा आणि अव्वल-12 संघांच्या टप्प्यासाठी ‘आयसीसी’ने नेमलेल्या सामनाधिकाऱ्यांमध्ये भारताच्या फक्त नितीन मेनन यांचा समावेश आहे.

कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धात भारतीय महिलांना यश :

 • मनू भाकर, रिदम सांगवान आणि नाम्या कपूर यांचा समावेश असलेल्या महिला संघाने बुधवारी 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करताना ‘आयएसएसएफ’ कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेमधील भारताचे वर्चस्व कायम राखले.
 • भारतीय संघाने अंतिम फेरीत अमेरिकेवर 16-4 असा विजय मिळवला.
 • तसेच या स्पर्धेमधील मनूचे हे चौथे सुवर्णपदक ठरले. याशिवाय एक कांस्यपदकही तिने कमावले आहे.
 • तर 14 वर्षीय नाम्याचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले. याआधी तिने 25 मीटर वैयक्तिक पिस्तूल प्रकारात जेतेपद पटकावले आहे.

टी 20 वर्ल्डकपपासून समालोचकांना ‘बॅट्समन’ ऐवजी ‘बॅटर’ बोलावं लागणार :

 • आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळानं येत्या काही दिवसात सुरु होणाऱ्या टी 20 विश्वचषकापासून ‘बॅट्समन’ ऐवजी ‘बॅटर’ नावाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • तर मागच्या महिन्यात मेरिलबोन क्रिकेट क्लबने क्रिकेट नियमात बदल करत ‘बॅट्समन’ ऐवजी ‘बॅटर’ शब्दाचा वापर करण्याचा निर्णय घेतला होता.
 • तसेच आता आयसीसीच्या बॅटर या शब्दाचा वापर करण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • स्त्री-पुरुष समानतेसाठी ‘बॅट्समन’ऐवजी ‘बॅटर’ हा शब्द त्वरित अमलात आणावा, अशी घोषणा मेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) केली होती.

आयसीसीनं जाहीर केली पंच आणि सामना अधिकाऱ्यांची यादी :

 • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आगामी पुरुषांच्या टी-20 विश्वचषकाच्या फेरी एक आणि सुपर 12 टप्प्यासाठी 20 सामना अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा केली असून, यात पंचांमध्ये नितीन मेनन एकमेव भारतीय आहेत.
 • अनुभवी दक्षिण आफ्रिकेचे पंच मराईस इरास्मस आणि इंग्लंडचे ख्रिस गफाने हे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 24 ऑक्टोबरच्या सामन्यासाठी मैदानावरील दोन
 • पंच असतील तर रिचर्ड इलिंगवर्थ टीव्ही अधिकारी असतील. डेव्हिड बून मॅच रेफरी असतील.
 • तर टी-20 विश्वचषकासाठी 16 पंच आणि चार मॅच रेफरी निवडले गेले आहेत.
 • तसेच 45 सामन्यांच्या या स्पर्धेत अलीम दार, इरास्मस आणि रॉड टकर असे तीन पंच असतील, जे त्यांच्या सहाव्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषकात अधिकारी असतील.

दिनविशेष:

 • संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी.एन. रामचंद्रन यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1922 मध्ये झाला.
 • इंडियन एअर फोर्स अ‍ॅक्ट व्दारे 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय वायूदलाची स्थापना झाली. तेव्हा पासून हा दिवस ‘भारतीय वायुसेना दिन’ म्हणून पाळला जातो.
 • सन 1959 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी-लिट पदवी घरी येऊन दिली.
 • 11 सप्टेंबरच्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सन 2001 मध्ये सुरक्षा मंत्रालयाची (Department of Homeland Security) स्थापना केली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 ऑक्टोबर 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.