6 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

जम्मू काश्मीरचे नवे उपराज्यपाल मनोज सिन्हा :
जम्मू काश्मीरचे नवे उपराज्यपाल मनोज सिन्हा :

6 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (6 ऑगस्ट 2020)

सरकारने दोन आठवड्यांच्या आणीबाणीची घोषणा केली: लेबनॉन

 • लेबनॉनची राजधानी बैरुतला हादरवणारा प्रचंड स्फोट अमोनियम नायट्रेटचा साठा पेटल्याने झाला असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले असून, या स्फोटांच्या चित्रफितींतूनही तसेच दिसून येत आहे.
 • या स्फोटात किमान 135 लोक ठार, तर चार हजाराहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या स्फोटांनंतर सरकारनं दोन आठवड्यांच्या आणीबाणीची घोषणा केली आहे.
 • तसंच यादरम्यान लष्करालाही अनेक अधिकार देण्यात आले आहे. बुधवारी लेबनॉन सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यानंतर आणीबाणीची घोषणा करण्यात आली.
 • तसंच या प्रकरणाचा तपास होईपर्यंत बैरुत बंदराच्या अधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 ऑगस्ट 2020)

देशातील करोना रुग्ण संख्या 19 लाखांवर:

 • गेल्या 24 तासांमध्ये 52 हजार 509 रुग्णांची नोंद झाली असून 857 मृत्यू झाले आहेत.
 • एकूण करोना रुग्णांची संख्या 19 लाख ८ हजार 254 वर पोहोचली असून 39 हजार 495 मृत्यू झाले आहेत.
  गेल्या 24 तासांमध्ये 51 हजार 706 रुग्ण बरे झाले. 5 लाख 86 हजार 244 रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
 • महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश ही मोठी राज्येच नव्हे तर छोटय़ा राज्यांमध्येही रुग्ण वाढत आहेत.
 • गोवा सात हजार, त्रिपुरा 5.5 हजार, मणिपूर तीन हजार, नागालँड 2500, पुडुचेरी या राज्यांमध्ये चार हजार रुग्णांची नोंद झाली आहे.
 • मेघालय, सिक्कीम, अंदमान-निकोबार या तीनच राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या एक हजारांपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात आले.

जम्मू काश्मीरचे नवे उपराज्यपाल मनोज सिन्हा :

 • जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदी भाजपा नेते आणि माजी मंत्री मनोज सिन्हा यांची नियुक्ती करणअयात आली आहे.
 • जीसी मूर्मू यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला असून त्यांच्या जागी आता मनोज सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • एएनआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. काल मूर्मू यांनी आपल्या उपराज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता.
 • बुधवारी संध्याकाळी गिरीष चंद्र मूर्मू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याला एक वर्ष पूर्ण झालं.
 • मूर्मू यांनी 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात काश्मीर शांतता, स्थिरता आणि विकासाच्या मार्गावर पुढे गेल्याचं सांगण्यात येतं. तसंच राज्यात दहशतवाद आणि दगडफेकीसारख्या घटनांमध्येही घट झाली आहे.

लिलाव प्रक्रियेद्वारे ठरवणार प्रो कबड्डी लीगच्या आगामी हंगामाचे प्रक्षेपण:

 • देशातील दुसऱ्या क्रमांकाची लोकप्रिय लीग असा दर्जा प्राप्त करणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या आगामी हंगामाचे प्रक्षेपणाचे हक्क लिलाव प्रक्रियेद्वारे ठरण्याची दाट शक्यता आहे.
 • सध्याचे प्रक्षेपणकर्ते स्टार इंडिया यांच्या महसूल वाटपाच्या प्रस्तावामुळे संघ आणि संयोजक मशाल स्पोर्ट्स पेचात सापडले आहेत.
 • स्टार इंडियाने यापेक्षा उत्तम प्रस्ताव ठेवला नाही, तर प्रक्षेपणाचे हक्क पारदर्शक लिलाव पद्धतीने निश्चित व्हावे, यासाठी सर्व संघमालकांनी एकत्रित येऊन मोर्चेबांधणी केली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
 • इंडियन प्रीमियर लीगप्रमाणे प्रो कबड्डी लीगचा लिलाव व्हावा. ते स्टार इंडियाला थेट देऊ नये, अशी मागणी आम्ही मशाल स्पोर्ट्सकडे केली आहे.
 • प्रो कबड्डी लीगचे बाजारमूल्य उत्तम आहे. स्टारच्या मशाल स्पोर्ट्समधील भागीदारीत हितसंबंध दडले आहेत.

दिनविशेष :

 • 6 जून 1674 मध्ये रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
 • गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना 6 जून 1930 मध्ये झाली.
 • 6 जून 1969 मध्ये वि.स. पागे समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात झाली.
 • भारताचे राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलम यांनी 6 जून 2004 रोजी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून घोषित केली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 ऑगस्ट 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.