6 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

6 September 2019 Current Affairs In Marathi

6 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2019)

शनिवारी चंद्रावर फडकणार तिरंगा :

 • दीड महिन्यापूर्वी म्हणजेच 22 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील केंद्रावरून झेपावलेले चांद्रयान-2 अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत अखेर चंद्राजवळ पोहोचले आहे. चंद्रापासून अवघ्या 35 किलोमीटरवर असलेले महत्वकांशी चांद्रयान-2 शनिवारी पहाटे 1.30 ते 2.30 च्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचेल.
 • तसेच यानाचे लँडिंग झाल्यावर दोन तासांनी म्हणजे 5.30 ते 6.30 च्यादरम्यान विक्रम लँडरमधून प्रग्यान रोव्हर बाहेर पडेल. हा काळ शास्त्रज्ञांसाठी आव्हान ठरणार आहे.
 • श्रीहरीकोटा येथील डीप स्पेस सेंटरमधील अँटिनाद्वारे यानाचे नियंत्रण सुरू आहे. चांद्रयान-2 चे स्वतंत्रपणे भ्रमण सुरू असून शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चंद्राच्या पृष्ठभागापर्यंतचा त्याचा 15 मिनिटांचा प्रवास चित्तथरारक असेल, असे इस्रोचे
  अध्यक्ष के. सिवान यांनी म्हटले आहे.
 • पूर्वनियोजित मार्गावरून या यानाने तीन लाख 84 हजार कि.मी.चे अंतर कापले आहे. विक्रमचा प्रवास प्रतिसेकंद सहा कि.मी. किंवा प्रतितास 21 हजार 600 कि.मी. असा आहे. त्यानंतर 15 मिनिटांनी विक्रमचा वेग दोन मीटर प्रतिसेकंद
  राहणे गरजेचे आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्राच्या पृष्ठभागावरील भारताचे हे प्रथमच अवतरण असेल. यापूर्वी चंद्रावर मानव अथवा यंत्र केवळ अमेरिका, रशिया आणि चीननेच उतरविले आहे.

आणखी पाच शिक्षण संस्थांना ‘श्रेष्ठता दर्जा’ :

 • आयआयटी मद्रास, आयआयटी खरगपूर, दिल्ली विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ आणि हैदराबाद विद्यापीठ अशा पाच सरकारी शिक्षण संस्थांना ‘श्रेष्ठता दर्जा’ देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केली.
 • तर दहा सरकारी आणि खासगी शिक्षण संस्थांना ‘श्रेष्ठता दर्जा’ दिला जाणार आहे. एकूण वीस संस्थांपैकी आत्तापर्यंत सहा संस्थांची निवड करण्यात आली आहे.
 • तज्ज्ञ समितीने प्रत्येकी 15 संस्थांची शिफारस ऑगस्ट महिन्यात केंद्रीय अनुदान आयोगाला केली होती. रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन संचालक मंडळाचे सदस्य असलेले क्रिया विद्यापीठ तसेच, बेंगळूरुमधील अझिम प्रेमजी विद्यापीठाला ‘श्रेष्ठता दर्जा’ देण्याची शिफारस केंद्रीय अनुदान आयोगाने फेटाळली.
 • तसेच गेल्या वर्षी तज्ज्ञांच्या उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारशींमधून मुंबई आणि दिल्ली आयआयटी तसेच, बेंगळूरुमधील इंडियन इन्स्टिटय़ूट फॉर सोशल सायन्सेस या तीन सरकारी शिक्षण संस्थांना तर, खासगी क्षेत्रातील बिट्स पिलानी, मणिपूर उच्चशिक्षण अकादमी आणि रिलायन्स फाऊडेशन जिओ इन्स्टिटय़ूट या तीन शिक्षण संस्थांची ‘श्रेष्ठता दर्जा’साठी निवड केलेली आहे.

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार :

 • देशातील 46 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश आहे. दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
 • तसेच अहमदनगरमधील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाळेतील डॉ. अमोल बागुल, मुंबईतील ऑटोमिक एनर्जी सेंट्रल स्कूलचे डॉ. ए. जेबीन जोएल आणि पुण्यातील विस्डम वर्ल्ड शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका दळवी या महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

जिओची गिगाफायबर ब्रॉडबँड सेवा लॉन्च :

 • रिलायन्स जियोची घरगुती ब्रॉडबँड सेवा गिगाफायबर लॉन्च झाली. या सेवेंतर्गत जिओने मोफत टीव्हीसह विविध प्लॅन्स आणि ऑफरही लॉन्च केल्या आहेत. या प्लॅन्सनुसार ग्राहकांना 1 जीबीपीएसपर्यंत इंटरनेट स्पीड उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या सेवेच्या गोल्ड आणि त्यावरील सर्व प्लॅन्ससाठी 4K स्मार्ट टीव्हीसेटही मोफत मिळणार आहे.
 • जिओच्या गिगाफायबरचे रेंटल प्लॅन हे 699 रुपयांपासून 8,499 रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. सुरुवातीच्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला 100 एमबीपीएसचा इंटरनेट स्पीड मिळणार आहे.
 • तर यापुढच्या प्लॅन्ससाठी हा स्पीड 1 जीबीपीएसपर्यंत मिळू शकणार आहे. 699 रुपयांच्या बेसिक प्लॅननंतर गोल्ड प्लॅनचे मासिक भाडे 1299 रुपये आहे. त्यावरील डायमंड प्लॅनचे मासिक भाडे 2499 रुपये आहे. तर प्लॅटिनम प्लॅनचे
  मासिक भाडे 3999 रुपये आहे. तर सर्वाधिक महागडा प्लॅन टायटॅनिअम असून याचे मासिक भाडे 8999 रुपये आहे. या सर्व गोल्ड ते टायटॅनिअम प्लॅनमध्ये ग्राहकाला 4K टीव्ही मोफत मिळणार आहे.

दिनविशेष :

 • सन 1522 मध्ये फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले.
 • भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचा जन्म 6 सप्टेंबर 1901 मध्ये झाला.
 • सन 1965 मध्ये 6 सप्टेंबर रोजी पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली.
 • सन 1993 मध्ये ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.