4 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी – Current Affairs

महिला हॉकी संघ
महिला हॉकी संघ

4 August 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (4 ऑगस्ट 2021)

भारताला हार्पून क्षेपणास्त्र संच विक्रीस अमेरिकेची मंजुरी :

 • भारताला ‘हार्पून जॉइंट कॉमन टेस्ट सेट’म्हणजे जेसीटीएस यंत्रणा विकण्यास अमेरिकेने मंजुरी दिली आहे.
 • तर या संचाची किंमत 8.2 कोटी डॉलर्स असून त्यामुळे दोन्ही देशातील द्विपक्षीय सामरिक संबंध सुधारणार असून हिंद प्रशांत क्षेत्रात भारत हा प्रमुख संरक्षण भागीदार ठरणार आहे.
 • पेंटॅगॉनच्या संरक्षण सुरक्षा सहकार्य संस्थेने हा संच भारताला देण्यास हिरवा कंदील दिल्यानंतर आता त्याबाबतची अधिसूचना अमेरिकी काँग्रेसमध्ये मंजूर केली जाणार आहे.
 • तसेच हार्पून ही जहाज विरोधी क्षेपणास्त्र संच मालिका आहे. भारत सरकारने ‘हार्पून जॉइंट कॉमन टेस्ट सेट’ची मागणी अमेरिकेकडे केली होती.
 • तर त्यात हार्पून क्षेपणास्त्रच्या सुटय़ा भागांची निगा व दुरुस्ती यासाठी एक केंद्र उभारले जाणार आहे. यात तांत्रिक माहिती व प्रशिक्षण या बाबींचाही समावेश आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 ऑगस्ट 2021)

अमेरिकी मुलगी जगात सर्वात हुशार विद्यार्थिनी :

 • भारतीय-अमेरिकी मुलगी नताशा पेरी अमेरिकी विद्यापीठाच्या सॅट व अ‍ॅक्ट या प्रमाणित चाचण्यांमध्ये चमकली असून ती सर्वात हुशार विद्यार्थिनी ठरली.
 • तर तिचे वय अवघे अकरा वर्षे आहे.
 • स्कोलेस्टिक असेसमेंट टेस्ट व अमेरिकन कॉलेज टेस्टिंग म्हणझे सॅट व अ‍ॅक्ट या परीक्षांचा उद्देश हा मुलांना महाविद्यालयात प्रवेश देण्याची निवड चाचणी हा आहे.
 • तसेच काही कंपन्याही या परीक्षांतील गुणांवरून संबंधित हुशार विद्यार्थ्यांना काम देऊ शकतात. स्वयंसेवी संस्थाही त्यांच्या हुशारीचा उपयोग करून घेऊ शकतात.
 • पेरी ही न्यूजर्सीतील थेलमा एल, स्टँडमियर एलेमेंटरी स्कूलची विद्यार्थिनी असून तिने सॅट, अ‍ॅक्ट व हॉपकिन्स विद्यापीठाच्या सीटीवाय परीक्षेत प्रावीण्य मिळवले आहे.

सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या तिन्ही खेळाडूंचा विश्वविक्रम :

 • नॉर्वेच्या कार्सटन वारहोमने मंगळवारी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये विश्वविक्रमी कामगिरी करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.
 • एका सेंकदांच्या अंतराने विश्वविक्रम मोडीत काढल्यानंतर यासंदर्भात समजल्यावर कार्सटनने सुपरमॅनप्रमाणे आपली जर्सी फाडून आनंद व्यक्त केला.
 • तर विशेष म्हणजे कार्सटननंतर दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या अमेरिकेच्या राइ बेंजामिननेही विश्वविक्रम मोडला.
 • दोन वेळा जागतिक विजते राहिलेल्या कार्सटनने मंगळवारी 45.94 सेकंदात अंतिम शर्यत पूर्ण केली.
 • तसेच या शर्यतीचं विशेष म्हणजे यामध्ये सहभागी झालेल्या सातपैकी सहा खेळाडूंनी आपले राष्ट्रीय विक्रम मोडले.

महिला हॉकी संघापुढे आज अर्जेंटिनाचे आव्हान :

 • टोक्यो ऑलिम्पिकची प्रथमच उपांत्य फेरी गाठून भारतीय महिला संघाने आधीच इतिहास घडवला आहे.
 • तर आज अर्जेंटिनाला नमवून अंतिम फेरीचे ‘सुवर्णलक्ष्य’ महिला संघापुढे आहे.
 • 18 निर्भीड महिला हॉकीपटूंनी सोमवारी तीन वेळा ऑलिम्पिक विजेत्या ऑस्ट्रेलियाला 1-0 असा अनपेक्षित धक्का दिला.
 • तसेच सामन्याच्या 22व्या मिनिटाला मिळालेल्या एकमेव पेनल्टी कॉर्नरचे ड्रॅग-फ्लिकर गुर्जित कौरने गोलमध्ये रूपांतर करीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आणले.
 • 1980च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघाने पदार्पणात सहा संघांपैकी चौथे स्थान मिळवले होते. त्यानंतरची ही सर्वोत्तम कामगिरी भारताने साकारली आहे.

दिनविशेष :

 • कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक सर फिरोजशहा मेहता यांचा जन्म 4 ऑगस्ट 1845 मध्ये झाला.
 • पतंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचा जन्म 4 ऑगस्ट 1863 मध्ये झाला.
 • साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना.सी. फडके यांचा जन्म 4 ऑगस्ट 1894 मध्ये झाला.
 • सन 1956 मध्ये भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.
 • मरणोत्तर त्वचादान करुन दुसर्‍यांना जीवनदान देणारी, भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात सन 2001 मध्ये 4 ऑगस्ट रोजी स्थापन झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 ऑगस्ट 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.