7 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
7 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (7 जून 2019)
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात चीनची ‘5जी’ उडी :
- चीन सरकारची मालकी असलेल्या चार बडय़ा टेलिकॉम कंपन्यांना 5जी सेवा सुरू करण्यासाठी चीन सरकारने व्यापारी परवाने मंजूर केले.
- तर सध्या चीन आणि अमेरिका यांच्यात तंत्रज्ञान आणि व्यापाराच्या आघाडीवर तणावपूर्ण संबंध आहेत. या पाश्र्वभूमीवर जगात अतिवेगवान वायरविहिन जाळे तयार करण्यात आघाडी घेण्याची चीनची महत्त्वाकांक्षा दिसून येत आहे.
- तसेच चीनच्या उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (एमआयआयटी) चीन टेलिकॉम, चीन मोबाइल, चीन युनिकॉम आणि चीन रेडिओ आणि टेलिव्हिजन या कंपन्यांना ‘5जी’चे व्यापारी परवाने दिले आहेत.
- 5जी हे अत्यंत प्रगत दूरसंपर्क तंत्रज्ञान आहे. सध्याच्या 4जी एलटीई तंत्रज्ञानापेक्षा त्याचा डाऊनलोडचा वेग हा 10 ते 100 पट असल्याचे सांगितले जाते. डाऊनलोड-अपलोडच्या या वेगासोबतच अधिक व्यापक क्षेत्रात पोहोच आणि अधिक स्थिर जोडणी, ही या तंत्राची वैशिष्टय़े आहेत.
Must Read (नक्की वाचा):
आठही मंत्री समित्यांमध्ये अमित शहा :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या महत्त्वाच्या आठही समित्यांची फेररचना केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आठही समित्यांचे सदस्य असतील तर, मोदी सहा समित्यांचे प्रमुख असतील.
- तसेच केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना फक्त दोन समित्यांवरच स्थान देण्यात आले आहे. या फेररचनेनंतर मोदींच्या मंत्रिमंडळात अमित शहा हेच ‘सत्ताकेंद्र’ बनले आहे.
- तर गुंतवणूक आणि रोजगार वाढीसंदर्भातील दोन समित्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर अन्य सहा समित्यांच्या सदस्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. सरकारमधील महत्त्वाच्या नियुक्त्यांचा निर्णय मोदी आणि शहा हे दोघेच घेतील.
- नियुक्ती समितीत या दोघांव्यतिरिक्त कोणाही मंत्र्याचा समावेश करण्यात आलेला नाही. राजकीय ध्येय-धोरणे ठरवणाऱ्या समितीत मोदी आणि शहा यांच्यासह अर्थमंत्री निर्मला सीतारामन रामविलास पासवान, नरेद्र सिंह तोमर, रवीशंकर प्रसाद, हरसिमरत कौर बादल, हर्ष वर्धन, पियुष गोयल, अरविंद सावंत आणि प्रल्हाद जोशी यांचा समावेश केलेला आहे. मात्र, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना डावलण्यात आलेले आहे. यापूर्वीच्या समितीत संरक्षण मंत्री या नात्याने निर्मला सीतारामन यांना स्थान देण्यात आले होते. त्यामुळे पंतप्रधानांच्या अनुपस्थितीत आता या समितीत गृहमंत्री अमित शहा हेच निर्णय घेतील.
- संरक्षणविषयक समितीत नेहमीप्रमाणे अतिमहत्त्वाच्या चारही मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे राजनाथही या समितीचे सदस्य आहेत. अर्थविषयक समितीमध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्यासह राजनाथ सिंह, नितीन गडकरी, सदानंद गौडा, निर्मला सीतारामन, नरेंद्र सिंह तोमर, रवीशंकर प्रसादपयिुष गोयल, एस. जयशंकर, हरसिमरत कौर बादल आणि धर्मेद्र प्रधान सदस्य आहेत.
- संसदीय कामकाज, निवासप्रदान या दोन समित्यांपासून पंतप्रधानांनी स्वतला बाजूला ठेवले आहे. निवासप्रदान समितीत शहा, गडकरी, सीतारामन, गोयल यांच्याबरोबरीने जितेंद्र सिंह, हरदीप सिंग पुरी हे निमंत्रित असतील. संसदीय कामकाज समितीत अर्जुन राम मेघवाल आणि व्ही. मुरलीधरन निमंत्रित सदस्य असतील. रोजगार आणि कौशल्य विकास समितीत गडकरी, हरसिमरत कौर बादल, स्मृती इराणी, प्रल्हाद पटेल हे मंत्री निमंत्रित असतील.
मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींची शेतकऱ्यांसाठी नवी योजना :
- निवडणुक प्रचार काळात जनतेला दिलेल्या आश्वासनानुसार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डींनी शेतक-यांसाठी एक आनंदाची घोषणा केली आहे.
