7 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

नोव्हाव्हॅक्स बायोटेक या कंपनीने भारताच्या सिरम सोबत करार केला आहे:
नोव्हाव्हॅक्स बायोटेक या कंपनीने भारताच्या सिरम सोबत करार केला आहे:

7 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (7 ऑगस्ट 2020)

करोनाची चाचणी करणाऱ्या वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये वाढ करण्यात आली:

 • देशात करोनाची चाचणी करणाऱ्या वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये वाढ करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात दिली.
 • 3 राज्यांमध्ये 50 टक्के रुग्ण असून 7 राज्यांमध्ये 32 टक्के रुग्ण आहेत. त्यामुळे 10 राज्यांत एकूण 85 टक्के रुग्ण आढळले आहेत.
 • देशात रुग्णवाढीचा वेग कमी झाला असून 1370 नमुना चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा कार्यरत झाल्या आहेत
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 ऑगस्ट 2020)

रशियाने अमेरिका, ब्रिटन या देशांना मागे सोडून आघाडी घेतलीय:

 • करोना व्हायरसविरोधात सुरु असलेल्या लस संशोधनात अमेरिका, ब्रिटन या देशांना मागे सोडून रशियाने मोठी आघाडी घेतलीय.
 • अमेरिका आणि ब्रिटनच्या लसीची खूप चर्चा आहे पण या दोन देशांच्याआधी रशियाची लस बाजारात येईल अशी स्थिती आहे.
 • त्यामुळे अमेरिकेचं अस्वस्थ होणं सहाजिक आहे, यावरुन जगात एक नवीन राजकारण सुरु झालंय. त्या राजकारणाचा आणि रशियाच्या लस संशोधन कार्यक्रमाचा आपण आढावा घेणार आहोत.

नोव्हाव्हॅक्स बायोटेक या कंपनीने भारताच्या सिरम सोबत करार केला आहे:

 • करोना व्हायरस विरोधात विकसित केलेल्या लसीचा पुरवठा आणि परवाना देण्यासंदर्भात नोव्हाव्हॅक्स बायोटेक या कंपनीने भारताच्या सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियासोबत करार केला आहे.
 • नोव्हाव्हॅक्सने बुधवारी ही माहिती दिली. नोव्हाव्हॅक्स अमेरिकन लस उत्पादक कंपनी आहे.
 • या करारामुळे नोव्हव्हॅक्सच्या भारतातील लस उत्पादनाचे सर्वाधिकार सिरमकडे असणार आहेत. नोव्हाव्हॅक्सच्या एसईसी फाईलनुसार, 30 जुलै रोजी हा करार झाला.
 • नोव्हाव्हॅक्सने विकसित केलेल्या लसीचे प्राथमिक स्तरावर अपेक्षित निकाल मिळाले आहेत. सप्टेंबरपासून नोव्हाव्हॅक्स तिसऱ्या फेजची चाचणी सुरु करेल. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.ऑपरेशन वार्प स्पीड अंतर्गत अमेरिकेने करोनावरील लस
 • निर्मितीसाठी नोव्हाव्हॅक्स बायोटेक या कंपनीला 1.6 अब्ज डॉलर्सचा निधी देण्याची घोषणा केली होती.
  भारतात लवकरच सिरमकडून ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु होतील.

मँचेस्टर युनायटेड, मिलान उपांत्यपूर्व फेरीत-युरोपा लीग फुटबॉल :

 • करोना साथीच्या पार्श्वभूमीवर युरोपातील फुटबॉलला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर मँचेस्टर युनायटेड आणि इंटर मिलान या संघांनी युरोपा लीग फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
 • मँचेस्टर युनायटेडने लास्क लिंझ या ऑस्ट्रियाच्या क्लबवर दुसऱ्या टप्प्याच्या सामन्यात 2-1 असा विजय मिळवत एकूण 7-1 अशा फरकाने उपांत्यपूर्व फेरी गाठली.
 • पहिल्या टप्प्याच्या सामन्यात युनायटेडने 5-0 असा विजय मिळवला होता.
 • इंटर मिलानने गेटापेचे आव्हान 2-0 असे परतवून लावले. रोमेलू लुकाकू आणि ख्रिस्तियन एरिक्सेनचे गोल मिलानच्या विजयात मोलाचे ठरले.

दिनविशेष :

 • पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 मध्ये रोजी झाला.
 • 7 ऑगस्ट 1941 हा दिवस जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ञ, तत्वचिंतक, थोर पुरुष व पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते ‘रवींद्रनाथ टागोर‘ यांचा स्मृतीदिन आहे.
 • मुंबई महानगरपालिकेने 7 ऑगस्ट 1947 रोजी बेस्ट (Bombay Electricity Supply and Transport) कंपनी आपल्या ताब्यात घेतली.
 • सलग 128 वर्षे प्रकाशित झाल्यावर ‘द वॉशिंग्टन स्टार‘ हे वृत्तपत्र सन 1981 मध्ये बंद पडले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 ऑगस्ट 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.