5 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

5 November 2018 Current Affairs In Marathi

5 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 नोव्हेंबर 2018)

आशियाई स्पर्धेत भारतीय युवतींचे विजेतेपद:

 • यजमान भारताने अंतिम सामन्यात अपेक्षेप्रमाणे कझाकस्तानला 68-45 अश्या फरकाने बेंगळूरु येथे झालेल्या 24व्या आशियाई मुलींच्या (18 वर्षांखालील) बास्केटबॉल स्पर्धेतील ‘ब’ विभागाचे अजिंक्यपद मिळवले. त्याशिवाय त्यांनी पुढील स्पर्धेत ‘अ’ विभागात स्थान मिळवले. Indian Team
 • गतवर्षी याच कोर्टवर यजमानांच्या महिला आणि 16 वर्षांखालील मुलींच्या संघाने ‘ब’ विभागाचे अजिंक्यपद पटकावले होते आणि आजच्या यशाने भारताने विजेतेपदाची हॅट्ट्रिक पूर्ण केली.
 • भारताच्या हर्षिता आणि पुष्पाने सुरुवातीपासून आक्रमक धोरण स्वीकारून प्रतिस्पध्र्याच्या संरक्षित क्षेत्रात मुसंडी मारत गुण नोंदवण्याचा सपाटा लावला होता. कझाकस्तानच्या खेळाडूंना चेंडूवर व्यवस्थित नियंत्रण ठेवता येत नाही हे बरोबर हेरून, यजमानांनी ‘मॅन टू मॅन’ तंत्राचा अवलंब करून त्यांना पूर्ण जेरीस आणले.
 • सुरुवातीच्या 16-9 अशा आघाडीनंतर पुष्पाने आक्रमणाची सूत्रे आपल्या हाती घेत गुणफलक हालता ठेवला. त्याशिवाय बचावात प्रतिस्पध्र्याची अनेक आक्रमणे फोल ठरवली. मध्यंतराच्या 32-16 अशा मोठय़ा आघाडीनंतर हर्षिताने आपल्या उंचीचा फायदा घेत कझाकस्तानचा बचाव मोडून काढला आणि सामन्याचा निकाल स्पष्ट केला.

आजपासून इराणवर तेलनिर्यात निर्बंध:

 • अमेरिकेने इराणवर लादलेले तेलनिर्यात निर्बंध आजपासून (सोमवार, 5 नोव्हेंबर, 4 नोव्हेंबरची मध्यरात्र) लागू होत असून त्यातून भारतासह 8 देशांना सहा महिन्यासांठी सवलत मिळाली आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दिवाळीच्या तोंडावर बसणारा धक्का तूर्तास टळला आहे. दरम्यान, इराणकडून मिळणाऱ्या खनिज तेलाचे पैसे भागवण्यासाठी नवी यंत्रणा तयार करण्यावर सध्या भारताचा भर आहे.
 • अमेरिकेने युरोपीय देशांच्या मदतीने 2015 साली इराणबरोबर अणुकरार केला होता. त्यात इराणने अण्वस्त्रनिर्मिती थांबवण्याचे मान्य केले आणि अमेरिकेने इराणच्या व्यापाराचे दरवाजे खुले केले. मात्र इराण या कराराच्या अटी पाळत नसल्याचा आरोप करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून माघार घेतली.
 • तसेच इराणवर नव्याने निर्बंध लादले. त्यानुसार इराणकडून खनिज तेल विकत घेणाऱ्या देशांवरही अमेरिकेने निर्बंध लादण्याचा इशारा दिला.
 • तेलनिर्यातीतून मिळालेल्या पैशाचा इराणने अण्वस्त्रनिर्मितीसाठी वापर करू नये हा अमेरिकेचा उद्देश आहे. मात्र त्याबरोबर मित्र देशांच्या अर्थव्यवस्थांना फटका बसू नये, याकडेही लक्ष दिले आहे.
 • इराणकडून खनिज तेल आयात करण्यावरील निर्बंध 5 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असता, कारण इराण हा भारताचा मोठा तेलपुरवठादार देश आहे. त्यामुळे भारतासह अन्य काही देशांनी अमेरिकेशी चर्चा करून या र्निबधांतून सवलत मिळवली.
 • तर त्यानुसार भारत, जपान, दक्षिण कोरिया, तुर्कस्तान आदी देशांना पुढील 180 दिवसांपर्यंत इराणकडून तेल आयात करण्यास सवलत मिळाली आहे. मात्र इराणकडून तेलआयात टप्प्याटप्प्याने कमी करण्याची अट कायम आहे.

