31 डिसेंबर 2020 चालू घडामोडी – Current Affairs

31 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (31 डिसेंबर 2020)

MPSC परीक्षात खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना केवळ 6 संधी :

 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता मर्यादा देण्यात आल्या आहेत.
 • नवीन वर्षात म्हणजे 2021 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीरात निघालेल्या प्रत्येक परीक्षेसाठी हा नियम लागू असणार आहे.
 • केंद्रीय लोकसेवा आयोगाप्रमाणेच आता राज्य लोकसेवा आयोगानेही विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी मर्यादा ठेवल्याने तेवढ्यात प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे.
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यासंदर्भाद आज परीपत्रक काढलं असून विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
 • तर त्यानुसार, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 6 वेळा ही परीक्षा देण्यात येईल. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांच्या मर्यादेपासून सूट देण्यात आली आहे. तर, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 9 वेळा एमपीएससी परीक्षा देण्यात येईल.
 • आयोगाने ठरवून दिलेल्या नियमापेक्षा अधिकची संधी घेतल्यास किंवा अधिकवेळा परीक्षा दिल्यास संबंधित विद्यार्थी किंवा उमेदवारास नोकरीचा लाभ मिळणार नाही.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 डिसेंबर 2020)

कायदेशीर गर्भपाताच्या विधेयकाला अर्जेटिनामध्ये मंजुरी :

 • गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या अर्जेटिनामधील महिलांच्या चळवळीला अखेर यश मिळाले असून अर्जेटिनाच्या सिनेटने कायदेशीर गर्भपात विधेयकाला मंजुरी दिली आहे.
 • तर या विधेयकाच्या बाजूने 38 मते पडली तर विरोधात 29, तर एक जण गैरहजर होते.
 • तसेच 14 आठवडय़ांपर्यंतचा गर्भपाताला तसेच बलात्काराच्या प्रकरणातील आणि मातेच्या जिवाला धोका असल्यास गर्भपाताला मंजुरी देण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय विमानांवर आता 31 जानेवारीपर्यंत बंदी :

 • आंतरराष्ट्रीय विमानांवर आता 31 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मोदी सरकारने हा तातडीचा निर्णय घेतला आहे.
 • करोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.
 • तर आधी ही बंदी 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती 7 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे.
 • विशेष विमानं आणि माल वाहतूक विमानांना यातून वगळण्यात आलं आहे असंही केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

ब्रिटनकडून ऑक्सफर्डच्या करोना लसीला मान्यता :

 • करोनाच्या नव्या प्रकाराचा सामना करत असलेल्या ब्रिटनने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्राजेनेकाकडून तयार करण्यात आलेल्या करोना प्रतिबंधक लसीला मान्यता दिली आहे.
 • तर यासोबतच ब्रिटन करोना लसीला मान्यता देणारा पहिला देश ठरला आहे.
 • ब्रिटनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात करोनाचा नवा प्रकार फैलावत असून अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणले आहेत.
 • आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “औषधं आणि हेल्थकेअर उत्पादनं नियामक प्रशासनाने (MHRA) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी/ अ‍ॅस्ट्राजेनेकाच्या करोना लसीसंबंधी केलेल्या शिफारसीला सरकारने मान्यता दिली आहे”.

जाडेजाला धोनी-कोहलीच्या खास पंगतीत मिळालं स्थान :

 • मेलबर्न येथेली बॉक्सिंग डे कसोटीत भारताच्या विजयात रविंद्र जाडेजाची भूमिका महत्वाची होती. पहिल्या डावांत फलंदाजी करताना जाडेजानं 57 धावाची महत्वपूर्ण खेळी केली होती. तर गोलंदाजीत एक बळी मिळवला होता.
 • तसेच त्यानंतर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना जाडेजानं दोन बळी मिळवले होते.
 • तर मेलबर्न येथे झालेला कसोटी सामना रविंद्र जाडेजाचा 50 वा कसोटी सामना होता. जाडेजानं 50 कसोटी सामने खेळतानाच एम. एस. धोनी आणि विराट कोहलीच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे.
 • एकदिवसीय सामने, टी-20 आणि कसोटी या तिन्ही प्रकारात 50 किंवा त्यापैक्षा जास्त सामने खेळणारा रविंद्र जाडेजा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

दिनविशेष:

 • 31 डिसेंबर सन 1600 मध्ये ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.
 • आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव यांचा जन्म 31 डिसेंबर 1871 रोजी झाला होता.
 • सन 1879 मध्ये थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले होते.
 • युनायटेड किंग्डम सन 1985 मध्ये युनेस्कोचे सदस्य बनले.
 • 31 डिसेंबर 1999 मध्ये पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.