30 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

30 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (30 नोव्हेंबर 2020)

भारतातील पहिली सीप्लेन सेवा तात्पुरती बंद :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर 2020 रोजी देशातील पहिल्या सीप्लेन सेवेचे उद्घाटन करण्यात आलं.
    तर केवडियामध्ये त्यांनी सीप्लेन सेवेसाठी वॉटर एरोडोमचं लोकार्पण केलं.
  • सरदार सरोवर धरणाजवळच्या तळे क्रमांक 3 येथे या सेवेचे उद्घाटन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145 व्या जयंतीनिमित्ताने करण्यात आलं होतं.
  • सरदार सरोवराजवळची सीप्लेन सेवा स्पाइस जेटची ‘स्पाइस शटल’ ही कंपनी चालवत आहे. परंतु सध्या काही कारणास्तव ही सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे.
  • तसेच मालदीवरून विमान परतल्यानंतर सीप्लेन सेवा पुन्हा 15 डिसेंबरपासून पुन्हा सुरू केली जाणार आहे. दरम्यान, याबाबत यापूर्वीपासूनच ठरवण्यात आलं होतं. त्यामुळेच 27 नोव्हेंबर नंतर कोणत्याही प्रकारचं बुकींग घेण्यात आलं नव्हतं, अशी माहिती स्पाईस जेटच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली.
  • साबरमती आणि सरदार सरोवर-स्टॅच्यू ऑफ यूनिटी मार्ग देशातील ओळख पटवण्यात आलेल्या 16 मार्गांपैकी एक आहे. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार या मार्गांसाठी हायड्रोग्राफिक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं आहे. यानंतर गुवाहाटी, अंदमान निकोबार आणि यमुनापासून उत्तराखंडसारख्या अन्य मार्गावरही ही सेवा सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात ‘लव्ह जिहाद’ विरोधातील कायदा लागू :

  • लव्ह जिहादच्या घटना वाढल्या असल्याचा दावा करत योगी सरकारनं उत्तर प्रदेशात कायदा आणण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत या कायद्यासंदर्भातील अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली.
  • तर या कायद्यात लव्ह जिहादचा थेट उल्लेख केलेला नाही. मात्र, धर्म लपवून आणि मुलीचं जबरदस्तीनं धर्मांतर करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.
  • उत्तर प्रदेशातील योगी सरकारने लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतराविरोधी अध्यादेशाचा मसूदा राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे अनुमोदनासाठी बुधवारी राजभवनात पाठवला होता. या अध्यादेशावर शनिवारी राज्यपालांनी स्वाक्षरी करत मंजुरी दिली. त्यामुळे आजपासून उत्तर प्रदेशात हे दोन्ही कायदे लागू झाले आहेत.
  • तसेच त्यानंतर आता हे अध्यादेशाला सहा महिन्यांमध्ये विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करावे लागतील. त्यानंतरच ते कायमस्वरुपी लागू होतील.

61 मिनिटांपेक्षा कमी वेळ नोंदविणारा साबळे पहिला भारतीय :

  • टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविणाऱ्या अविनाश साबळेने रविवारी येथे एअरटेल दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये भारतीयांमध्ये अव्वल स्थान पटकावले.
  • तर त्याने 1 मिनिट 30 सेकंदानी राष्ट्रीय विक्रम मोडला. साबळे सर्व भारतीय धावपटूंच्या बराच पुढे होता. एकूण स्पर्धकांमध्ये तो 10 व्या स्थानी राहिला.
  • तसेच गेल्या वर्षी विश्व ॲथ्लेटिक्स चॅम्पियनशिपदरम्यान 3 हजार मीटर रस्टीपलचेजमध्ये टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविणारा 26 वर्षीय साबळे 61 मिनिटांपेक्षा कमी वेळेत हाफ मॅरेथॉन पूर्ण करणारा पहिला भारतीय धावपटू ठरला.
  • साबळेने दिल्ली हाफ मॅरेथॉनमधील भारतीयाच्या विक्रमामध्ये सुधारणा केली. सुरुवातीला हा विक्रम बुगाथाच्या नावावर होता.
  • तर त्याने 1 तास चार मिनिट 33 सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली होती. साबळे 2018 मध्ये अभिषेक पालनंतर दुसऱ्या स्थानी होता.

दिनविशेष:

  • भारतीय वनस्पती शास्रज्ञ ‘डॉ. जगदीशचंद्र बोस‘ यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1858 रोजी झाला होता.
  • सन 1917 या वर्षी कलकत्ता येथे आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युटची स्थापना झाली.
  • बार्बाडोसला युनायटेड किंगडमपासुन सन 1966 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
  • सन 1996 मध्ये ख्यातनाम साहित्यिक पु.ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 डिसेंबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.