स्वाक्षरीयुक्त ‘सातबारा’त अहमदनगर आघाडीवर:

 • सातबारा संगणकीकरण प्रकल्पांतर्गत महसूल विभागाच्या वतीने डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उपक्रम सुरू झाला असून अहमदनगर जिल्हा त्यात आघाडीवर आहे.
 • पुणे सातव्या क्रमांकावर तर मुंबईसह सिंधूदूर्गरत्नागिरी जिल्हा पिछाडीवर आहे. राज्यात आतापर्यंत 39 लाख 24 हजार 648 डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उताऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे.
 • सातबारा संगणकीकरणात चावडी वाचन, सातबारा दुरुस्ती, पुनर्लेखन, आॅनलाइन सातबारा आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा असे विविध टप्पे आहेत. Digital Ahemadnagar
 • तर त्यातच संगणकीकरणाच्या प्रक्रियेत काही चुका झाल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महसूल विभागाने राज्यातील सर्व जमीनधारक व शेतकर्‍यांना नोव्हेंबर अखेरपर्यंत चुका दुरूस्त करून घेण्याची संधी दिली आहे.
 • परिणामत: डिजिटल स्वाक्षरीच्या कामाने अद्याप वेग घेतलेला नाही. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 5 लाख 5 हजार 594 सातबारा उतारे तयार झाले असल्याचे सांगण्यात आले आहेत.

सहकारी संस्थांना आरक्षण सवलत:

 • कोणत्याही सहकारी संस्थेत अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास प्रवर्ग किंवा महिला सभासद नसल्यास व्यवस्थापन समितीतील पदे आरक्षणातून वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने घेतला आहे.
 • या निर्णयामुळे आरक्षित पदे भरू न शकलेल्या आणि गणसंख्येअभावी प्रशासक नियुक्तीच्या कारवाईला सामोरे जावे लागणाऱ्या लाखो सहकारी संस्थांना दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीमध्ये अडीच वर्षांपेक्षा अधिक काळ रिक्त असलेली पदे भरण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.
 • 97व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून सहकार कायद्यात आमूलाग्र बदल झाले आहेत. राज्य सरकारनेही या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने सहकार कायद्यात अनेक बदल केले. सहकारातील नव्या दुरुस्त्यांमुळे गृहनिर्माण संस्थांसह सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत घेण्याचा निर्णय सरकारने पाच वर्षांपूर्वी घेतला.
 • मात्र अनेक संस्थांमध्ये अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, महिला आदी प्रवर्गातील सभासदच मिळत नसल्याने व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत ही पदे भरली जात नव्हती. काही लहान संस्थांमध्ये तर 7 किंवा 11 सदस्यीय व्यवस्थापन समितीमध्ये आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांचा शोध घेणे संस्थांना कठीण जात होते.

दिनविशेष:

 • 5 नोव्हेंबर हा दिवस ‘महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन‘ म्हणून पाळला जातो.
 • अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात सन 1824 मध्ये जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले.
 • सन 1929 पासून जी.आय.पी. रेल्वे कंपनीने मुंबईहून पुण्यापर्यंतच्या लोहमार्गावरून आगगाड्याऐवजी विजेवर चालणा-या गाड्यांचा प्रारंभ केला.
 • बी.बी.सी.आय. (Bombay Baroda and Central India) रेल्वे आणि सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे, जयपूर रेल्वेकच्छ रेल्वे यांचे विलिणीकरण करुन 5 नोव्हेंबर सन 1951 रोजी पश्चिम रेल्वे ची स्थापना करण्यात आली.
 • भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहोली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 मध्ये झाला.
 • गुगलने ने 2007 या वर्षापासून अॅडरॉइड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमचे अनावरण केले.
 • भारताने 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळ ऑर्बिटर मोहिमेची सुरूवात केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.