8 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
8 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (8 ऑगस्ट 2020)
पायलट कॅप्टन दीपक वसंत साठे यांचे निधन:
- केरळमधील एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमान अपघातात मृत्यू पावलेले विमानाचे पायलट कॅप्टन दीपक वसंत साठे यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली आहे.
- त्यांना ‘स्वर्ड ऑफ ऑनर’ने गौरविण्यात आलं आहे. त्यांनी बराच काळ गोल्डन अॅरो-17 स्क्वॉड्रनमध्ये सेवा बजावली आहे.
- हे तेच स्क्वॉड्रन आहे ज्याच्याकडे नुकत्याच हवाई दलात सामिल झालेल्या पाच राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी फ्रान्सहून भारतात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
- कॅप्टन साठे यांना बोईंग 737-800 हे विमान चालवण्याचा अनुभव होता. नुकतेच त्यांनी एअरबस ए-310 हे विमानही उडवले होते.
Must Read (नक्की वाचा):
शैक्षणिक धोरणाद्वारे संशोधन, चर्चा आणि, विश्लेषणातून विद्यार्थ्यांचे शिक्षण!:
- आतापर्यंत आपल्याला काय विचार करायचा हे शिकवले गेले, पण विचार कसा करायचा हे आता शिकवले जाईल. नव्या शैक्षणिक धोरणाद्वारे संशोधन, चर्चा आणि विश्लेषणाच्या आधारावर विद्यार्थी शिकू लागतील.
- अभियंता, डॉक्टर, वकील बनवण्याच्या ‘कळप मानसिकते’तून ते बाहेर पडू शकतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
- नव्या शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीची फक्त अधिसूचना काढली म्हणजे धोरण लागू होत नाही. त्यासाठी संबंधित सर्व घटकांना प्रयत्न करावे लागतील. शिक्षकांना प्रशिक्षण मिळेल.
- शिक्षकांची आकलनवाढ झाली की देश पुढे जातो, असे मला वाटते. त्यामुळे नव्या शिक्षण पद्धतीतून देशाचे वर्तमान आणि भविष्य बदलण्याच्या प्रक्रियेला ‘महायज्ञ’ मानले पाहिजे, असेही मोदी म्हणाले.
सिरम इन्स्टिट्युटने जाहीर केली करोनावरची लस ची किंमत:
- करोना संकटातून मार्ग काढण्याचा उपाय म्हणजे त्यावरची लस. ही लस लवकरात लवकर तयार व्हावी यासाठी अनेक देशांमध्ये प्रयत्न सुरु आहेत.
- पुण्यातली सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या मदतीने लस आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
- ही लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि सामान्य लोकांना परवडणारी असावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे. फक्त भारतातच नाही तर जगातल्या देशांमध्ये असलेल्या गरीबांना ही लस उपलब्ध करण्याचा भारताचा मानस आहे.
- सिरम ही संस्था, GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन करोना लसीसाठी 150 मिलियन डॉलर्सचा निधी दिला जाणार आहे.
- GAVI मार्फत निधी सिरम इन्स्टिट्युटला करोना लसीच्या उत्पादनसाठी दिला जाईल.
- सिरम इन्स्टिट्युट 2021 पर्यंत 100 दशलक्ष डोस पुरवणार आहे. या लसीची जास्तीत जास्त किंमत 3 यूएस डॉलर्स म्हणजे साधारण 225 ते 250 रुपयांच्या घरात असेल अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटने दिली आहे.
45 दिवसांच्या आत चीनी अप्प्स वर बंदी घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी:
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकवर बंदी घातली जाणार असल्याचं म्हटलं होतं. यानंतर आता टिकटॉक आणि वी-चॅट या कंपन्यांसोबत करण्यात येणाऱ्या व्यवहारांवरदेखील निर्बंध घालण्यात आले आहेत.
- तर दुसरीकडे मायक्रोसॉफ्ट किंवा इतर कोणत्याही कंपनीच्या हा व्यवसाय खरेदी न करण्याच्या शक्यतेकडे पाहता त्यांनी देशात टिकटॉकवर बंदी घालण्यासाठी 15 सप्टेंबरची मुदत दिली आहे.
- डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी संध्याकाळी चिनी अॅप टिकटॉक आणि वी-चॅटवर 45 दिवसांच्या आत बंदी घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली.
- यापूर्वी सीनेटनं अमेरिकेतील कर्मचाऱ्यांच्या टिकटॉक वापरण्यावर बंदी घालणाऱ्या आदेशाला मान्यता दिली होती.
- “टिकटॉकसारख्या अविश्वासू अॅपद्वारे डेटा जमवला जाणं हे देशाच्या सुरक्षेविरोधात आहे,” असं ट्रम्प आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर म्हणाले.
आयपीएल ला सरकारची तत्त्वत मान्यता:
- इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 13वा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निर्णयाला केंद्र सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे.
- त्यामुळे क्रिकेटपटू आणि साहाय्यकांच्या कोविड चाचणी आणि विलगीकरण प्रक्रि येला संघांकडून प्रारंभ करण्यात आला आहे.
- अमिरातीत ‘आयपीएल’च्या आयोजनासाठी लिखित परवानगी येत्या काही दिवसांत प्राप्त होईल. मात्र आम्हाला तत्त्वत: मान्यता मिळालेली आहे, असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले.
- ‘बीसीसीआय’ने 20 ऑगस्टपर्यंत अमिरातीत जाऊ नये, असे निर्देश आले आहेत.
दिनविशेष :
- 8 ऑगस्ट हा ‘आंतरराष्ट्रीय मांजर दिन‘ आहे.
- सन 1942 मध्ये 8 ऑगस्ट रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात चले जाव चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला.
- भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ध्रुव ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी 8 ऑगस्ट 1958 मध्ये कार्यान्वित झाली.
- पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सन 1994 मध्ये 8 ऑगस्ट रोजी सुरू केले.
- सन 1998 मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.