31 जानेवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs

बेन कूपर
बेन कूपर

31 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (31 जानेवारी 2022)

एच -1 बी व्हिसासाठी नोंदणी 1 मार्चपासून :

  • अमेरिकेत सन 2023 साठी एच- 1 बी व्हिसा मिळविण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया येत्या 1 मार्चपासून सुरू होणार आहे.
  • तर पात्र अर्जदारांमधून निवड झालेल्यांची यादी 31 मार्चपर्यंत ऑनलाइन प्रसिद्ध केली जाईल.
  • एच-1 बी व्हिसा हा नॉन इमिग्रंट व्हिसा असून त्यामुळे अमेरिकी कंपन्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार सैद्धांतिक आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या विशेष पदांवर परकीय व्यक्तींची नोकरभरती करता येते.
  • दरवर्षी भारत आणि चीनसारख्या देशांमधून अशा हजारो कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी अमेरिकी तंत्रज्ञान कंपन्या या व्हिसावर अवलंबून असतात.

नेदरलँड्सचा स्फोटक फलंदाज बेन कूपरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा :

  • नेदरलँड्स संघाचा स्टार फलंदाज बेन कूपर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
  • तर वयाच्या 29व्या वर्षी कूपरने क्रिकेटला रामराम ठोकला.
  • 2013मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कूपरने नेदरलँड्सकडून 71 सामने खेळले आहेत.
  • तसेच बेन कूपर हा नेदरलँड्सचा टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
  • तर त्याच्या आठ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने 58 टी-20 सामन्यांमध्ये 1239 धावा केल्या आहेत.

राफेल नदालचे विक्रमी 21वे ग्रँड स्लॅम :

  • स्पेनच्या राफेल नदालने रविवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले आणि विक्रमी 21व्या ग्रँड स्लॅम अजिंक्यपदावर दिमाखात नाव कोरले.
  • तर त्याचबरोबर, रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच या पुरुषांच्या टेनिसमधील महान त्रिमूर्तीमध्ये आकडेवारीच्या निकषावर त्याने आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले.
  • नदालने दोन वर्षांपूर्वी पॅरिसमध्ये फ्रेंच स्पर्धेत विसावे ग्रँड स्लॅम जिंकले.

दिनविशेष:

  • सन 1911 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात 31 जानेवारी 1920 रोजी झाली.
  • सोविएत रशियाने सन 1929 मध्ये लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले होते.
  • सन 1949 यावर्षी बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.
  • राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी 31 जानेवारी सन 1950 रोजी संसदेपुढे पहिले भाषण केले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.