8 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

जावेद अख्तर यांना रिचर्ड डॉकिन्स पुरस्काराने सन्मानित
जावेद अख्तर यांना रिचर्ड डॉकिन्स पुरस्काराने सन्मानित

8 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (8 जून 2020)

रिचर्ड डॉकिन्स अवॉर्ड मिळणारे जावेद अख्तर ठरले पहिले भारतीय :

  • सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना रिचर्ड डॉकिन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • मानवी विकासाला प्रोत्साहन देणे, मानवी मूल्य अबाधित राहावे यासाठी प्रयत्न करणे आणि विचारक्षमता यासाठी अख्तर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
  • तर हा सन्मान प्राप्त करणारे जावेद अख्तर पहिले भारतीय ठरले आहेत. यापूर्वी हा पुरस्कार अमेरिकेतील विनोदवीर बिल मगर आणि दार्शविक क्रिस्टोफर हिचेंस यांना देण्यात आला होता.
  • तसेच जावेद अख्तर यांना पद्मश्री, पद्मभूषण, साहित्य अकादमी तसेच पाच राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आता त्यांना 2020मधील रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार देण्यात आला आहे.
  • रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार बायोलॉजिस्ट रिचर्ड डॉकिन्स यांच्या नावाने सुरु करण्यात आला होता. हा पुरस्कार अशा लोकांना दिला जातो जे लोक धर्मनिरपेक्षता, तर्कवाद यावर बिनधास्तपणे आपले मत मांडतात.
  • तर हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. 2019 पर्यंत हा पुरस्कार एथीस्ट अलाइंस ऑफ अमेरिका देत होती. पण जुलै 2019मध्ये हा पुरस्कार सेंटर फॉर इन्क्वायरीकडे देण्यात आला.

2020च्या महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेचे भारताला यजमानपद :

  • भारतात 1979 नंतर पहिल्यांदाच महिला आशियाई चषक फु टबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
  • तर 2022 साली या स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क आशियाई फुटबॉल महासंघाने (एएफसी) भारताला दिले आहेत.
    ‘एएफसी’ महिला फु टबॉल समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात याच महिला समितीने भारताच्या नावाची शिफारस केली होती.
  • तसेच 2022च्या दुसऱ्या सहामाहीत ही स्पर्धा होण्याची शक्यता आहे. भारताने 1979च्या स्पर्धेत उपविजेतेपद प्राप्त केले होते.
  • तर या स्पर्धेत 12 संघांचा समावेश असेल तसेच भारताला यजमान म्हणून पात्रतेची थेट संधी मिळेल. या स्पर्धेद्वारे 2023 फिफा महिला विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरण्याची संधी सहभागी संघांना मिळू शकेल.

शाळा, महाविद्यालये सुरू होणार 15 ऑगस्टनंतरच :

  • देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालये 15 ऑगस्टनंतरच सुरू होतील, अशी घोषणा केंद्रीय मनुष्यबळमंत्री रमेश पोखरीयल, निशंक यांनी येथे केली.
  • तर एका वृत्तवाहिनीला त्यांनी दिलेल्या मुलाखतीमुळे शाळा व महाविद्यालये कधी सुरू होणार, याविषयीची संदिग्धता संपली आहे.
  • कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन घोषित केल्यामुळे देशभरातील सर्व शिक्षणसंस्था मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बंद आहेत. त्यामुळे काही परीक्षा झालेल्या नाहीत आणि काही वर्गातील मुलांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी घेतला.
  • तसेच ज्या परीक्षा झाल्या आहेत, त्यांचे अद्याप निकालही लागलेले नाहीत. सर्व परीक्षांचे निकाल ऑगस्टपर्यंत लागतील, अशी ग्वाही पोखरीयाल यांनी दिली.

सीमावाद शांततेच्या मार्गाने मिटवण्याचा भारत-चीनचा निर्धार :

  • पूर्व लडाख व सिक्कीममधील सीमेवर निर्माण झालेला वाद शांततामय मार्गाने मिटवण्यासाठी यापुढेही लष्करी व राजनैतिक चर्चा सुरू ठेवण्याचा निर्धार भारत व चीन यांनी केला आहे.
  • तर या चर्चामध्ये द्विपक्षीय करार व दोन्ही देशांच्या नेत्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा आधार घेतला जाणार आहे, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
  • भारत व चीन यांच्यात शनिवारी पूर्व लडाखमधील प्रश्नाबाबत लष्करी पातळीवर चर्चा करण्यात आली. दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर्सची प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीनच्या हद्दीत असलेल्या माल्डो येथे प्रदीर्घ चर्चा झाली.
  • तर परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे,की सौहार्द व सकारात्मक वातावरणात ही चर्चा झाली. दोन्ही बाजूंनी हा प्रश्न लवकरात लवकर सोडवून दोन्ही देशातील संबंधात प्रगती साधण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
  • तसेच हा प्रश्न सोडवताना दोन्ही देशांच्या नेत्यांचे मार्गदर्शन व द्विपक्षीय करार यांचा आधार घेतला जाणार आहे. दोन्ही देशातील संबंधात प्रगती होण्यासाठी सीमेवर शांतता व स्थिरता नांदण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.
  • भारत व चीन यांच्यातील सीमा 3488 कि.मी लांबीची असून अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनने केला आहे, जो भारताने फेटाळला आहे.

दिनविशेष :

  • 8 जून हा दिवस जागतिक मेंदूचा ट्यूमर दिन तसेच जागतिक महासागर दिन आहे.
  • लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या ‘गीतारहस्य‘ या ग्रंथाचे 8 जून 1915 मध्ये गायकवाड वाड्यात प्रकाशन झाले.
  • 8 जून 1918 रोजी नोव्हा अ‍ॅक्‍विला या सर्वाधिक तेजस्वी तेजोमेघाचा शोध लागला.
  • एअर इंडिया ची 8 जून 1948 मध्ये मुंबई-लंडन विमानसेवा सुरू झाली.
  • पहिल्यांदा जागतिक महासागर दिन 8 जून 1992 रोजी साजरा केला गेला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 जून 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.