- त्यांनी शेतकर-यासाठी ऋतु भरोसा ही नवी योजना जाहीर केली आहे. ज्या अंतर्गत शेतक-यांना 12 हजार 500 रूपयांची मदत दिली जाणार आहे. ही योजना येत्या 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.
- तसेच यावेळी त्यांनी आधीच्या चंद्राबाबु नायडू सरकारची अन्नदाता सुखीभव ही योजना बंद केली आहे. या योजनेअंतर्गत शेतक-यांना दहा हजार रूपयांची मदत मिळत होती.
- तर याबैठकीत त्यांनी शेतक-यांना त्यांच्या पिकांसाठी किमान आधारभूत मुल्य मिळेल यासाठी आवश्यक उपाययोजना करणयाच्या अधिका-यांना सुचना केल्या. याशिवाय त्यांनी अर्थसंकल्पात मार्केट स्टॅबलाइझेन फंडासाठी 3 हजार कोटींच्या निधीची देखील घोषणा केली.
चीनचे समुद्रातून अंतराळात रॉकेट लाँच :
- चीनने पहिल्यांदा समुद्रात तरंगणाऱ्या लाँच पॅडवरून अंतराळात यशस्वीरित्या रॉकेट लाँच केले. चीनची वृत्तसंस्था शिन्हुआने याबाबत वृत्त दिले आहे.
- शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार शानडोंग प्रांतातील समुद्रातील तरंगणाऱ्या लाँच पॅडवरून चीनने हे रॉकेट लाँच केले.
- तर यामाध्यमातून चीनने तब्बल सात उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडले. तरंगत्या लाँचपॅडवरून अंतराळात रॉकेट सोडणारा चीन हा तिसरा देश ठरला आहे.
- तसेच यापूर्वी अमेरिका आणि रशियाने तरंगत्या लाँच पॅडवरून अंतराळात रॉकेट सोडले होते.
- चीनच्या वेळेनुसार 12 वाजून 6 मिनिटांनी लाँग मार्च-11 सॉलिड प्रोपेलंट कॅरिअर रॉकेट अंतराळात सोडण्यात आले. चीनच्या लाँग मार्च कॅरिअर रॉकेट सीरीजचे हे 306 वे अभियान आहे.
- तर अवकाशात सोडण्यात आलेल्या सात उपग्रहांपैकी 2 उपग्रह तंत्रज्ञानाच्या विकासासाठी वापण्यात येणारे उपग्रह आहेत. तर उर्वरित पाच लहान उपग्रहांचा वापर व्यावसायिक उपग्रह म्हणून करण्यात येणार आहे. या उपग्रहांपैकी 2 मोठे उपग्रह Bufeng-1A आणि Bufeng-1B ची निर्मिती चायना अॅकॅडमी ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी इन बिजिंगने केली आहे. याचा वापर हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठीही केला जाणार आहे.
आरटीजीएस, एनईएफटीमार्फत होणारे निधी हस्तांतर विनाशुल्क
- डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने आरटीजीएस आणि एनईएफटीमार्फत निधी हस्तांतरणांवरील शुल्क रद्द करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. याचा लाभ ग्राहकांना द्यावा, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
- रिअल टाईम ग्रॉससेटलमेंट सिस्टीम (आरटीजीएस) ही वास्तविक वेळेत निधी हस्तांतर करणारी ऑनलाईन प्रणाली आहे. तसेच नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंडस् ट्रान्सफर (एनईएफटी) या इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतर प्रक्रियेचा वापर दोन लाख रुपयांपर्यंतचा निधी हस्तांतरित करण्यासाठी केला जातो.
- सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया एनईएफटीमार्फत निधी हस्तांतरित करण्यासाठी एक ते पाच रुपयांपर्यंत, तर आरटीजीएस प्रणालीमार्फत निधी हस्तांतरित करण्यासाठी पाच ते पन्नास रुपयांपर्यत शुल्क आकारते.
- पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या विकासात्मक आणि नियामक धोरणांवरील निवेदनात म्हटले आहे की, आरटीजीएस आणि एनईएफटीमार्फत निधी हस्तांतरणासाठी बँकांवर किमान शुल्क लावते. याच्या
मोबदल्यात बँकांही ग्राहकांवर यासाठी शुल्क लावते. - डिजिटल व्यवहाराला चालना देण्याच्या उद्देशाने आरटीजीएस, एनईएफटीमार्फत होणाऱ्या व्यवहारांवर शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांना याचा लाभ ग्राहकांना द्यावा लागणार आहे. यासंदर्भात आठवडाभरात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील.
दिनविशेष :
- महात्मा गांधीं यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ 7 जून 1893 मध्ये सुरू केली होती.
- 7 जून 1975 मध्ये क्रिकेटच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंडमध्ये सुरुवात झाली.
- आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी 7 जून 1994 रोजी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर या प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
good details covered, but add more current details specially Maharashtra and local news if as a possible.