4 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs
4 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (4 ऑगस्ट 2022)
इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक SSLV :
- भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे.
- Small Satellite Launch Vehicle (SSLV)असं या नव्या प्रक्षेपकाचे नाव असून कमी वजनाचे उपग्रह, 500 किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाचे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी या प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे.
- तसेच हा नवा प्रक्षेपक एका उड्डाणात एकुण 500 किलो वजनाचे उपग्रह 500 किलोमीटर उंचीपर्यंत प्रक्षेपित करु शकणार आहे.
- यामुळे मिनी, मायक्रो आणि नॅनो उपग्रह प्रक्षेपित करणे शक्य होणार आहे.
- इस्त्रोचा अवघ्या 100 टन वजनाचा SSLV हा नवा प्रक्षेपक फक्त सहा जणांची टीम अवघ्या सात दिवसांत उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज करु शकते.
- यामुळे SSLV प्रक्षेपणाच्या माध्यमातून इस्त्रोची मनुष्यबळ आणि पैशांची मोठी बचत होणार आहे.
- SSLV प्रक्षेपकाची उंची 34 मीटर असून व्यास दोन मीटर एवढा आहे. येत्या सात ऑगस्टला SSLVचे पहिले प्रक्षेपण सकाळी नऊ वाजून 18 मिनीटांनी श्रीहरीकोटा इथून होणार आहे.
- SSLV चे पहिले उड्डाण असल्याने हे प्रायोगिक उड्डाण असणार आहे, या मोहिमेला इस्त्रोने SSLV-D1 असं नाव दिलं आहे.
- या मोहिमेच्या माध्यमातून 135 किलोग्रॅम वजनाचा EOS 02 नावाचा मायक्रो सॅटेलाईट ( microsatellite) 350 किलोमीटर उंचीवर प्रक्षेपित केला जाणार आहे.
- तर या उपग्रहाचा कार्यकाल हा 10 महिने निश्चित करण्यात आला असून जमिनीची छायाचित्रे काढण्याचे काम करणार आहे.
- तर ग्रामीण भागातील 750 विद्यार्थ्यांनींनी बनवलेला आठ किलोग्रॅम वजनाचा AzaadiSAT नावाचा उपग्रहही प्रक्षेपित केला जाणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
जागतिक वनक्षेत्रात 81.7 दशलक्ष हेक्टरची घट :
- भारतात जंगलात लागणारी आग आणि विकास वनक्षेत्र कमी होण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.
- जागतिक पातळीवर देखील वनक्षेत्रात मोठी घट झाल्याची माहिती समोर आली आहे.
- गेल्या सहा दशकात जागतिक वनक्षेत्र 81.7 दशलक्ष हेक्टरने कमी झाले आहे.
- ‘जर्नल एन्व्हायर्नमेंटल रिसर्च लेटर्स’मध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.
- पर्यावरणातील बदल आणि जैवविविधता हानी यासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी वनपरिसंस्था महत्त्वाची भूमिका बजावतात.
वैयक्तिक माहिती-विदा संरक्षण विधेयक मागे :
- माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढय़ कंपन्यांनी आक्षेप घेतलेले आणि केंद्र सरकारला नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचा वापर करण्यासाठी मोकळे रान देणारे ‘वैयक्तिक गोपनीय माहिती-विदा संरक्षण’विधेयक बुधवारी केंद्र सरकारने मागे घेतले.
- संयुक्त संसदीय समितीने 81 सुधारणा सुचवल्यानंतर, केंद्रीय माहिती- तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत हे विधेयक मागे घेत असल्याचा प्रस्ताव मांडला़ त्याला आवाजी मतदानाने मंजुरी देण्यात आली.
- तर काळाशी सुसंगत नवे विधेयक आणले जाईल, असे वैष्णव यांनी लोकसभेतील निवेदनात स्पष्ट केले.
- गोपनीयता हा मूलभूत अधिकार असल्याचा निकाल देताना 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला वैयक्तिक माहिती-विदा संरक्षणाचा कायदा करण्याची सूचना केली होती.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धात बॅडमिंटन संघाला रौप्य :
- राष्ट्रकुल बॅडिमटन स्पर्धेत भारताला सांघिक रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
- तर अंतिम लढतीत भारताला मलेशियाकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागला.
- तर एकमेव विजय ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूलाच मिळविता आला.
- याआधी भारतीय बॅडमिंटन संघानं 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं.
ज्युदोमध्ये तुलिका मानने पटकावले रौप्य :
- भारतीय महिला ज्युदोपटू तुलिका मानचे बुधवारी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळवले.
- महिलांच्या 78 किलो वजनी गटात सुवर्णपदकाच्या सामन्यात तिचा पराभव झाला.
- अंतिम फेरीत स्कॉटलंडची गतविजेती अॅडलिंग्टनकडून तुलिका पराभूत झाली.
- 2022 राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोमध्ये भारताचे हे तिसरे पदक ठरले आहे.
वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य पदकाची कमाई :
- स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय वेटलिफ्टिंगपटू लव्हप्रीत सिंगने 109 किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली आहे.
- हे भारताचे एकूण 14वे तर वेटलिफ्टिंगमधील नववे पदक ठरले आहे.
- त्याने स्नॅचमध्ये 163 किलो, तर क्लीन अँड जर्कमध्ये 192 किलो वजन उचलले. अशा प्रकारे त्याने एकूण 355 किलो वजन उचलून कांस्य पदक जिंकले.
- कॅमेरूनच्या ज्युनियर पेरीस्लेक्सने 161 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले, तर सामोनच्या जॅक हिटिला याने एकूण 358 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले.
दिनविशेष :
- कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक सर फिरोजशहा मेहता यांचा जन्म 4 ऑगस्ट 1845 मध्ये झाला.
- पतंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचा जन्म 4 ऑगस्ट 1863 मध्ये झाला.
- साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना.सी. फडके यांचा जन्म 4 ऑगस्ट 1894 मध्ये झाला.
- सन 1956 मध्ये भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.
- मरणोत्तर त्वचादान करुन दुसर्यांना जीवनदान देणारी, भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात सन 2001 मध्ये 4 ऑगस्ट रोजी स्थापन झाली.