7 फेब्रुवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs
7 February 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (7 फेब्रुवारी 2022)
जन्मगावात लता मंगेशकर यांचा स्वरठेवा जतन :
- मध्य प्रदेशातील इंदूर येथे असलेल्या लता दीनानाथ मंगेशकर ग्रामोफोन रेकॉर्ड संग्रहालयात लता मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांच्या 7,600 ग्रामोफोन ध्वनिमुद्रिका (रेकॉर्ड ) आहेत.
- इंदूर येथेच 28 सप्टेंबर 1929 रोजी लता मंगेशकर यांचा जन्म झाला होता.
- सुमन चौरसिया यांनी 2008 मध्ये पिग्दाम्बर परिसरात 1600 चौरस फूट जागेत हे संग्रहालय उभारले असून तेथे हा अमूल्य ठेवा जतन केला आहे.
- लता मंगेशकर 32हून अधिक भारतीय आणि परकीय भाषा- बोलींत गायल्या आहेत. त्यातील अनेक दुर्मीळ गाणी या संग्रहात आहेत.
- त्याशिवाय लता मंगेशकर यांची छायाचित्रे, त्यांच्याशी संबंधित पुस्तके यांचाही ठेवा येथे आहे.
Must Read (नक्की वाचा):
टाटा महाराष्ट्र खुली टेनिस स्पर्धात बोपण्णा-रामनाथन जोडीला जेतेपद :
- रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन या द्वितीय मानांकित भारतीय जोडीने टाटा महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
- रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी ल्युक सेव्हिल आणि जॉन-पॅट्रिक स्मिथ या अग्रमानांकित ऑस्ट्रेलियन जोडीवर मात केली.
- बोपण्णाच्या कारकीर्दीतील हे एकूण 21वे, तर रामनाथनचे दुसरे एटीपी दुहेरी जेतेपद ठरले.
- तसेच एकत्रित खेळताना हे त्यांचे दुसरे एटीपी जेतेपद आहे.
- त्यांनी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेपूर्वी झालेली अॅडलेड आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती.
भारत-वेस्ट इंडिज हजाराव्या सामन्यात भारत विजयी :
- यजुर्वेद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर या फिरकीपटूंनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीमुळे 1000व्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला सहा गडी आणि 132 चेंडू राखून धूळ चारली.
- तर या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
- विंडीजने दिलेले 177 धावांचे लक्ष्य भारताने कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि पदार्पणवीर दीपक हुडा यांच्या योगदानामुळे 28 षटकांत गाठले.
विराट कोहलीने रचला इतिहास :
- भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात केवळ चार चेंडू खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
- पण त्याआधीच त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
- तर हा विक्रम करणारा विराट कोहली आता जगातील पहिला फलंदाज बनला आहे, ज्याने भारतातच 5000 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.
- तसेच विराट कोहलीने 96 व्या डावात हा पराक्रम केला, तर याआधी हा विश्वविक्रम मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नावावर होता.
दिनविशेष:
- आरएमएस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार थॉमस अँन्ड्रयूज यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1873 रोजी झाला होता.
- बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनी ने तयार केलेला सैरंध्री हा चित्रपट सन 1920 मध्ये पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.
- सन 1974 मध्ये ग्रेनाडा हा देश युनायटेड किंग्डमपासुन स्वतंत्र झाला.
- क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना सन 2003 या वर्षी श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.